निश्चित उत्पन्नाचे 5 प्रकार | Best 5 Fixed Income Investments
निश्चित उत्पन्न म्हणजे गुंतवणूकदारांना गुंतवणूक केलेल्या तारखेपर्यंत निश्चित व्याज किंवा लाभांश दिला जातो व मुदतपूर्तीच्या वेळी त्यांची मूळ रक्कम दिली जाते. fixed income हे स्थिर उत्पन्न आहे व यामध्ये मुद्दल सुरक्षित राहते व त्यावरती परतावा मिळतो. Treasury bill, corporate bond, fixed deposit,सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी(public provident funds ),ज्येष्ठ नागरिक बचत योजना (senior citizen saving schemes) इत्यादी निश्चित उत्पन्न सिक्युरिटीजचे विविध प्रकार आहेत. गुंतवणुकीचे बरेच पर्याय उपलब्ध असल्याने गुंतवणूकदार त्यांचे पोर्टफोलिओमध्ये विविधता आणू शकतात. निश्चित उत्पन्न गुंतवणूक सुरक्षित ठेवण्यास मदत करेल व fixed income देईल.
1.ट्रेझरी बिल किंवा टी बिल | Treasury bills
T -bill हे भारत सरकारने जारी केलेले money market चे उपकरण आहे. t – bill अल्पमुदतीचे निश्चित उत्पन्न देणारी सिक्युरिटीज आहे. T -bill हे एका वर्षाच्या आत परिपक्व होतात. T -bill ही भारत सरकारने जारी केलेली short term debt instrument आहेत आणि सध्या ती 91 दिवस, 182 दिवस आणि 364 दिवस अशा तीन कालावधीमध्ये जारी केली जातात. ट्रेझरी बिलांवर 6.7 टक्के ते 7.2 टक्के मिळू शकतो.
T-bill मध्ये कमीत कमी गुंतवणूक 10,000 रुपये असते. भारतात treasury bill खरेदी करण्यासाठी, तुम्हाला सामान्यत: T-bill लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याची परवानगी असलेल्या बँक किंवा ब्रोकरमार्फत काम करावे लागेल. T-bill ठेवण्यासाठी तुम्हाला d mat खाते आणि ट्रेडिंग खाते आणि trading platform आवश्यक आहे. किंवा gilt mutual fund प्रामुख्याने सरकारी bond आणि सिक्युरिटीजमध्ये वेगवेगळ्या कालावधी आणि कूपन दरांसह गुंतवणूक करतात. mutual fund च्या माध्यमातून आपण gilt म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करू शकतो.आणि fixed income मिळवू शकतो.
2.कार्पोरेट बॉण्ड्स | Corporate bonds
कंपनी corporate bonds ऑफर करते त्याची किंमत आणि व्याजदर हे मोठ्या प्रमाणावर कंपनीच्या आर्थिक स्थिरतेवर आणि तिच्या पतपात्रतेवर अवलंबून असतात. उच्च क्रेडिट रेटिंग असलेले बॉण्ड सामान्यतः कमी कुपन दर देतात आणि ते जास्त सुरक्षित असतात व कमी क्रेडिट रेटिंग असलेले कार्पोरेट बॉण्ड्स जास्त कुपन दर देतात पण ते तुलनेने कमी सुरक्षित असतात.
खाजगी कंपन्या आणि सरकार यांना दैनंदिन गरजांसाठी पैशाची गरज लागते किंवा मोठ्या प्रकल्पांसाठी त्यांना पैशाची गरज लागते. पैशाची गरज पूर्ण करण्यासाठी सरकार खाजगी कंपन्या बॉण्ड जारी करतात. गुंतवणूकदारांना बॉण्ड मध्ये गुंतवणूक करून निश्चित उत्पन्न मिळते. गुंतवणूकदारांना त्यांनी दिलेल्या पैशाच्या बदल्यात निश्चित व्याजदर परतावा म्हणून देतात व मुदतपूर्तीच्या तारखेच्या वेळी गुंतवणूकदारांना मूळ रक्कम परत केली जाते.
उदाहरणार्थ:
समजा,खाजगी कंपनी किंवा सरकार १०० रुपये चे सममूल्य असणारे ८ टक्के व्याजदराने ५ वर्ष कालावधीचा बॉण्ड जारी करते. तेव्हा गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केलेली रक्कम ही पाच वर्षासाठी लॉक होते व पाच वर्षा पर्यंतच्या कालावधीसाठी आठ टक्के व्याजदराने प्रतिवर्षी व्याज दिले जाते . गुंतवणूकदाराला पाच वर्षासाठी प्रत्येक वर्षाला आठ रुपये व्याज दिले जाते ते व्याज जर गुंतवणूकदाराला मासिक, त्रैमासिक किंवा अर्धवार्षिक पाहिजे असेल तर गुंतवणूकदार घेऊ शकतो. गुंतवणूकदार fixed income मिळवण्या साठी bond मध्ये गुंतवणूक करून पोर्टफोलिओ मध्ये विविधता आणतात. गुंतवणूकदार Corporate bonds mutual funds मध्ये गुंतवणूक करू शकतो. आणि fixed income मिळवू शकतो.
3.बँक मुदत ठेवी | Bank Fixed Deposits
बँक मुदत ठेवी ही निश्चित उत्पन्न देणारी सर्वात सुरक्षित श्रेणी आहे. ट्रेझरी बिलांप्रमाणेच, गुंतवणुकीचे मॅच्युरिटी किंमत गुंतवणूकदारांना अगोदरच माहीत असते. ज्या गुंतवणूकदारांना जोखीम नको आहे असे गुंतवणूकदार fixed deposits ना प्राधान्य देतात.बँक मुदत ठेवींच्या सुरक्षिततेची हमी या मोठ्या बँकांकडून दिली जाते. FD मध्ये गुंतवणूक करून fixed income मिळवू शकतो.
4.सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी | Public Provident Funds
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PPF मध्ये गुंतवणूक करून आपण saving बरोबर कर बचत करू शकतो. PPF ला भारत सरकारचा पाठिंबा आहे आणि PPF जोखीम मुक्त परतावा देतो हे वित्त मंत्रालयाच्या राष्ट्रीय बचत संस्थेने सादर केलेले आहे. आयकर लाभा बरोबर बचत एकत्रित करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
वित्त मंत्रालयाने PAN आणि आधार क्रमांक अनिवार्य केले आहेत. तुम्हाला 15 वर्षांसाठी दरवर्षी किमान एक ठेव जमा करावी लागेल. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी मध्ये एका कॅलेंडर वर्षात फक्त १२ व्यवहार करण्याची परवानगी आहे. PPF खात्यामध्ये एका वर्षात कमीत कमी १०० रुपये आणि जास्तीत जास्त १.५ लाख रुपयांचे खाते उघडता येते. १.५ लाखापेक्षा जास्त रक्कम PPF मध्ये जमा करू शकत नाही.
PPF खाते १५ वर्षात मॅच्युअर होते. मुदत पूर्तीच्या एक वर्ष अगोदर प्रत्येकी पाच वर्षाच्या ब्लॉगमध्ये आपण मुदत वाढवू शकतो. PPF वर व्याजाचा दर ७.१० % आहे त्याचा त्रेमासिक आढावा घेतला जातो. वार्षिक 7.1% व्याजदर गृहीत धरल्यास, एका वर्षासाठी पीपीएफ मध्ये 5000 रुपये च्या गुंतवणुकीवर मिळणारे व्याज अंदाजे 355 रुपये असेल. वर्षाच्या शेवटी खात्यातील एकूण शिल्लक 5000 + 355 = ५३५५ रुपये आणि गुंतवलेली रक्कम मिळालेले व्याज आणि प्राप्त झालेली परिपक्वता रक्कम ही आयकर कायदा १९६१ च्या कलम ८०सी अंतर्गत PPF व्याज आणि परिपक्वता रक्कम करमुक्त आहे.
PPF योजनेअंतर्गत आंशिक पैसे काढण्याची परवानगी आहे. तुम्ही तुमच्या PPF खात्यातील 50% रक्कम सात वर्षांनंतर काढू शकता. पैसे काढण्यासाठी तुम्ही PPF पासबुक आणि बँक/पोस्ट ऑफिसमध्ये अर्ज सादर करणे आवश्यक आहे. काढलेली रक्कम आयकराच्या अधीन नाही. PPF मध्ये गुंतवणूक करून fixed income मिळवू शकतो.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी उत्पन्नाचे तोटे | Disadvantages of Public Provident Fund Income
-
15 वर्षांचा लॉक-इन कालावधी आहे.
