SWP म्हणजे काय ? | What is SWP in mutual fund ?
प्रत्येक गुंतवणूकदाराची आर्थिक गरज ही वेगवेगळी असते त्यानुसार म्युच्युअल फंड वेगवेगळ्या योजना तयार करते. त्यामध्ये काही गुंतवणूक दारांना एक रकमी (Lumpsum ) गुंतवणूक करावयाची असते तर काहींना SIP मधून नियमित गुंतवणूक करावयाची असते किंवा काही गुंतवणूकदार भांडवली नफा मिळण्यासाठी गुंतवणूक करतात तर काही गुंतवणूकदार नियमित उत्पन्न मिळावे यासाठी गुंतवणूक करतात .
विविध गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी गुंतवणुकीच्या उद्दिष्टा नुसार म्युच्युअल फंडद्वारे वेगवेगळ्या सुविधा तयार केल्या जातात तर अशाच एका सुविधे विषयी आपण आज माहिती घेणार आहोत त्याचे नाव ” Systematic Withdrawal Plan “(SWP) आहे . या लेखात आपण सिस्टिमॅटिक विथडॉल प्लॅन ची माहिती घेऊयात…
नियमित अंतराने ठराविक रक्कम म्युच्युअल फंड मधून SWP द्वारे काढण्यासाठी जी सुविधा दिली आहे त्यास Systematic Withdrawal Plan असे म्हणतात. Systematic Withdrawal Plan द्वारे निवडलेल्या तारखे दिवशी रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा केली जाते.
काही गुंतवणूकदार नियमित अंतराने ठराविक रक्कम मिळवण्यासाठी बँक मध्ये Fixed diposit करतात किंवा पोस्ट ऑफिस ठेवी यामध्ये गुंतवणूक करतात पण कमी व्याजदरामुळे व भविष्यातील व्याजदर कमी होण्याची चिंता असल्यामुळे गुंतवणूकदार महागाईपेक्षा जास्त परतावा मिळवण्यासाठी कमी जोखीम घेऊन म्युच्युअल फंड ची निवड करून ज्या गुंतवणूकदारांना स्वतःची पेन्शन तयार करायची आहे त्यानुसार जोखीम क्षमता ठरवून स्वतःची पेन्शन तयार करण्यासाठी म्हणजेच निवडलेल्या वारंवारतेनुसार नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी SWP सुरू करतात.
2. SWP मध्ये कोण गुंतवणूक करू शकतात ? | Who can invest in SWP ?
Systematic Withdrawal Plan ही म्युच्युअल फंड ची योजना आहे ज्यामध्ये गुंतवणूकदार म्युच्युअल फंड मध्ये मोठ्या रकमेची गुंतवणूक करून नियमित अंतराने ठराविक रकमेची गरज आहे असे गुंतवणूकदार SWP मध्ये गुंतवणूक करू शकतात.
जर तुमच्याकडे मोठी रक्कम असेल व तुम्हाला तुमच्या गरजेसाठी मासिक , त्रेमासिक, अर्धवार्षिक , वार्षिक काही ठराविक रकमेची गरज असेल तर तुम्ही SWP च्या माध्यमातून ठराविक रक्कम म्युच्युअल फंड मधून काढू शकता व तुमच्या गरजा पूर्ण करू शकता.
तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केलेली रक्कम बाजारातील हालचालीनुसार कमी जास्त होत असते व तुमच्या गरजेनुसार यातून परतावा ही दिला जातो या SWP या प्रकारां मधून जर तुम्हाला पैसे जर काढावयाचे असतील तर गुंतवणूक केलेली रक्कम ही दीर्घ कालावधीसाठी ठेवणे गरजेचे आहे म्हणजे दीर्घ कालावधीसाठी तुम्हाला नियमित उत्पन्न याच्याबरोबर गुंतवणूक केलेली रक्कम ही वाढुन त्यापासून चांगला परतावा मिळू शकतो.
3.म्युच्युअल फंड मधून SWP द्वारे नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी खालील माहिती समजून घेणे गरजेचे आहे .
1. ध्येय निश्चित करा | Define Your Goals
तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये मोठ्या रकमेची गुंतवणूक करून Systematic Withdrawal Plan च्या माध्यमातून पैसे काढण्याचे ध्येय निश्चित करा. कारण जेव्हा तुम्ही तुमचे ध्येय निश्चित करता त्यानुसार तुम्हाला किती रकमेची गरज आहे व कधी आहे हे समजण्यास मदत होईल.
2. योग्य म्युच्युअल फंडची निवड करा | Choose the Right Mutual Fund
तुम्ही ज्या म्युच्युअल फंडच्या योजनेमध्ये गुंतवणूक करणार आहात तो म्युच्युअल फंड तुमची आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करतो का नाही हे पहा म्हणजे म्युच्युअल फंडचा परतावा, तुमची जोखीम घेण्याची क्षमता आणि म्युच्युअल फंड मधील जोखीम याविषयी माहिती घ्या आणि ज्या म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणार आहात त्याचा सातत्यपूर्ण परतावा आहे का नाही ते पाहून गुंतवणूक करा.
