म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे 10 फायदे | Top10 Benefits of Investing in Mutual Funds
गेल्या काही वर्षा पासून अनेक जण mutual fund मध्ये गुंतवणूक करू लागले आहेत पण म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करून छान परतावा मिळेल काय,पैसे बुडू शकतात का, गुंतवणूक करणे अवघड आहे का,कमी रकमे पासून सुरुवात करू शकतो का, गरज भासल्यास पैसे काढू शकतो का असे खूप काही शंका व गैरसमज गुंतवणूक दारांमध्ये आहे. त्यामुळे असे गैरसमज दूर करण्यासाठी आपण म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे (Benefits of Investing in Mutual Funds ) पाहणार आहोत. सध्याच्या काळात म्युच्युअल फंडच्या अनेक चांगले स्कीम आहेत त्यामुळे mutual fund ची माहिती घेऊन खूप लोक म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करत आहे त्यामुळे पोस्टच्या माध्यमातून म्युच्युअल फंड विषयी माहिती देणार आहे यातून तुम्ही mutual fund मध्ये गुंतवणूक(investment) करून फायदा घेऊ शकता…..
1.व्यावसायिक व्यवस्थापन | Professional Management
stock market मध्ये गुंतवणूक करून अतिरिक्त फायदा मिळवायचा आहे. पण शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक असणारे ज्ञान नाही. stock खरेदी विक्री करण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही आणि यासाठी आपल्याकडे अनुभव आणि संसाधने पण नाहीत. अशा वेळी आपण mutual fund मध्ये गुंतवणूक करण्याची निवड करू शकतो.
Mutual Fund मध्ये पूर्ण वेळ काम करणाऱ्या फंड मॅनेजर कडून खरेदी-विक्री आणि निरीक्षण करण्यासाठी कौशल्य अनुभव आणि संसाधने असतात. यातून Mutual Fund मॅनेजर योजनेचे उद्दिष्टाची पूर्तता करण्यासाठी गुंतवणुकीवर सतत लक्ष ठेवतात आणि त्यानुसार पोर्टफोलिओ मध्ये बदल करतात आणि म्युच्युअल फंडचे उद्दिष्टे साध्य करतात. त्यामुळे आपण शेअर मार्केटमध्ये थेट गुंतवणूक करण्या ऐवजी mutual fund मध्ये गुंतवणूक करून फायदा घेऊ शकतो. हे Mutual Funds Investing Benefits आहे.
2.जोखीम मध्ये विविधता | Risk diversification
mutual fund हे stock, debt ,Gold,सरकारी सिक्युरिटीज ई.मालमत्ता वर्गामध्ये वर्गीकरण करून गुंतवणूक करते. त्यामुळे आपली जोखीम (Risk) पसरण्यास मदत होते तुमची सर्व अंडी एकाच टोपलीत राहत नाहीत. मार्केट घसरले तरी वर्गीकरणामुळे एखाद्या मालमत्ता वर्गामध्ये तोटा झाला तरी दुसऱ्या मालमत्ता वर्गामध्ये फायदा झाला तर तुम्हाला जास्त तोटा होत नाही तुमच्या गुंतवणुकीला सुरक्षितता मिळते . अशाप्रकारे जोखीम मध्ये विविधता हे Mutual Funds Investing Benefit आहे.
3.कमी किमतीमध्ये गुंतवणुकीचा चांगला पर्याय | Good investment option at low cost (Affordable )
mutual fund मध्ये आपण कमीत कमी ५०० रुपये पासून SIP ची सुरुवात करू शकतो. व एक रक्कमी ( Lumpsum ) ५०० ते ५००० पासून सुरुवात करू शकतो. त्यामुळे गुंतवणूकदारांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी जास्त पैसे लावण्याची गरज नाही. गुंतवणूकदार कमी रकमेपासून सुद्धा mutual fund मध्ये गुंतवणूक करू शकतो.आणि त्यातून दीर्घकाळासाठी महागाई (inflation) पेक्षा जास्त परतावा मिळवून आर्थिक ध्येय पूर्ण करू शकतो. त्यामुळे कमी किमती मधून गुंतवणूक सुरू करण्याचा हा चांगला पर्याय आहे. हे Mutual Funds Investing Benefit आहे.