-
HUF किंवा NRI द्वारे खाते उघडता येत नाही.
-
PPF खात्यात जमा करता येणारे कमाल पेमेंट 5 लाख आहे.
-
कोणतीही तरलता (Liquidity)अस्तित्वात नाही.
5.ज्येष्ठ नागरिक बचत योजना | Senior Citizen Savings Scheme
ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींसाठी बचत साधन आहे. ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या निवृत्तीनंतर स्थिर आणि सुरक्षित उत्पन्नाचा स्रोत मिळावा या उद्देशाने भारत सरकारने ही योजना सुरू केली आहे. ही योजना post office मध्ये जाऊन सुरू करू शकतो व या योजनेला सरकारचे समर्थन असल्याने रक्कम सुरक्षित राहते. या योजनेमध्ये ३० लाखापर्यंत पैसे गुंतवणूक करू शकतो याचा कालावधी पाच वर्षाचा असतो.तो आणखी 3 वर्षांसाठी वाढवला जाऊ शकतो प्रभावीपणे कालावधी 8 वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. फॉर्म बी भरल्यानंतर 3 वर्षासाठी परवानगी घेऊन फक्त एकदाच कालावधी वाढवला जाऊ शकतो.
senior citizen saving scheme या योजनेचा व्याजदर ८.२ टक्के आहे व या योजनेचे व्याज प्रत्येकी तीन महिन्याने आपल्या बँक अकाउंट मध्ये जमा होते म्हणजेच एप्रिल जुलै ऑक्टोंबर जानेवारी या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये व्याज बँक अकाउंट मध्ये जमा होते व योजनेचा व्याजदर हा प्रत्येक तीन महिन्यांनी आढावा घेऊन गरज असल्यास बदलला जाऊ शकतो. गुंतवणुकीच्या काळात घोषित केलेला व्याजदर संपूर्ण मुदतीच्या कालावधीत स्थिर राहतो आणि नंतरच्या तिमाहीत बदलांमुळे प्रभावित होत नाही.
* निश्चित उत्पन्नाचे फायदे | Fixed Income Advantages
विविधकरण | Diversification
Fixed income देणाऱ्या मालमत्ता वर्गामध्ये गुंतवणूक करून विविधकरण चा फायदा मिळतो. म्हणजेच सर्व अंडी एकाच टोपलीत राहत नाहीत. सेवानिवृत्त investor जे जास्त risk घेऊ शकत नाहीत ते fixed income देणाऱ्या मालमत्ता वर्गामध्ये जवळच्या कालावधीसाठी गुंतवणूक करून कमी जोखीम मध्ये चांगला परतावा मिळवू शकतात.
* निश्चित उत्पन्नाचे तोटे | Fixed Income Risks
-
व्याजदर जोखीम |Interest Rate Risk : निश्चित उत्पन्न देणाऱ्या मालमत्ता वर्गामध्ये गुंतवणूक करून निश्चित उत्पन्न मिळते. पण जेव्हा व्याजदर कमी असतात तेव्हा रोख्यांच्या (bond) किंमती जास्त असतात पण जेव्हा interest वाढतात तेव्हा Bond च्या किंमती कमी होतात आणि हे व्याजदराच्या किंमतीतील बदल fixed income गुंतवणुकीच्या किमतींवर परिणाम करतो. व्याजदरातील हालचालीमुळे मार्केटमध्ये Bond च्या किमतीमध्ये अस्थिरता निर्माण होते. व त्यामुळे दीर्घकालावधीच्या बॉण्डसाठी जोखीम जास्त असते.
-
महागाईचे धोके | Inflation risk: जेव्हा महागाई वाढते तेव्हा निश्चित उत्पन्न देणाऱ्या मालमत्ता वर्गामधून जो परतावा मिळतो त्या उत्पन्नाची क्रयशक्ती म्हणजेच पैशाने वस्तू विकत घेण्याची क्षमता (purchasing power) कमी होते. हा fixed income देणाऱ्या मालमत्ता वर्गामध्ये गुंतवणूक करण्याचा धोका आहे.
-
तरलता जोखीम | Liquidity risk : निश्चित उत्पन्न देणाऱ्या मालमत्ता मध्ये गुंतवणूक केली व ज्यावेळी आपणास विक्री करायची आहे त्यावेळी आपण जी विक्रीसाठी ठरवलेली किंमत व खरेदी दाराचे किंमत यामधलील फरक म्हणजे liquidity risk होय. यामुळे मार्केटमध्ये गुंतवणूक केलेल्या पैशापेक्षा कमी किमतीमध्ये आपणास गुंतवणूक विकण्यास भाग पाडले जाऊ शकते. आपणास पैशाची गरज असते त्यावेळी लॉक-इन कालावधी मध्ये गुंतवणूक असेल तर ते पैसे आपण काढू शकत नाही हा fixed income देणाऱ्या मालमत्ता वर्गामध्ये गुंतवणूक करण्याचा तोटा आहे.
- उधारीची जोखीम |Credit Risk : जेव्हा कंपनी डिफॉल्ट होण्याची शक्यता असते अशावेळी Bond धारक त्यांची सर्व मुद्दल गमावू शकतात. fixed income देणाऱ्या मालमत्ता मध्ये जोखीम असते पण मुडीज, कार्पोरेशन किंवा फीच रेटिंग्स सारख्या बॉण्ड रेटिंग एजन्सी कडून क्रेडिट रेटिंग देऊन जोखमीचा अंदाज गुंतवणूकदारांना दिला जातो.
जे investor अधिक जोखीम घेऊ शकतात ते equity मध्ये अधिक मालमत्ता वाटप करून गुंतवणूक करतात आणि विविधीकरणासाठी काही पैसे bond , debt market मध्ये ठेवतात. पण गुंतवणूकदारांचे वय वाढत जाते तसे त्यांची जोखीम घेण्याची क्षमता कमी होते अशावेळी fixed income देणाऱ्या मालमत्ता वर्गामध्ये सेवानिवृत्तीच्या वेळी अनेक गुंतवणूकदार निश्चित उत्पन्ना साठी आणि भांडवलाच्या संरक्षणासाठी fixed income देणाऱ्या उत्पादन वर्गामध्ये गुंतवणूक करतात.
* निश्चित उत्पन्नामध्ये गुंतवणूक कशी करावी | How to invest in fixed income :
Retail investor थेट bond मध्ये गुंतवणूक करू शकतो. पण खरेदी करताना उच्च व्यवहार खर्च आणि उच्च गुंतवणूक करावी लागते. त्याऐवजी वैयक्तिक गुंतवणूकदारासाठी विविध निश्चित उत्पन्न गुंतवणुकीत प्रवेश करण्यासाठी mutual fund हा सर्वात सोपा मार्ग आहे. निश्चित उत्पन्न म्युच्युअल फंड हे सरासरी गुंतवणूकदारा साठी निश्चित उत्पन्न मिळवण्याचा लोकप्रिय मार्ग आहे. म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांचे पैसे एकत्र करतो आणि त्या भांडवलाचा वापर Bond सह विविध सिक्युरिटीज खरेदी करण्यासाठी करतो. विविध प्रकारचे Bond fund आहेत त्यामध्ये समतोल निधी वाटप करतो यामधून तुम्हाला Bond ची एक टोपली मिळते. ज्यामुळे विविधता वाढते आणि जोखीम कमी होते.
वरील fixed income मिळण्याच्या प्रकारामध्ये गुंतवणूक करून आपण निश्चित व सुरक्षित उत्पन्न मिळवू शकतो.
महागाई म्हणजे काय ? | What is Inflation ?
August 2, 2023 @ 7:25 am
for saving – fixed income asset class
for investing – Variable income asset class
Priyanka
August 29, 2023 @ 11:12 am
खुप छान माहिती आहे
Dipali .
August 29, 2023 @ 5:49 pm
Nice information
Rajaram Chawde
September 3, 2023 @ 7:46 am
खुप छान माहिती आहे.
Ram
September 3, 2023 @ 11:28 am
खुप छान माहिती आहे
Shivanjali
September 5, 2023 @ 5:27 pm
Knowledgeable information about fixed income
Anjali
September 10, 2023 @ 3:09 am
अगदी सरळ सोप्या भाषेत खूप छान माहिती आहे.
Swaraj
September 23, 2023 @ 8:19 am
Knowledgeable information about fixed income
Archana patil
October 6, 2023 @ 6:36 am
Helpful information
Jaya
October 11, 2023 @ 1:05 am
Nice information
Jayashree thorat
October 12, 2023 @ 3:57 am
Knowledgeable information about fixed income