SIP vs Lumpsum – Which is Better Investment
SIP vs Lumpsum असा गुंतवणूकदाराला Mutual fund मध्ये गुंतवणूक करताना नेहमी एक प्रश्न पडतो. म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याच्या SIP आणि LUMPSUM या दोन्ही पद्धती आहेत. पण Mutual fund मध्ये गुंतवणूक करताना केव्हा Systematic Investment Plans द्वारे गुंतवणूक केली पाहिजे केव्हा एक रकमी गुंतवणूक केली पाहिजे हे समजून घेणे गरजेचे आहे. या दोन्ही मोडद्वारे गुंतवणूक करण्या अगोदर आपली जोखीम क्षमता, आर्थिक उद्दिष्ट , आणि कोणत्या योजनेमध्ये गुंतवणूक करतोय यावरती निवड अवलंबून आहे.
SIP म्हणजे म्युच्युअल फंड्सने गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांना दरमहा नियोजनबद्ध पद्धतीने गुंतवणूक करण्यासाठी जी सोय केलेली आहे त्यास Systematic Investment Plans असे म्हणतात. गुंतवणूकदार म्हणून तुम्ही तुमचे लक्ष गुंतवणुकीच्या धोरणापेक्षा दीर्घकालीन गुंतवणुकीवर असायला हवे.
तुम्ही रोख प्रवाहावर आधारित गुंतवणूक करावी. म्हणजे तुम्ही मासिक पगारदार असाल किंवा व्यवसायिक असल्यास जर तुमच्याकडे मासिक उत्पन्न येत असेल तर तुम्ही गुंतवणूक करण्याचा मार्ग Systematic Investment Plans निवडला पाहिजे म्हणजे तुमच्या आर्थिक स्थितीवर ताण न येता अगदी 500 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. आणि गुंतवणूक करताना गुंतवणुकीचा कालावधी , रक्कम आणि ध्येय ठरवून दीर्घकालीन गुंतवणूक करावी म्हणजे दीर्घ कालावधीमध्ये तुम्ही संपत्ती निर्मिती (wealth creation )करू शकता.
2. SIP द्वारे गुंतवणूक करण्यासाठीचे काही मुद्दे खालील प्रमाणे
1 किमान गुंतवणूक | Minumum investment
Systematic Investment Plans द्वारे Mutual fund मध्ये गुंतवणूक करणे तुम्हाला आर्थिक शिस्त लावते. तुम्ही मासिक कमीत कमी 500 रुपयापासून पुढे रक्कम गुंतवणूक करू शकता यामध्ये गुंतवणूक स्वयंचलित असते.
2 बाजाराची वेळ | Market Timing
तुम्ही मासिक एक ठराविक रक्कम, ठराविक तारखेला sip द्वारे mutual fund मध्ये पाठवू शकता . त्यामुळे गुंतवणूक करताना मार्केट टाइमिंग करण्याची गरज नसते. तुम्हाला एस आय पी द्वारे गुंतवणूक करण्यासाठी मार्केटमध्ये खूप माहिती असण्याची गरज नाही.
3 खरेदीची सरासरी किंमत | Rupee cost Averaging तुम्ही जेव्हा ठराविक रक्कम , ठराविक तारखेला म्युच्युअल फंड द्वारे गुंतवणूक करता तेव्हा मार्केटमधील मोठ्या वाढीचा किंवा मोठ्या घसरणीचा तोटा तुम्हाला सहन करावा लागत नाही कारण की जेव्हा बाजार घसरतो तेव्हा तुम्ही Systematic Investment Plans द्वारे गुंतवणूक करून जास्त UNIT खरेदी करता आणि जेव्हा मार्केट वाढते तेव्हा थोडे कमी UNIT खरेदी करता परंतु SIP मोडद्वारे गुंतवणूक केल्यामुळे खरेदीची सरासरी किंमत (Rupee cost Averaging) मिळून दीर्घ कालावधीमध्ये तुम्हाला चांगला परतावा मिळतो म्हणजेच तुम्हाला चक्रवाढ व्याज ( compound interest ) चा फायदा मिळतो. तुम्हाला एस आय पी द्वारे गुंतवणूक करण्यासाठी मार्केटमध्ये खूप माहिती असण्याची गरज नाही.
4 शिस्तबद्ध दृष्टीकोन | Disciplined Approach
शिस्तबद्ध बचत सवयीला प्रोत्साहन देण्यासाठी Systematic Investment Plans हा गुंतवणूकदारासाठी चांगला मार्ग आहे कारण यामध्ये स्वयंचलित गुंतवणूक केली जाते आणि नवशिक्यांसाठी ही आदर्श गुंतवणुकीचा मार्ग आहे कारण यामध्ये आपण छोट्या रकमेपासून गुंतवणूक करण्यास सुरुवात करू शकतो . यामध्ये गुंतवणुकीसाठी मोठ्या रकमेची गरज नाही.
5 लवचिकता | Flexibility
तुम्हाला तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार Systematic Investment Plans ची रक्कम वाढवण्यास, कमी करण्यास किंवा थांबवण्यास काहीही अडचण येत नाही तुम्ही जेव्हा ठरवाल तेव्हा तुम्ही वरील निर्णय घेऊ शकता.
2. एकरक्कमी गुंतवणूक केव्हा करावी? | When to invest through Lumpsum?
तुमच्याकडे जर मोठी रक्कम असेल आणि जर तुम्हाला म्युच्युअल फंडात एकरक्कमी गुंतवणूक करायची असेल तर दीर्घ कालावधीसाठी जी गुंतवणूक करणार आहात ती तुम्ही एकरक्कमी केव्हाही करू शकता .
पण जर अल्प कालावधीसाठी जर तुम्ही एकरक्कमी गुंतवणूक करणार असेल तर शेअर बाजार ची सखोल माहिती असणे गरजेचे आहे जर तुम्ही अल्प कालावधीसाठी एकरक्कमी गुंतवणूक केली आणि जर काही कारणामुळे मार्केट जर खाली आले तर तुमच्या पोर्टफोलिओ मधील रक्कमेमध्ये घसरण होईल म्हणजेच तुम्ही गुंतवणूक केलेली रक्कम कमी होऊन तुम्हाला तोटा दिसेल आणि जेव्हा मार्केट तुम्ही गुंतवणूक केलेल्या रक्कमेच्या वरती जाईल त्यानंतर तुम्हाला फायदा दिसायला चालू होईल .
पण मार्केट मधील ही घसरण ही दीर्घकालीन गुंतवणूकदारासाठी फायदेशीर असते कारण गुंतवणूकीसाठी जर मार्केटच्या पडत्या काळात गुंतवणूक केली तर भविष्यात त्याचा मोठा परतावा मिळतो कारण मार्केटमध्ये जेव्हा घसरण होते तेव्हा म्युच्युअल फंडच्या NAV (Net Asset Value ) कमी होते त्यावेळी आपण जर एकरक्कमी गुंतवणूक केली तर तेव्हा आपणास जास्त Unit मिळतात. त्यामुळे अशा मार्केटमधील घसरणीला न घाबरता ती एक दीर्घकालीन गुंतवणूक करण्याची संधी आहे हे समजून गुंतवणूक वाढवावी याला (add on)पर्याय असे म्हणतात.
3.Lumpsum गुंतवणूक करण्याचे काही मुद्दे खालील प्रमाणे
1 मोठी गुंतवणूक | Single Large investment
Lumpsum गुंतवणूक एकाच वेळी मोठ्या रक्कमेची गुंतवणूक करावी लागते. जर तुमच्याकडे मोठी रक्कम असेल आणि ती तुम्हाला दीर्घ कालावधीसाठी लागणार नसेल तर तुम्ही एकरक्कमी गुंतवणूक करू शकता.
2 बाजाराची वेळ | Market timing
Lumpsum गुंतवणूक मध्ये बाजाराची सखोल माहिती असणे गरजेचे आहे. बाजारातील अस्थिरतेचा सामना करावा लागतो कारण एक रक्कमी जेव्हा तुम्ही गुंतवणूक करणार आहे तेव्हा Market timing जर चुकले आणि आपण गुंतवणूक केल्यानंतर मार्केट जर खाली गेले तर जोपर्यंत आपण गुंतवणूक केलेल्या बाजार भावावरती मार्केट येत नाही तोपर्यंत आपणास परतावा मिळत नाही यासाठी मार्केटची माहिती असणे गरजेचे आहे.
3 उच्च जोखीम / चांगला परतावा मिळण्याची शक्यता | Higher Risk /Reward Potential बाजाराच्या परिस्थितीनुसार एक रक्कमी गुंतवणुकीमुळे एसआयपीच्या तुलनेत जास्त फायदा किंवा तोटा होण्याची शक्यता असते. कारण जर तुम्ही एक रक्कमी गुंतवणूक केली आणि Market वरती गेले तर लगेच Profit होते व जर Market मध्ये घसरण झाली तर लगेच तोटा होतो पण SIP मोडद्वारे गुंतवणूक केली तर खरेदीची सरासरी किंमत मिळते व आणि जोखीम ही कमी असते .