4.तरलता | Liquidity
शेअर बाजार चालू असेल व बँका उघड्या असतील त्या दिवशी जर तुम्ही mutual fund मध्ये पैसे काढण्याची विनंती केली तर ओपन एंडेड म्युच्युअल फंड योजनेतून तुम्ही Liquid Fund असेल तर पुढील दिवशी व Equity fund असतील तर कामकाजाच्या तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी बँक अकाउंट मध्ये पैसे जमा होतात. पण जर क्लोज एंडेड mutual fundअसतील तर म्युच्युअल फंड ची मॅच्युरिटी झाल्याशिवाय आपण पैसे काढू शकत नाही. त्याचप्रमाणे ELSS म्युच्युअल फंडच्या युनिटसचा 3 वर्षाचा लॉक -इन कालावधी असतो. त्यानंतर आपण पैसे काढू शकतो. हे Mutual Funds Investing Benefit आहे.
5.कमी देखभालीचा खर्च | Low expense ratio
mutual fund तुमच्याकडून देखभालीचा खर्च घेतात. तुमच्याकडून घेण्यात येणाऱ्या रकमेच्या बदल्यात म्युच्युअल फंड मॅनेजर ही रक्कम पोर्टफोलिओ मेंटेन करण्यासाठी वापरतात. अनेक सुविधा दिल्या जातात mutual fund मध्ये मोठ्या प्रमाणात करार (bulk deal) होतात त्यामुळे देखभालीचा खर्च कमी होतो, मॅनेजमेंट खर्च वाचतो आणि अधिक फायदा मिळतो फंड मॅनेजर या क्षेत्रात तज्ञ असल्यामुळे गुंतवणूकदाराला एक चांगला परतावा मिळवून देतात. हे Mutual Funds Investing Benefit आहे.
6.सेबी | SEBI Well Regulated – Securities and Exchange Board of India
SEBI ही सिक्युरिटीज मार्केट आणि स्टॉक एक्सचेंज यांचे व्यवस्थित कार्य करण्यासाठी त्यांचे नियमन करणे व गुंतवणूकदाराच्या हक्काचे आणि हिताचे रक्षण करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन आणि शिक्षित करण्यासाठी, किमतीतील हेराफेरी, इनसाईडर ट्रेडिंग इत्यादी सारख्या व्यापारातील गैरप्रकारांना प्रतिबंध करणे आणि बाजारात न्याय व्यवहार आणि प्रोस्ताहन देणे हे सेबी काम करते. नियम करण्यासोबत सिक्युरिटीज मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सेबीची स्थापना केली आहे. शेअर बाजार आणि mutual fund कसे कार्य करतात याचे नियमन सेबी करते. त्यामुळे गुंतवणूकदारांना सुरक्षा प्रधान होते.
7.कंपाउंडिंगची शक्ती | Power of compounding
mutual fund मध्ये गुंतवणूक करून दीर्घकाळासाठी चांगला परतावा मिळवू शकतो. Equity mutual fund मध्ये गुंतवणुक करणारे अल्प कालावधी मध्ये गुंतवणूक करून टक्केवारी मध्ये परतावा मिळवू शकतात पण दीर्घकाळा साठी जर गुंतवणूक केली तर पटीमध्ये (चक़वाढ व्याजासह) परतावा मिळवू शकतात. म्हणजेच गुंतवणूकदारांना power of compounding ची सुविधा मिळते म्हणून म्युच्युअल फंड मध्ये दीर्घ काळासाठी गुंतवणूक करून आर्थिक ध्येय पूर्ण करू शकतो. हा एक Mutual Funds Investing Benefits आहे.
8.कर लाभ | Tax Benefits
आयकर कायदा १९६१ च्या कलम ८० c अंतर्गत कर लाभ मिळवण्यासाठी ELSS फंड मध्ये १,५०,००० पर्यंतची गुंतवणूक करून कर लाभ मिळवू शकतो. ELSS फंड मध्ये गुंतवणूक ३ वर्षासाठी लॉक असते हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही या योजनेतून गुंतवणूक काढू शकता. ELSS mutual fund वरील दीर्घकालीन भांडवली नफा एक लाखापर्यंत करमुक्त आहे आणि लाभांश गुंतवणूकदारांच्या हातात करमुक्त आहे. हे Mutual Funds Investing Benefits आहेत.
9.सुविधा | convenience
सध्याच्या काळात ऑनलाईन होत असल्यामुळे गुंतवणूक करणे सोपे झाले आहे. तुम्ही सहज mutual fund मध्ये गुंतवणूक सुरू करू शकता. त्यामध्ये तुम्हाला ट्रॅकिंग करणे, परतावा पाहणे, वाढ किती झाली आहे , गुंतवणूक केलेला म्युच्युअल फंड कसा परतावा देतोय हे रोजच्या रोज ॲप्स च्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. म्युच्युअल फंडात गुंतवणूक केलेल्या गुंतवणुकदाराला गुंतवणूकीच्या बदल्यात युनिटस दिले जातात.