3. पैसे काढण्याची वारंवारता ठरवा | Decide on Withdrawal Frequency
तुम्ही Systematic Withdrawal Plan च्या माध्यमातून किती वेळा पैसे काढणार आहेत हे ठरवा म्हणजे मासिक ,त्रेमासिक, अर्धवार्षिक किंवा वार्षिक तुम्ही पैसे काढू शकता तुमच्या उत्पन्नाच्या गरजा आणि आर्थिक नियोजनाची अनुकूल असेल अशी पैसे काढण्याची वारंवारता ठरवा.
4. पैसे काढण्याच्या रकमेची गणना करा | Calculate Withdrawal Amount
Systematic Withdrawal Plan च्या माध्यमातून पैसे काढण्यासाठी पैसे किती काढावे याचे कॅल्क्युलेशन करा. पैसे काढताना प्रथम ज्या म्युच्युअल फंड मध्ये आपण गुंतवणूक केली आहे त्याचा परतावा किती आहे हे पहा व तुम्हाला किती रकमेची गरज आहे हे निश्चित करा आणि हे ठरवून पैसे काढताना तुमची मुद्दल कमी होणार नाही याची काळजी घेऊन पैसे काढा म्हणजे ठराविक कालावधीनंतर तुम्ही गुंतवलेली रक्कम ही वाढेल व तुमच्या गरजेपुरती रक्कम ही तुम्हाला मिळेल अशी रक्कम निश्चित करा .
समजा, तुम्ही 10 वर्षाच्या कालावधीसाठी 10 लाख रुपये म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केली व म्युच्युअल फंडचा परतावा 12 टक्के या दराने मिळाला व 7.2 टक्के दराने वार्षिक 72,000 रूपये जर तुम्ही SWP च्या माध्यमातून काढले तर तुम्हाला 10 वर्षांमध्ये SWP च्या माध्यमातून 7,20,000 एवढी रक्कम मिळाली असेल व तुम्ही गुंतवणूक केलेल्या 10 लाखाची आत्ताची किंमत 17,74,268 एवढी असेल .
SWP CALCULATOR
प्रारंभिक गुंतवणूक = 10,00,000 ₹
वार्षिक परतावा दर = 12%
वर्षांची संख्या = 10
वार्षिक पैसे काढण्याचा दर = 7.2 %
————————————–
प्रारंभिक गुंतवणूक = 10,00,000 ₹
एकूण पैसे काढणे =7,20,000 ₹
अंतिम मूल्य = 17,74,268 ₹
5. म्युच्युअल फंड मधून पैसे काढण्यासाठी SWP निवडा | Select SWP to withdraw from mutual fund
म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केल्यानंतर Systematic Withdrawal Plan साठी फॉर्म भरा व तुम्हाला किती रक्कम पाहिजे कधी पाहिजे हे ठरवून त्यासाठी आवश्यक असणारी बँक खात्याची माहिती देऊन त्या बँक खात्यावरती तुमच्या गरजेनुसार रक्कम घ्या.
6. गुंतवणुकीचा आढावा घ्या | Review the investment
तुम्ही ज्या म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केली आहे त्याचा नियमित आढावा घ्या आणि बाजारच्या कामगिरी नुसार फंड कसा कामगिरी करतो आहे हे पहा. म्युच्युअल फंडच्या कामगिरी नुसार आणि तुमच्या आर्थिक गरजा मधील बदलानुसार तुम्ही Systematic Withdrawal Plan च्या माध्यमातून रक्कम वाढवणे किंवा कमी करणे आवश्यक आहे.
7. कर धोरण ठरवा | Determine tax policy
म्युच्युअल फंड मधून SWP च्या माध्यमातून आपण वार्षिक किती रक्कम काढल्यानंतर आपणास किती कर भरावा लागणार आहे याची माहिती घ्या म्हणजे एका आर्थिक वर्षांमध्ये किती भांडवली नफा आपणास करमुक्त आहे आणि वाढीव रकमेवर किती कर भरावा लागणार आहे हे आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊन त्यानुसार योजनेची निवड करा.
8.आपत्कालीन निधी तयार करा | Create an emergency fund
म्युच्युअल फंड मध्ये Systematic Withdrawal Plan च्या माध्यमातून तुम्ही आर्थिक गरजेनुसार जरी रक्कम घेत असला तरी वाढीव खर्चासाठी आपत्कालीन निधी तयार करणे खूप गरजेचे आहे तुम्ही तुमच्या सर्व आर्थिक गरजांसाठी फक्त SWP वर अवलंबून राहणे योग्य नाही त्यासाठी आपत्कालीन निधी किंवा इतर गुंतवणूक मधून उत्पन्नाचे स्त्रोत असणे गरजेचे आहे त्यासाठी मालमत्तेमध्ये वर्गीकरण करून गुंतवणूक करा.
9. बाजारातील परिस्थितीचे निरीक्षण करा | Monitor market conditions
तुम्ही गुंतवणूक केलेल्या म्युच्युअल फंड च्या कामगिरीवर लक्ष ठेवा आणि जर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत असेल किंवा तुमच्या फंडाची कामगिरी तुमच्या अपेक्षा पूर्ण करत नसेल तर तुमच्या धोरणामध्ये बदल करा.
