10 अशा आर्थिक चुका ज्या तुम्हीं टाळू शकता | Top 10 Financial Mistakes You Can Avoid
Financial mistake या लेखामध्ये मी काही सामान्य आर्थिक चुकावर एक नजर टाकणार आहे ज्यामुळे लोक या चुकांपासून दूर राहतील आणि त्यामुळे भविष्यात येणाऱ्या आर्थिक अडचणी समजून त्या टाळण्याचा प्रयत्न करून पैशाचे नियोजन करून भविष्यातील आर्थिक ध्येय पूर्ण करण्यासाठी आर्थिक निर्णय घेण्यास त्यांना मदत होईल.
Top 10 Financial Mistakes You Can Avoid
1 अवाजवी आणि फालतू खर्च करणे | Excessive and wasteful spending
दैनंदिन जीवनातील अवाजवी आणि फालतू खर्च जर टाळले तर जो तुमच्यावरती अतिरिक्त पैशाचा लोड येतोय तो कमी होऊ शकतो आणि जो तुम्हाला आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे त्यापासून तुमची सुटका होऊ शकते .त्यामुळे अवाजवी खर्च करण्याची Financial Mistakes टाळा म्हणजे तुम्ही महिनाभरातील खर्चाच्या नोंदी ठेवा व खर्चाचे नियोजन करून गरज असेल तेथे खर्च करा म्हणजे खर्च करताना गरज (Need ) आणि इच्छा (Want) याचे वर्गीकरण करून खर्च करा जिथे गरज आहे तेथे खर्च करा व इच्छाला थोडे पाठीमागे ठेवा कारण जर तुम्ही दररोज 1 रुपया वाचवला म्हणजे तो 1 रुपये कमवणे सारखा आहे. आज जर 1 रुपया वाचवला तर त्याचे महिन्यात 30 रुपये होतात आणि एका वर्षात 365 रुपये होतात हे जर गुंतवणूक केली व दीर्घ कालावधीमध्ये त्याने चक्रवाढ व्याजा ( compound interest ) प्रमाणे परतावा मिळवून दिला तर खूप मोठे पैसे होतील त्यामुळे अवाजवी खर्च टाळून आजच saving करण्यासाठी सुरुवात करा व भविष्यात होणाऱ्या त्रासापासून आपले संरक्षण करा.
2. जीवनशैलीच्या नावाखाली अतिरिक्त खर्च करणे | Spending extra in the name of lifestyle
स्वतःला जरा विचारा की तुम्हाला खरोखरच अशा वस्तूंची गरज आहे का ? की ज्या तुम्हाला दर महिन्याला वर्षानुवर्षी पैसे द्यावे लागतात अशा जीवनशैलीच्या नावाखाली जो तुम्ही अतिरिक्त खर्च करताय तो जर तुम्ही थांबवला तर तुमची अधिक saving होईल जर तुम्ही साधी राहणीमान ठेवली आणि खर्च जर कमी केला तर तुम्हाला saving वाढवण्यास आणि तुमचे भविष्य सुखकर होण्यास मदत होईल. त्यामुळे दुसरा करतोय म्हणून मला पण ते महागडे शोक केले पाहिजेत किंवा दुसरा करतोय म्हणून मला कुठे कमीपणा नको आहे यासाठी महागडे शोक करणे टाळा आणि त्या पैशाचे बचत मध्ये रूपांतर करून भविष्यासाठी investment करा.आणि जीवनशैलीच्या नावाखाली अतिरिक्त खर्च करणे ही Financial mistake टाळा.
3 जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरणे | Using a credit card to buy essentials
जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी credit card वापरणे हे आता सामान्य झाले आहे. पण credit card वापरून तुम्ही खर्च करताय याचा अर्थ तुम्ही कमावलेल्या पैशापेक्षा जास्त खर्च करतात .लोक सध्या पेट्रोल ,किराणा माल भरण्यासाठी, मोबाईल खरेदी करण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर करतात आणि त्यावर जास्त व्याज देतात असे करणे हे Financial mistake शहाणपणाचे नाही. त्यामुळे पैशाचे योग्य नियोजन करून क्रेडिट कार्ड वापरण्याचे टाळा.
4 महागड्या कार खरेदी करणे | Buying expensive cars
दरवर्षी नवीन लाखो कार विकले जातात तर त्यामध्ये काही खरेदीदार रोख पैसे देऊ शकतात आणि जे रोख पैसे देण्यास असमर्थ असतील ते कार कर्ज ( Loan )काढून घेतात पण आपण ज्या कारसाठी कर्ज घेतोय किंवा उधार घेतोय त्या कारचे भविष्यातील किंमत कमी होणार आहे. म्हणजेच आपण किंमत घसरणाऱ्या मालमत्तेवर व्याज ( intrest ) देत आहोत म्हणजे आपण भरलेले डाऊन पेमेंट आणि त्यानंतर लोणसाठी भरलेले हप्ते याचा जर आपण विचार केला तर हे काही गणित परवडण्यासारखे नाही. त्यामुळे कार खरेदी करताना आपण खरोखरच असा विचार केला पाहिजे की मला अशा कारची गरज खरोखरच आहे काय ? कारण आपण जेव्हा महागडी कार खरेदी करतो तेव्हा आपण जे पैसे दर महिन्यात saving करतो ते बंद होते आणि त्याच्या ऐवजी car loan चालू होते आणि त्याचबरोबर insurance ,इंधन खर्च, देखभालीचा खर्च ही वाढतो .त्यामुळे आपणाला गरज असणाऱ्या कारची निवड करून गैरसोय टाळा पण महागडी कार घेऊ नका. जर तुम्ही तुमच्या बजेट प्रमाणे जर कार घेतली तर ती तुम्हाला परवडेल आणि अतिरिक्त जो खर्च होणार आहे तो तुम्ही विमा आणि देखभाली साठी ही वापरू शकता.म्हणून महागडी कार घेणे ही Financial mistake टाळा.
5 घर खरेदी वर जास्त खर्च करणे | Spending more on buying a home
आपण जेव्हा घर खरेदी करण्याचा विचार करतो तेव्हा सगळ्यांनाच असे वाटते की माझे घर मोठे आणि छान असले पाहिजे पण आपण किती कमाई करतो व त्या घरामध्ये आपण किती लोक राहणार आहोत याचा विचार करून घराची निवड करणे आवश्यक आहे कारण जर घर मोठे घेतले तर त्यासाठी जास्त पैसे द्यावे लागणार आणि त्याचबरोबर त्याचा देखभालीचा खर्च ही वाढणार आणि त्यावरती कर आकारणी पण जास्त होणार त्यामुळे तुम्ही तुम्हाला आवश्यक असणाऱ्या घराची निवड करणे आवश्यक आहे त्यामुळे तुमच्यावर अतिरिक्त येणारा पैशाचा ताण कमी होऊन दीर्घकालावधीसाठी कर्ज राहणार नाही.म्हणून घर खरेदी वर जास्त खर्च करणे ही Financial mistake टाळा.
6 आपत्कालीन निधी न बनवणे | Not building an emergency fund
महागाई ( infletion)च्या काळामध्ये कमाई कमी आणि खर्च जास्त अशी परिस्थिती आहे तर काहींचा पगार आणि खर्च कट टू कट चाललेला आहे .पण एखादी अनपेक्षित समस्या जर आली तर ती आपल्यासाठी फार मोठी समस्या बनू शकते. त्यामुळे ज्यादा खर्चाचा परिणाम आपणास अनिश्चित स्थितीत आणते. जसे की आर्थिक मंदी अशा स्थितीत तुम्हाला जर जगायचे असेल तर तुमच्याकडे कमीत कमी 3 महिन्याचा खर्च एका स्वतंत्र खात्यात तुम्ही ठेवणे गरजेचे आहे असे जर केले नाही तर रोजगार कमी होणे किंवा अर्थव्यवस्थेतील बदलामुळे तुम्ही कर्जाच्या सापळ्यात अडकू शकता आणि जर तुम्ही एकदा कर्जाच्या चक्रात जर अडकला तर तुम्हाला भविष्यात खूप मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल त्यासाठी आजच आपत्कालीन निधी ( Emergency fund ) बनवण्यास सुरुवात करा. आणि आपत्कालीन निधी न बनवणे ही Financial mistake टाळा.
7 चक्रवाढ व्याजाची जादू न समजणे | Not understanding the magic of compound interest
compound interest ही जगातील आठवे आश्चर्य आहे असे “अल्बर्ट आईन्स्टाईन” यांनी सांगितले आहे . compound interest कसे काम करते हे कमी लोक समजतात compound interest ची शक्ती समजून घेऊन तुम्ही लवकर बचत करून investment करण्यास सुरुवात करा. compound interest मुळे तुमचे पैसे जलद वाटतात कारण व्याज कालांतराने जमा झालेल्या व्याजावर तसेच तुमच्या मूळ मुद्दलावर मिळते चक्रवाढ स्लोबाॉल प्रभाव निर्माण करू शकते कारण मूळ investment आणि त्या गुंतवणुकीतून मिळणारे उत्पन्न एकत्र वाढतात. त्यामुळे चक्रवाढ व्याज कसे काम करते हे समजून घेऊन ही Financial mistake टाळा.
8 सेवानिवृत्तीसाठी गुंतवणूक न करणे | Not investing for retirement planning
जर सेवानिवृत्ती (Retirement planning ) साठी गुंतवणूक नाही केली तर आयुष्यभर कामच करावे लागेल दुसरा काहीही पर्याय नाही म्हणून जर तुम्हाला लवकर आर्थिक दृष्ट्या निवृत्ती हवी असेल आणि उतार वयात मुलांच्या वर अवलंबून राहायचे नसेल तर नोकरी लागलेल्या पहिल्या दिवसापासून थोडी थोडी saving करून त्याचे गुंतवणुकीमध्ये जर रूपांतर केले तर त्याचा दीर्घ कालावधीमध्ये चक्रवाढ व्याजा प्रमाणे परतावा मिळून खूप मोठे पैसे होतील आणि ते तुम्हाला आर्थिक दृष्ट्या लवकर सेवानिवृत्त होण्यास मदत करतील त्यासाठी आजच saving करून investment करण्यास सुरुवात करा. त्यासाठी तुम्हाला कधी सेवानिवृत्त व्हायचे आहे आणि तुम्ही किती जोखिम घेऊ शकता हे समजून घेऊन आर्थिक सल्लागाराशी सल्ला मसलत करून योग्य निर्णय घेऊन investment करण्यास सुरुवात करा.
9 आर्थिक योजना तयार नसणे | Lack of financial planning
सध्या तुम्ही कसे आर्थिक निर्णय घेता त्यावरती तुमचे आर्थिक भविष्य अवलंबून आहे. तुम्ही सोशल मीडिया वरती खूप वेळ वाया घालवत असाल परंतु आर्थिक गोष्टीसाठी वेळ काढू शकत नाही आपण कुठे जात आहोत आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागणार नाही त्यासाठी तुम्ही महिन्यातून आर्थिक नियोजनासाठी थोडा वेळ बाजूला काढणे आवश्यक आहे आणि आर्थिक गरजा लक्षात घेऊन आर्थिक योजना तयार करणे आवश्यक आहे.
10 गुंतवणुकीसाठी विमा पॉलिसी खरेदी करणे | Buying an insurance policy for investment
insurance आणि investment यामधील फरक न समजल्यामुळे 100 पैकी 95 लोक हे गुंतवणूक म्हणून विमा पॉलिसी खरेदी करतात तर असे न करता तुम्ही कष्टाने मिळवलेल्या पैशा पासून जर तुम्हाला चांगला परतावा हवा असेल तर तुम्ही विमा आणि गुंतवणूक यामधील फरक समजून घेऊन insurance policy खरेदी करणे खूप खूप आवश्यक आहे.
वरती सांगितलेल्या चुका टाळा जास्त खर्च करण्याच्या धोक्यापासून स्वतःला दूर ठेवा .
पटकन वाढणाऱ्या छोट्या खर्चावर लक्ष ठेवा आणि हळूहळू मोठ्या खर्चावर लक्ष ठेवा.कोणतीही वस्तू खरेदी करताना ती आपली गरज आहे का इच्छा आहे याचा विचार करा . इच्छा असेल तर ती वस्तू घेऊ नका पण गरज असेल तर ती वस्तू लगेच घेण्याच्या मोह टाळा आणि ती वस्तू घेण्याचे नियोजन करून त्यासाठी थोडे थोडे पैसे साठवून खरेदी करा. कोणतीही गोष्ट लगेच घ्यावी अशी वाटली की लगेच घेऊ नका ती विचारपूर्वक घ्या.आठवडाभर थोडी थोडी बचत करून आठवड्याच्या शेवटी मोठे खर्च करणे टाळा.
क्रेडिट कार्ड वरती वस्तू खरेदी करू नका. तुम्हाला परवडणाऱ्या जीवनशैलीमध्ये राहा आणि महागड्या जीवनशैलीमध्ये होणारा अतिरिक्त खर्च टाळा.ऑफर मिळते म्हणून वस्तू खरेदी करू नका किंवा सोशल मीडियावरती पोस्ट करायची आहे म्हणून जास्त फिरायला जाऊ नका. खर्चाचे रेकॉर्ड ठेवा . इमर्जन्सी फंड तयार करा .मेडिकल इन्शुरन्स काढा .फायनान्सिंग प्लान तयार करा . तुम्ही जे आयुष्यभर जे थोडे थोडे करून पैसे जे साठवलेले आहेत ते मुलांच्या लग्नावरती सर्वच खर्च करू नका . गरजेपेक्षा जास्त सोने खरेदी करून घरी ठेवू नका.
गुंतवणूक करताना दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करा व अल्प कालावधीसाठी FD,RD मध्ये गुंतवणूक करा.गुंतवणूक करताना त्याचा अभ्यास करून गुंतवणूक करा अल्प कालावधीसाठी गुंतवणूक करणार असेल तर Fixed income Assets मध्ये गुंतवणूक करा आणि दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करणार असाल तर possible income asset मध्ये गुंतवणूक करा गुंतवणुकीमध्ये वर्गीकरण करा.
saving ,investment ,compound interest,Budget, infletion,asset liabilities,fixed income , possible income याची माहिती मिळवत चला कोणतेही आर्थिक निर्णय घेताना आपल्या जोडीदारासोबत चर्चा करा आणि योग्य निर्णय घेऊन भविष्य तुमचे सुखकर करा.
Swaraj
January 1, 2024 @ 10:44 am
Nice information 👍
Dipali patil
February 10, 2024 @ 6:26 am
Nice information
प्रवीण सोनुने
May 18, 2024 @ 9:29 am
Nice information