उदा. तुम्ही एखाद्या योजनेत १ हजार रुपये गुंतवले आहेत आणि त्या म्युच्युअल फंडाच्या एका युनिटची किमत १० रुपये आहे. तर तुम्हाला १०० युनिट मिळतील. या युनिटच्या किमतीला एनएव्ही म्हटलं जातं. म्हणजे या फंडाचा NAV १० रुपये असेल. तुमच्या फंडाने ज्या stock मध्ये गुंतवणूक केलेली आहे त्या शेअर्सची किमत वाढल्यानंतर आपोआपच तुमच्या फंडाचं मूल्यही वाढेल. त्यामुळे तुमची NAV ही चांगलीच वाढेल. रोजच्या रोज सायंकाळी mutual fund NAV जाहीर केला जातो. त्यामुळे आपल्या फंडाच्या एका युनिट ची किती किमत आहे हे रोज तुम्हाला समजते.
mutual fund मध्ये गुंतवणूक केलेली रक्कम गुंतवणूकदाराला गरज पडल्यास सहज काढू शकतात. Liquid fund असेल तर पुढील दिवशी व Equity fund असतील तर कामकाजाच्या तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी बँक अकाउंट मध्ये पैसे जमा होतात. त्यामुळे तुम्हाला गरज असताना पैसे न मिळण्याची अडचण होत नाही पण इतर गुंतवणूक मालमत्ता वर्गा मध्ये अशी अडचण निर्माण होऊ शकते कारण गुंतवणुकीचा कालावधी पूर्ण न झाल्यास तुम्ही पैसे काढू शकत नाही .ओपन एंडेड म्युच्युअल फंड मधून तुम्हाला कधीही पैसे काढता येत असल्यामुळे अनेक लोकांना गुंतवणूक करणे सोयीस्कर वाटते. हे Mutual Funds Investing Benefits आहेत.
10.आपले ध्येय प्राप्तीसाठी मदत | Help to achieve your goals
गुंतवणूकदार mutual fund मध्ये छोट्या रकमेतून गुंतवणूक करू शकतो आणि तुमची दीर्घकाळासाठीचे ध्येय म्हणजेच निवृत्तीनंतरचे खर्च, मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठीचे पैसे, घर घेण्यासाठी, गाडी घेण्यासाठी,सहलीचे नियोजन करण्या साठी अशाच प्रकारची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी mutual fund मध्ये गुंतवणूक करू शकतो आणि भविष्यातील आर्थिक ध्येय पूर्ण करू शकता. हे Mutual Funds Investing Benefits आहेत.
वरील सर्व Benefits of Investing in Mutual Funds आहेत. तुम्ही आर्थिक ध्येय निश्चित करून mutual fund मध्ये दीर्घ कालावधी साठी गुंतवणूक करून महागाई पेक्षा जास्त परतावा मिळवून भविष्यातील आर्थिक ध्येय अगदी सहजतेने पूर्ण करू शकता त्यामुळे आजच गुंतवणुकीला सुरुवात करा आणि भविष्यात येणाऱ्या अडचणी पासून चिंतामुक्त व्हा…..
Omkar Mohite
July 28, 2023 @ 3:11 pm
Best Sharing thank you so much.
Sudhir Jadhav
July 29, 2023 @ 1:36 am
Thanks
Amit jadhav
August 17, 2023 @ 3:31 am
मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी खूप योजना आहेत पण महागाई पेक्षा जास्त परतावा देणारी व कमी रिक्स असणारी योजना म्युच्युअल फंड आहे हे मला समजले आता त्याद्वारे मी गुंतवणूक करण्यास सुरुवात करणार आहे.
Priyanka
August 29, 2023 @ 11:04 am
Benefits of Mutual Funds nice information
Dipali .
August 29, 2023 @ 5:46 pm
छान माहिती आहे
Rajaram Chawde
September 3, 2023 @ 7:40 am
Benefits of Investing in Mutual Funds nice information
Ram
September 3, 2023 @ 11:29 am
खुप छान माहिती आहे
Anjali
September 10, 2023 @ 3:10 am
अगदी सरळ सोप्या भाषेत खूप छान माहिती आहे.
Swaraj
September 23, 2023 @ 9:54 am
Nice information
Archana patil
October 6, 2023 @ 6:28 am
Helpful information
Jaya
October 11, 2023 @ 1:24 am
Benefits of Investing in Mutual Funds nice information
Jayashree thorat
October 12, 2023 @ 3:56 am
knowledgeable information about Benefits of Investing in Mutual Funds