4 कमी स्वयंचलित | Less Automated
एक रकमी गुंतवणूक मोडमध्ये नियमित गुंतवणूक करावी लागत नाही त्यामुळे गुंतवणूकदारास शिस्तबद्ध बचतीची सवय लागू शकत नाही.
4. SIP vs LUMPSUM यांची निवड करताना हे घटक विचारात घ्या. | Factors to consider in the choice SIP or Lumpsum.
1 जोखीम सहनशीलता | Risk tolerance
तुमची जोखीम घेण्याची सहनशीलता आणि बाजारातील चढ-उतार सहन करण्याची क्षमता यानुसार
किंवा LUMPSUM या गुंतवणूक साधनांची निवड करा.
2 आर्थिक परिस्थिती | Financial situation
तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार आणि तुमच्याकडे उपलब्ध असणाऱ्या निधीनुसार Systematic Investment Plans किंवा LUMPSUM गुंतवणूक साधनांची निवड करा. म्हणजे थोडी रक्कम असेल तर एस आय पी मध्ये आणि मोठी रक्कम असेल तर दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एक रकमी मध्ये गुंतवणूक करावी.
3 बाजार परिस्थिती | market condition
वर्तमानातील बाजाराची परिस्थिती आणि संभाव्य भविष्यातील market trend हे समजून Systematic Investment Plans किंवा LUMPSUM यांची निवड करणे गरजेचे आहे. जर मार्केटचा Trend up आहे व काही कारणामुळे जर मार्केट खाली आले असेल तर अशावेळी तुम्ही एक रक्कमी या मोडद्वारे गुंतवणूक करून या संधीचा फायदा घेऊ शकता. पण Market trend ओळखता येत नसेल तर SIP द्वारे गुंतवणूक करावी.
4 गुंतवणुक विविधता | Diversification of investment
तुम्हाला एकाच मोडद्वारे किंवा एकाच फंडमध्ये गुंतवणूक करावयाची नसेल म्हणजे तुम्हाला गुंतवणुकीमध्ये विविधता आणायची असेल त्यावेळी तुम्ही SIP किंवा LUMPSUM यांची निवड करू शकता.
5 शिस्त | Discipline
Systematic Investment Plans द्वारे गुंतवणूक करून तुम्हाला नियमित शिस्त लागते. पण तुम्ही नियमित गुंतवणूक करत करू शकत नसाल पण एक ठराविक रक्कम तुमच्याकडे असेल तर एक रकमी या मोडद्वारे गुंतवणूक करून दीर्घ कालावधीमध्ये चांगला परतावा मिळवू शकता.
6 तुम्ही निवडलेल्या फंडच्या प्रकारानुसार निवड करावी | The type of Fund you choose
तुम्ही मासिक उत्पन्न , आर्थिक स्थिरता, गुंतवणुकीचे उद्दिष्ट आणि जोखीम क्षमतेनुसार ज्या फंडची निवड केलेली आहे . त्या निवड केलेल्या Mutual fund च्या प्रकारानुसार म्हणजेच इक्विटी फंड, डेट फंड ,हायब्रीड फंड यानुसार SIP किंवा Lumpsum याची निवड करावी. म्हणजे जर कमी कालावधीसाठी गुंतवणूक करणार असाल व स्थिर परतावा हवा असेल व जास्त जोखीम नको असेल अशावेळी डेट फंड ची निवड करू शकता. आणि दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करणार असेल आणि जास्त जोखीम घेण्याची क्षमता असेल तर इक्विटी फंडची निवड करू शकता . आणि जर तुम्हाला नियमित उत्पन्न हवे आहे आणि गुंतवणूक केलेली रक्कम ही वाढायला हवी असेल तर तुम्ही हायब्रीड फंड यांची निवड करू शकता.
तुमच्या गुंतवणुकीचा मार्ग निवडणे हा तुमच्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन उद्दिष्टावर आणि तुमच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेवर आणि गुंतवणूक धोरण यावर अवलंबून आहे वरील सर्व माहिती घेऊन आणि आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊन गुंतवणूक करावी.
Prithviraj
September 18, 2023 @ 12:50 pm
Nice Information
Shivanjali
September 18, 2023 @ 12:51 pm
Knowledgeable information
Dipali
September 18, 2023 @ 1:05 pm
खूप छान माहिती आहे
Archana patil
October 6, 2023 @ 5:11 am
Very helpful information
Jaya
October 11, 2023 @ 1:43 am
Knowledgeable information
Jayashree thorat
October 12, 2023 @ 3:34 am
helpful information
Hemant
October 12, 2023 @ 3:35 am
Very helpful information 👍
aparna shinde
December 14, 2023 @ 12:32 pm
Information is very help full and very nice good
Grate
Thanks