10. म्युच्युअल फंड मधील नियम आणि कर आकारणी नियम याविषयी माहिती मिळवा| Get information about mutual fund rules and taxation rules
तुम्ही ज्या म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केलेली आहे त्या म्युच्युअल फंड चे नियम आणि कर आकारणी नियम आणि बाजारातील परिस्थिती मधले जे बदल होत आहेत त्या बदलांची माहिती घेऊन Systematic Withdrawal Plan धोरणावर काही परिणाम करू शकतात याबद्दल माहिती घ्या . त्यानुसार Systematic Withdrawal Plan च्या गुंतवणूक धोरणामध्ये बदल करा.
4. Benefits of SWP | SWP चे फायदे
1.लवचिकता | Flexibility
Systematic Withdrawal Plan योजनेमध्ये गुंतवणूकदाराला त्याच्या गरजेनुसार रक्कम काढण्याची वारंवारता आणि तारीख निवडण्याची लवचिकता असते त्याप्रमाणे गुंतवणूकदार कोणत्याही वेळी SWP मधून रक्कम काढण्याचे थांबवू शकतो किंवा अजून गुंतवणूक करू शकतो किंवा निश्चित रक्कम काढण्यापेक्षा जास्त रक्कम ही काढून शकतो या सर्व प्रकारची लवचिकता गुंतवणूकदाराला मिळते.
2. नियमित उत्पन्न | Regular income
गुंतवणूकदारांना नियमित खर्च भागवण्यासाठी नियमित रोख रकमेची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी SWP मधून गुंतवणूकदाराला त्याच्या गुंतवणुकीतून नियमित उत्पन्न देण्याची सुविधा आहे.
3. भांडवली नफा | Capital Appreciation
जर गुंतवणूकदाराने Mutual fund च्या परताव्यापेक्षा कमी रक्कम जर SWP च्या माध्यमातून घेतली तर म्हणजे जर म्युच्युअल फंड मधून परतावा 12 टक्के असेल आणि तुम्ही नियमित SWP द्वारे 7.2 टक्के वार्षिक नियमित उत्पन्न घेतले तर आणि गुंतवणूकदाराने दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केली तर गुंतवणूकदाराला नियमित उत्पन्न बरोबर भांडवली नफा सुद्धा मिळतो.
Systematic Withdrawal Plan हा तुमच्या गुंतवणूकीमधुन नियमित उत्पन्न मिळण्याचा एक मार्ग आहे तुमचे धोरण तुमचे विशिष्ट आर्थिक उद्दिष्टे नुसार आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊन गुंतवणूक करा आणि तुमच्या भविष्यातील गरजांसाठी नियमित अंतराने ठराविक रक्कम घ्या व आर्थिक स्वातंत्र्य मिळवा.
Dipali .
August 27, 2023 @ 4:21 am
नियमित उत्पन्न आणि महागाई पेक्षा जास्त परतावा मिळवण्यासाठी SWP विषयी छान माहिती मिळाली.
Rajaram Chawde
August 27, 2023 @ 11:00 am
Swp बद्दल खूप छान माहिती मिळाली
Priyanka
August 29, 2023 @ 10:50 am
छान माहिती आहे
Ram
September 3, 2023 @ 8:09 am
Swp बद्दल खूप छान माहिती मिळाली
Shivanjali
September 5, 2023 @ 3:15 pm
Swp विषयी खूप छान माहिती आहे .
Anjali
September 10, 2023 @ 3:20 am
अगदी सरळ सोप्या भाषेत खूप छान माहिती आहे.
Archana patil
October 6, 2023 @ 5:24 am
Nice information
Jaya
October 11, 2023 @ 1:35 am
Knowledgeable information about SWP
Jayashree thorat
October 12, 2023 @ 3:45 am
Nice information
Atish More
December 2, 2023 @ 4:20 pm
म्युचल फंडच्या माध्यमातून इक्विटी मार्केटमध्ये सर्व सामान्य व्यक्तीने इन्व्हेस्टमेंट कशी करावी,केव्हा करावी. म्युचल फंड चे वेगवेगळे प्रकार आणि त्यानुसार वेगवेगळ्या रिटर्न्स कशा भेटतात.ती अगदी सरळ सोप्या मराठी भाषेमध्ये योग्य माहिती या ठिकाणी मिळाली त्याबद्दल धन्यवाद. वरील लेखामध्ये म्युचल फंड च्या माध्यमातून एस डब्ल्यू पी कशी करावी आणि त्यातून नियमित परतावा कसा मिळवावा हे अगदी साध्या सोप्या आणि सरळ भाषेमध्ये सर्व सर्वांना समजेल असं सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी माहिती मिळाली त्याबद्दल सुधीर सरांचे मनापासून धन्यवाद. अशीच इन्व्हेस्टमेंट बद्दलची माहिती तुम्ही वेळोवेळी या लेखांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद.