म्युच्युअल फंड म्हणजे काय? | What is Mutual Funds ?
म्युच्युअल फंड ही एक ट्रस्ट आहे जी अनेक गुंतवणूकदाराकडून समान उद्दिष्टांसाठी पैसे गोळा करते आणि त्या पैशाची गुंतवणूक money market ,Bond, Equity,Goldअशा विविध मालमत्ता श्रेणी (Asset class) मध्ये गुंतवणूक करते.
म्युच्युअल फंड ही asset class मध्ये विविधता आणण्याचा एक सोपा मार्ग आहे ज्यामुळे Risk कमी होण्यास मदत होते. म्युच्युअल फंड कमी जोखीम मध्ये गुंतवणूकदारांना दीर्घ काळा (Long term)मध्ये चांगला परतावा मिळवून दिला जातो. म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केल्यामुळे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता व संभाव्य परतावा मिळण्याचे एक सुरक्षित आणि प्रभावी मार्ग असू शकतो तरी कोणतीही गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी त्याची माहिती त्यामधील जोखीम लक्षात घेऊन आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊन गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केल्या नंतर तुमचे पैसे इतर गुंतवणूकदारांच्या रकमेसोबत एकत्र केले जातात, गुंतवणूक केलेल्या रकमेवर Unit दिले जातात या सामूहिक गुंतवणूक योजनेतून मिळणारे नफा गुंतवणूक दारांमध्ये योजनेचे NAV मोजून लागू खर्च आणि शुल्क वजा केल्यानंतर समान प्रमाणात वितरित केला जातो. त्याच्या बदलात mutual fund कडून नाममात्र शुल्क आकारले जाते. म्युच्युअल फंड कडून आकारले जाणारे शुल्क आणि खर्च हे सेबीने ठरवलेल्या नियमानुसार असतात. सेबी (securities and exchange board of India) ही सिक्युरिटीज मधील गुंतवणूकदाराच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि सिक्युरिटी मार्केटच्या विकासासाठी आणि त्याचे नियम करण्यासाठी SEBI ची स्थापना केलेली आहे.
जेव्हा मार्केट मध्ये वाढ किंवा घट होते तेव्हा म्युच्युअल फंड चा आढावा घेणे टाळले पाहिजे आणि परतावा मिळवण्या साठी संयम ठेवून दीर्घकाल गुंतवणूक करणे आवश्यक आहे. तेव्हाच तुम्ही भविष्यकाळातील ध्येय मिळवू शकता.
![म्युच्युअल फंड म्हणजे काय? | What is Mutual Funds ? म्युच्युअल फंड म्हणजे काय? | What is Mutual Funds ?](http://secretofmoney.in/wp-content/uploads/2023/07/Debt-Funds.jpg)
2.म्युच्युअल फंडाची स्थापना का झाली ? | Why Mutual Funds were Established ?
देशाच्या आर्थिक विकासासाठी विकसित अर्थव्यवस्था गरजेची आहे विकसित अर्थव्यवस्थेसाठी व्यापक सहभागासह मजबूत बाजारपेठ आवश्यक आहे. या व्यापक उद्देशाने भारत सरकार आणि रिझर्व बँक ऑफ इंडिया यांच्या पुढाकारातून म्युच्युअल फंड ची स्थापना झाली. भारतातील म्युच्युअल फंड उद्योगाची सुरुवात संसदेच्या कायद्याद्वारे UTI म्युच्युअल फंड ची स्थापना बचत,गुंतवणूक आणि उत्पन्न याला प्रोस्ताहन देण्यासाठी झाली. नंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ आणि भारतीय जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन यांनी म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली.
सिक्युरिटीज मार्केटमधील गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि सिक्युरिटीज मार्केटच्या विकासासाठी आणि त्याचे नियमन करण्यासाठी एप्रिल 1992 मध्ये SEBI ची स्थापना झाल्यानंतर भारतीय सिक्युरिटीज मार्केटला अधिक महत्त्व प्राप्त झाले. 1993 मध्ये खाजगी क्षेत्रातील निधीच्या प्रवेशाने भारतीय म्युच्युअल फंड उद्योगात एक नवीन युग सुरू झाले, ज्यामुळे भारतीय गुंतवणूक दारांना एक व्यापक पर्याय मिळाला. SEBI कडून म्युच्युअल फंड नियमावली लागू करण्यात आली.
अनेक परदेशी प्रायोजकांनी भारतात म्युच्युअल फंड स्थापन केल्यामुळे म्युच्युअल फंड ची संख्या गेल्या काही वर्षांत वाढली आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूकीचा स्थिर प्रवाह आणि गुंतवणूक मध्ये दिवसेनदिवस वाढ होत आहे आणि गुंतवणूकदारांचे खात्यांची संख्या पण वाढत आहे. भारतीय म्युच्युअल फंड उद्योगाचा एकूण आकार 31 मे 2013 रोजी ₹ 8.68 ट्रिलियन वरून 31 मे 2023 पर्यंत ₹ 43.20 ट्रिलियन झाला आहे, 10 वर्षांच्या कालावधीत सुमारे 5 पटीने वाढला आहे. म्युच्युअल फंड उद्योगाची AUM 31 मे 2018 रोजी ₹ 22.60 ट्रिलियन वरून 31 मे 2023 पर्यंत ₹ 43.20 ट्रिलियन झाली आहे, 5 वर्षांच्या कालावधीत सुमारे 2 पटीने वाढ झाली आहे.31 मे 2018 रोजीच्या 7.34 कोटी फोलिओवरून 31मे2023 पर्यंत 14.74 कोटी गुंतवणूकदारांच्या फोलिओमध्ये 5 वर्षांच्या कालावधीत 2 पटीने वाढ झाली आहे.मे 2018 पासून गेल्या 5 वर्षांत दर महिन्याला सरासरी 12.32 लाख नवीन फोलिओ जोडले गेले आहेत.
म्युच्युअल फंड वितरकांकडून रिटेल बेसचा विस्तार करण्यासाठी मिळालेला पाठिंबा यामुळे उद्योगाच्या आकारात वाढ शक्य झाली आहे. म्युच्युअल फंड वितरक खेडेगावांमध्ये सुद्धा पोहचलेले आहेत त्यामुळे गुंतवणूकदार म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करण्यात सक्षम झाले आहेत आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करून गुंतवणुकीचा फायदा घेत आहेत, त्यामुळे Systematic investment plan (SIP)लोकप्रिय करण्यात म्युच्युअल फंड वितरकांचीही मोठी भूमिका आहे. एप्रिल 2016 मध्ये SIP खात्यांनी 1 कोटीचा टप्पा ओलांडला आहे आणि 31 मे 2023 पर्यंत एकूण SIP खाती 6.53 कोटी आहेत.
3.म्युच्युअल फंडात कोणी गुंतवणूक करावी आणि का ? | Who Should Invest in Mutual Funds and Why ?
ज्या गुंतवणूकदारांना शेअर बाजारामध्ये Investment करायची आहे पण शेअर बाजाराची माहिती किंवा अनुभव नाही पण share market मध्ये गुंतवणूक करून त्यांना त्यांची संपत्ती वाढवायची आहे अशा गुंतवणूकदार mutual fund मध्ये छोट्या रकमेतून गुंतवणूक करू शकतात. आणि तुमची भविष्यातील आर्थिक ध्येय म्हणजेच निवृत्तीनंतरचे खर्च, मुलांच्या उच्च शिक्षणासाठी पैसे आणि मुलीच्या लग्नासाठीचे पैसे, घर घेण्यासाठी, गाडी घेण्यासाठी,सहलीचे नियोजन करण्यासाठी अशाच प्रकारची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी mutual fund मध्ये गुंतवणूक करू शकता आणि भविष्यातील आर्थिक ध्येय अगदी सहजतेने पूर्ण करू शकता.
4.बाजाराच्या जोखमीच्या अधीन काय आहे ? | What is Subject to Market Risk ?
