SIP म्हणजे काय ? | What is SIP ?
SIP म्हणजे म्युच्युअल फंड्सने गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांना दरमहा नियोजनबद्ध पद्धतीने गुंतवणूक करण्यासाठी जी सोय केलेली आहे त्यास (SIP )Systematic Investment Plan असे म्हणतात.
म्युच्युअल फंड स्किम्स मध्ये ठराविक कालावधीने एक निश्चित रक्कम गुंतवणूक करू शकतो. कमीत कमी 500 रुपये दरमहा SIP द्वारे गुंतवणूक करू शकतो . त्यासाठी तुम्ही बँकेत bank mandate करून Systematic Investment Plan ची रक्कम दरमहा आपोआप कट होते व तुमच्या बँक अकाउंट मधून म्युच्युअल फंड अकाउंटला ट्रान्सफर होते यामध्ये गुंतवणूकदार आपल्या सोयीच्या तारखेनुसार म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करू शकतो. दीर्घ कालावधीमध्ये Systematic Investment Plan द्वारे म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करून गुंतवणुकीतील जोखीम कमी होते आणि संपत्ती निर्मिती ( Wealth creation ) करता येते .
म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करताना शेअर मार्केट वरती आहे की खाली आहे किंवा शेअर बाजार पुढे कसा परतावा देईल, सध्या गुंतवणुकीबाबत काय करावे ? SIP चालू ठेवावी का ? पुढे शेअर मार्केट कशी कामगिरी करेल ? इत्यादी प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात असतात. पण Mutual Fund मध्ये नियोजनबद्ध गुंतवणुकीचा ‘SIP’ हा एक प्रभावी मार्ग आहे . त्याबद्दल अधिक माहिती आजच्या लेखात घेऊया.
SIP मध्ये गुंतवणूक करताना खालील माहिती घ्या.
1.गुंतवणूक करण्यासाठी केवायसी करणे गरजेचे आहे | KYC is required to invest through SIP
म्युच्युअल फंडमध्ये SIP च्या माध्यमातून गुंतवणूक करण्यासाठी KYC करणे गरजेचे आहे. KYC केल्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या म्युच्युअल फंड कंपन्यांच्या कोणत्याही योजनेत गुंतवणूक करू शकतात. ही KYC ऑनलाइन मोड किंवा ऑफलाइन मोड याद्वारे केली जाते. KYC करण्यासाठी तुम्हाला कागदपत्रे आवश्यक आहेत. ती म्हणजे तुमचे Pan card, पत्ता पुरावा साठी तुमचे Aadhar Card किंवा Passport, MSEB bill, Voter id आणि बँक खात्याची माहिती देणे गरजेचे आहे.
2. गुंतवणूक करण्याचे ध्येय ठरवा | Set an investment Goal
SIP सुरू करण्यासाठी पहिल्यांदा गुंतवणूक करण्याचे ध्येय ठरवले पाहिजे. यामुळे तुम्हाला कोणत्या प्रकारच्या mutual fund च्या योजने मध्ये गुंतवणूक करायची आहे , गुंतवणुकीचा कालावधी काय असावा, गुंतवणुकीची रक्कम किती असावी , गुंतवणुकीवर अपेक्षित परतावा किती हवा आहे इत्यादीं वरून mutual fund schemes निवडण्यासाठी मदत होईल. त्यासाठी गुंतवणूक करण्याचे ध्येय निश्चित करणे खूप गरजेचे आहे.
3. गुंतवणुकीचा कालावधी निश्चित करणे | Determining the duration of the investment
गुंतवणुकीचा कालावधी निश्चित करणे हे गुंतवणूक करण्याचे ध्येय ठरवण्या एवढेच महत्त्वाचे आहे. कारण गुंतवणूकीसाठी कालावधी निश्चित केल्याने आपल्यालाकडे ध्येय मिळवण्यासाठी किती कालावधी शिल्लक आहे त्यानुसार एका महिन्या साठी किती रक्कम बचत करणे गरजेचे आहे हे ठरवण्यास मदत होते व ती बचत sip नुसार तुमचे उद्दिष्ट 1ते 2 वर्षांसाठी असेल तर त्यासाठी risk management करून त्यानुसार Fixed Asset class मध्ये गुंतवणूक केली पाहिजे किंवा दीर्घ कालावधी साठीचे ध्येय असेल तर त्यानुसार possible Asset class मध्ये गुंतवणूक केली पाहिजे हे ठरवण्यासाठी मदत होईल त्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय SIP करून सहज पूर्ण करू शकता.
Mutual fund मध्ये Systematic Investment Plan द्वारे गुंतवणूक दीर्घकालावधीसाठी करावी म्हणजे १५ ते २० वर्षे किंवा आवश्यकतेनुसार त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी गुंतवणूक करावी त्यामुळे संप्पती निर्मिती( Wealth creation ) करता येईल.
4. गुंतवणूक करण्यासाठी योजना निवडा | Choose a plan to invest
तुम्ही ज्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहात त्या योजना निवडणे आवश्यक आहे. कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही योजनेचा मागील ट्रॅक रेकॉर्ड समजून घेणे आवश्यक आहे. योजना तुमच्या गरजा पूर्ण करते की नाही तुमची जोखीम घेण्याची क्षमता व योजनेची जोखीम हे जुळते का ते पाहणे. आणि फंड मॅनेजर कोण आहे व त्याचे मागील ट्रॅक रेकॉर्ड पाहणे गरजेचे आहे. तुम्ही म्युच्युअल फंड वितरक आणि इतर मध्यस्थांमार्फत किंवा थेट फंड हाउसद्वारे Systematic Investment Plan मध्ये गुंतवणूक करू शकतात. पण Mutual Fund Distributors मार्फत गुंतवणूक करणे केव्हाही चांगले असते कारण ते वेगवेगळ्या फंड हाउसच्या अनेक योजना एकाच छताखाली ऑफर करतात जे थेट कंपनीमार्फत गुंतवणूक करण्याच्या बाबतीत शक्य नसते.
5. गुंतवणुकीची रक्कम आणि तारीख ठरवा | Decide the investment amount and date
Mutual fund मध्ये सिस्टिमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन द्वारे गुंतवणूक करताना तुम्हीं रक्कम ठरवली पाहिजे. गुंतवणुकीची रक्कम ठरवण्यासाठी तुम्ही SIP calculator चा वापर करून तुम्ही ध्येय साध्य करण्यासाठी किती रक्कम Systematic Investment Plan द्वारे गुंतवणूक करणे आवश्यक आहे हे समजण्यास मदत होते.
रक्कम निश्चित करताना SIP ची तारीख पण निवडणे गरजेचे आहे. तारीख निवडताना तुम्ही पहिल्यांदा खात्री करा की त्या दिवशी रक्कम माझ्या बँक अकाउंट मध्ये शिल्लक असली पाहिजे म्हणजे विना अडचणीची रक्कम गुंतवणूक खात्यामध्ये जाईल त्यासाठी पगार झाल्यानंतर ची जवळची तारीख ठरवली पाहिजे.
6. गुंतवणूक ठराविक कालावधीनंतर पहा | See the investment after a certain period of time
आपली गुंतवणूक ठराविक कालावधी नंतर पाहणे गरजेचे आहे की आपण गुंतवणूक केलेला फंड कसा परतावा देत आहे. गुंतवणूक मधून तयार होणारा फंड आपले ध्येय पूर्ण करू शकतो का , आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी sip मध्ये वाढ करणे गरजेचे आहे का , आपल्या पोर्टफोलिओ मध्ये वर्गीकरण आहे का इत्यादी माहिती द्वारे भविष्यातील आर्थिक ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल.
SIP गुंतवणुकीचे फायदे | Benefits Of Investing SIP
SIP चे अनेक फायदे आहेत जसे की छोट्या रक्कमेपासून गुंतवणूक सुरुवात करू शकतो, गुंतवणूक करणे सोयीस्कर आहे, गुंतवणूक करून जोखीम कमी करू शकतो, गुंतवणूक करून कर सूट मिळवू शकतो, शिस्तबद्ध गुंतवणूक करू शकतो, चक्रवाढ व्याज ( compound interest ) मिळवू शकतो, पैसे कधीही काढू शकतो , Rupee cost averaging इत्यादी SIP चे फायदे आहेत .
1.छोट्या रक्कमेपासून गुंतवणूक सुरुवात करू शकतो | can start investing from a small amount
सिस्टिमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन मध्ये ठराविक अंतराने छोटी रक्कम नियमितपणे गुंतवणूक करू शकतो त्यामुळे आपल्या कमाई तून गुंतवणुकीसाठी थोडी रक्कम बचत करणे गरजेचे आहे. दीर्घ कालावधीसाठी सतत ठराविक अंतराने लहान रक्कम गुंतवणूक करून तुम्ही मोठी रक्कम मिळवू शकता.
तुम्ही दरमहा 1000 रुपये ची गुंतवणूक केल्यास 15 वर्षांमध्ये तुम्हाला जरी 12 टक्के व्याजदराने परतावा मिळाला तर तुमच्या गुंतवणुकीच्या कालावधीच्या शेवटी सुमारे 498,911 रुपये मिळतील. आणि तुम्ही या 15 वर्षांत फक्त 1,80,000 रुपये जमा केले असतील. तुम्ही SIP मध्ये 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. जे तुम्हाला दीर्घकाळात चांगला नफा मिळवून देऊन आर्थिक ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्हाला उपयुक्त ठरेल.
2. गुंतवणूक करून जोखीम कमी करू शकतो | Can reduce the risk by investing through SIP
सिस्टिमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन चा सर्वात मोठा आणि मुख्य फायदा म्हणजे त्यात जोखीम खूप कमी आहे. जर तुम्ही 1000 रुपयाची Systematic Investment Plan मध्ये गुंतवणूक केली की ते 1000 रुपये 30 ते 50 कंपन्यांमध्ये विभागले जातात त्यामुळे तुमची जोखीम कमी करण्यास मदत होते. त्याचप्रमाणे एकाच वेळी मोठी रक्कम न गुंतवल्यामुळे छोटी छोटी रक्कम गुंतवणूक करून Rupee cost averaging चा फायदा मिळू शकतो .
3. रुपयाची सरासरी किंमत चा फायदा मिळू शकतो | One can get advantage of rupee average price
तुम्ही एक निश्चित रक्कम ठराविक कालावधी नुसार बाजारातील हालचालीचा विचार न करता SIP द्वारे Mutual Fund मध्ये गुंतवणूक करता त्यास Rupee Cost Averaging असे म्हणतात.
जेव्हा बाजार खाली पडलेला असेल तेव्हा तुम्ही कमीत कमी किमतीला जास्त युनिट खरेदी करता आणि त्याच्या उलट बाजार जेव्हा वाढलेला असतो तेव्हा कमी युनिट खरेदी केले जातात तरी तुम्ही नियमित ठराविक अंतराने गुंतवणूक करत असल्यामुळे तुम्हाला वेगवेगळे बाजाराच्या स्तरावरती गुंतवणूक करण्याची संधी मिळते त्यामुळे तुम्ही Rupee cost averaging चा फायदा घेऊ शकता आणि त्यामुळे सरासरी किंमत तुम्हाला मिळण्यास मदत होते.
4. SIP द्वारे शिस्तबद्ध गुंतवणूक करू शकतो | Can invest disciplined through SIP
Systematic Investment Plan मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमच्या खात्यातून एक छोटी रक्कम नियमित गुंतवणूक केली जाते. यामुळे तुमच्या गुंतवणूक प्रक्रियेत शिस्त राहते. ही शिस्त तुम्हाला बचत करण्यासाठी प्रोत्साहित करते आणि बचत करण्याची सवय लावते.
5. गुंतवणूक करणे सोयीस्कर आहे | Investing in SIP is convenient
SIP मध्ये गुंतवणूक करणे खूप सोयीस्कर आहे. जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंड ची निवड करता तेव्हा SIP रक्कम तुमच्या बँक अकाउंट मधून म्युच्युअल फंड अकाउंट मध्ये ठरवलेल्या तारखेला पाठवली जाते त्यासाठी तुमचे बँकेचे खाते Mutual Fund खात्याशी जोडलेले असले पाहिजे जर तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये दर महिन्याला 1000 रुपयांची गुंतवणूक करत असाल तर दर महिन्याला1000 रुपये तुमच्या बँक खात्यामधून Mutual fund खात्यामध्ये जातात व त्यावरती तुम्हाला NAV दिले जातात.
6. गुंतवणूक करून कर सूट मिळवू शकतो | Can get tax exemption by investing through SIP
जेव्हा तुम्ही सिस्टिमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन द्वारे ELSS mutual fund मध्ये गुंतवणूक करून कर सुट मिळवू शकता. Mutual fund मध्ये कर सूट देणाऱ्या योजनांना 3 वर्षांचा लॉक-इन कालावधी असतो. त्यात गुंतवणूक करून तुम्ही कर सूट मिळवू शकता.
7. पैसे कधीही काढू शकतो | Can withdraw money from SIP at any time
लॉक-इन कालावधी नसलेल्या mutual fund मधून तुम्ही कधीही पैसे काढू शकता. गुंतवणूकदार त्यांच्या गरजेनुसार SIP मध्ये गुंतवणूक चालू ठेवण्याचा किंवा थांबवण्याचा निर्णय घेऊ शकतात.
8. चक्रवाढ व्याज मिळवू शकतो | Can earn compound interest through SIP
चक्रवाढ म्हणजे व्याजावर व्याज मिळणे असा आहे. mutual fund मध्ये गुंतवणूक केली जाते आणि त्या गुंतवणुकीच्या रकमेवर जो काही परतावा मिळतो तो mutual fund मध्ये पुन्हा गुंतवणूक केली जाते त्यामुळे गुंतवणूकदाराना नफा वाढतो आणि त्याला मिळणाऱ्या नफ्यात वाढ होते.
वरीलप्रमाणे माहिती घेऊन तुम्ही गुंतवणूक करण्यात सुरुवात करू शकता. Systematic Investment Plan मध्ये गुंतवणूक करण्याची फायदे जास्त व तोटे फारच कमी आहेत तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनातून थोडे थोडे पैसे शिल्लक ठेवून सिस्टिमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन द्वारे गुंतवणूक करून भविष्यातील आर्थिक ध्येय पूर्ण करू शकता आणि नियमितपणे गुंतवणूक केल्यानंतर छोट्या रकमेतून तुम्हाला खूप मोठा निधी मिळेल. परंतु गुंतवणूक करताना आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊन गुंतवणूक करावी.
Dipali patil
August 16, 2023 @ 11:45 am
Nice information
Priyanka
August 29, 2023 @ 10:54 am
खूप छान माहिती आहे
Rajaram Chawde
September 3, 2023 @ 7:25 am
Nice information thanks
Ram
September 3, 2023 @ 8:21 am
SIP बद्दल खूप छान माहिती मिळाली
Shivanjali
September 5, 2023 @ 3:55 pm
Knowledgeable information about SIP
Anjali
September 10, 2023 @ 3:14 am
अगदी सरळ सोप्या भाषेत खूप छान माहिती आहे.
Archana patil
October 6, 2023 @ 5:52 am
helpful information
Jaya
October 11, 2023 @ 1:31 am
Knowledgeable information about SIP
Jayashree thorat
October 12, 2023 @ 3:50 am
Nice information
Hemant
November 30, 2023 @ 3:13 am
This type of information is necessary for everyone. Great work.👍👍