![म्युच्युअल फंड म्हणजे काय? | What is Mutual Funds ? म्युच्युअल फंड म्हणजे काय? | What is Mutual Funds ?](http://secretofmoney.in/wp-content/uploads/2023/07/WhatsApp-Image-2023-07-06-at-10.39.21-PM.jpeg)
mutual fund हे बाजारातील जोखमीच्या अधीन असतात. शेअर बाजार वरती जाईल की खाली येतील याचा अचूक अंदाज लावता येत नाही. म्युच्युअल फंड हे शेअर,कॉर्पोरेट बाॅड,सरकारी सिक्युरिटी यासारख्या विविध साधनांमध्ये गुंतवणूक करतात. कोविड,महागाई,राजकीय अशांतता आणि नैसर्गिक आपत्ती सारख्या बाजारातील जोखीम आहेत.
कोणतीही गुंतवणूक ही जोखिम मुक्त नसते पण आपण पोर्टफोलिओ चे वर्गीकरण करून, दीर्घकाळासाठी गुंतवणूक करून आर्थिक सल्लागाराच्या सल्ल्यानुसार गुंतवणूक करून जोखीम कमी करू शकतो. आणि परतावा मिळवण्यासाठी संयम ठेवून दीर्घकाल गुंतवणूक करणे आवश्यक आहे. तेव्हाच तुम्ही भविष्यकाळातील ध्येय मिळवू शकता. बाजारामध्ये अल्पावधीत जोखीम व अस्थिरता आहे तरीपण शेअर बाजाराने दीर्घ काळामध्ये इतर मालमत्ता वर्गापेक्षा आणि महागाई पेक्षा जास्त परतावा दिला आहे.
5.म्युच्युअल फंड योजनांचे प्रकार | Types of Mutual Fund Schemes
![म्युच्युअल फंड म्हणजे काय? | What is Mutual Funds ? म्युच्युअल फंड म्हणजे काय? | What is Mutual Funds ?](http://secretofmoney.in/wp-content/uploads/2023/07/Types-of-Mutual-funds.jpg)
Equity Mutual Fund–
-
Large Cap Fund
-
Mid Cap Fund
-
Small Cap Fund
-
Contra Fund
-
Focused Fund
-
Sector Fund
-
Equity-Linked Savings Scheme (ELSS)
Debt Mutual Fund–
-
Liquid Fund
-
Overnight Fund
-
Ultra Short Duration Fund
-
Short Duration Fund
Hybrid Mutual Fund
-
conservative hybrid funds
-
balanced hybrid funds
-
aggressive hybrid funds arbitrage funds
-
index funds
-
ETF funds.
Solution oriented schemes-
-
retirement and Children’s education.
वरील Mutual fund च्या प्रकारामध्ये आपण आपल्या गरजेनुसार म्हणजेच short term आर्थिक गरजांसाठी liquid fund आणि debt fund आणि long term आर्थिक गरजांसाठी equity यामध्ये गुंतवणूक करून भविष्यकाळातील आर्थिक गरजा पूर्ण करू शकतो….
July 29, 2023 @ 5:34 pm
खुपच छान माहिती दिली आहे सरळ आणि सोप्या भाषेत
July 30, 2023 @ 5:22 pm
Thanks
August 29, 2023 @ 11:11 am
खुप छान माहिती आहे
August 29, 2023 @ 5:48 pm
खूप छान माहिती आहे
September 3, 2023 @ 7:42 am
Knowledgeable information
September 3, 2023 @ 11:27 am
Knowledgeable information about mutual funds
September 5, 2023 @ 5:13 pm
Sip विषयी खूप छान माहिती मिळाली
September 10, 2023 @ 3:09 am
अगदी सरळ सोप्या भाषेत खूप छान माहिती आहे.
September 23, 2023 @ 9:31 am
Good information
October 6, 2023 @ 6:33 am
Knowledgeable information about mutual funds
October 11, 2023 @ 1:05 am
Knowledgeable information
October 12, 2023 @ 3:57 am
Knowledgeable information about mutual funds
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांनी केलेल्या 11 चुका | 11 Mistakes Investors Make While Investing In Mutual Funds
December 17, 2023 @ 6:05 pm
[…] करांच्या प्रभावाला कमी लेखतात. Mutual funds करपात्र घटना घडवू शकतात, जसे की […]