विमा म्हणजे काय ? | What is insurance ?
विमा म्हणजे भविष्यात येणाऱ्या जोखमीचे पूर्वनियोजन करून संभाव्य नुकसानी पासून संरक्षण मिळवणे होय . अचानक येणाऱ्या संकटांची भरपाई करण्यासाठी संकटांची जबाबदारी विमा कंपनीकडे हस्तांतरित करून ती भरपाई मिळण्यासाठी विमा कंपनी ला प्रीमियम देणे व भविष्यात येणाऱ्या संभाव्य नुकसानी पासून आपले संरक्षण करणे होय. जेव्हा संभाव्य नुकसान होते तेव्हा विमा कंपनी आपल्याला विम्याची रक्कम देऊन आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास मदत करते .
2. विम्याद्वारे जोखीम व्यवस्थापन कसे करावे | Risk management by insurance
आपले आयुष्य जोखीम आणि अनिश्चिततेने भरलेले आहे त्यासाठी जोखमीचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
- जोखमीचे व्यवस्थापन करण्यासाठी कमीत कमी 3 व जास्तीत जास्त 6 महिन्याचे खर्च आपत्कालीन निधी (Emergency Fund)मध्ये ठेवा.
- जोखीम टाळण्यासाठी तुमच्या सर्व जबाबदारी (liability )चा विमा घ्या.
- तुमच्या कुटुंबा मध्ये फक्त तुम्हीच काम करत असाल तर जीवन विमा ( life Insurance )घेणे खूप गरजेचे आहे.
- अचानक येणाऱ्या आजारपणा वरील उपचारासाठी आरोग्य विमा (Health Insurance ) घ्या.
- मोटार विमा, प्रवास विमा, गृह विमा इत्यादी प्रकारचे सर्व साधारण विमा घेऊन तुम्ही आर्थिक नुकसानी पासून संरक्षण मिळवा.
3. विमा घेणे गरजेचे का आहे ? | insurance why do we need it ?
आयुष्य जोखीम आणि अनिश्चिततेने भरलेले आहे त्यासाठी जोखमीचे व्यवस्थापन करणे खूप गरजेचे आहे. विमा हा एखाद्या वस्तूच्या नुकसान भरपाईसाठी किंवा व्यक्तीच्या आरोग्या साठी घेतला जातो. जर व्यक्तीचा मृत्यू झाला किंवा आजारी पडला, वस्तूची चोरी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले तर त्याची भरपाई मिळविण्याच्या उद्देशाने विमा गरजेचा आहे.आर्थिक नियोजन (Financial Planning)च्या घटकांपैकी विमा नियोजन हे महत्त्वाचे आहे कारण विमा हे दुर्घटना झाल्यास विमा घेऊन आपण जोखीम आणि आर्थिक नुकसान भरपाई मिळवू शकतो.
विमा घेतल्यानंतर विमाधारकाला एक करार विमा कंपनी कडून मिळतो, त्यास विमा पॉलिसी असे म्हणतात, विमा पॉलिसी मध्ये विमा धारक व विमा कंपनी यामधील अटी नियमांचा तपशील, पॉलिसीचा कालावधी,पॉलिसी मधील कव्हरेज त्यासाठी विमा कंपनीकडून पॉलिसी धारकाला आकारलेला प्रीमियम याची माहिती दिली जाते. विमा कंपनी कडून विमा काढायच्या वेळेस जर नुकसान झाले तर नुकसान भरपाई देण्याची हमी दिली जाते . विमा व्यवसायावर नियंत्रण करण्यासाठी 2000 साली भारतीय विमा आणि विकास प्राधिकरण म्हणजेच Insurance Regulatory and Development Authority of India (IRDAI) ची स्थापना झालेली आहे आपण कमीत कमी खर्चामध्ये दीर्घकाळ आणि पुरेसा विमा मिळवू शकतो.
4. विमा कंपनी कसे काम करते ? | How does an insurance company work ?
संभाव्य नुकसानी पासून संरक्षण मिळवण्यासाठी आपण विमा योजना खरेदी करून विमा योजनेचा प्रीमियम भरतो असेच मोठ्या संख्येने लोक नुकसानापासून संरक्षण मिळवण्या साठी प्रीमियम भरतात त्यातून विमा कंपनीकडे एक मोठा फंड तयार होतो. सर्वांना एकाच वेळी विमा संरक्षणाची आवश्यकता भासण्याची शक्यता जवळजवळ कमीच असते त्यामुळे नियमित अंतराने विमा कंपनी प्रीमियम गोळा करून जेव्हा क्लेम सेटल करण्याच्या त्यावेळी कंपनी फंड मधून विमा पॉलिसी धारकाला क्लेम सेटलमेंट रक्कम देते .
विमा हा आपल्या नियंत्रणात नसणाऱ्या आर्थिक नुकसानीची भरपाई मिळवण्या साठी विमा घेतला जातो. विमा घेऊन आपण जोखीम आणि आर्थिक नुकसान टाळू शकतो. नुकसान भरपाई मिळवणे हा विमा घेण्याचा मुख्य उद्देश आहे. विम्याचे काही प्रकार खाली प्रमाणे
5. विमा पॉलिसीद्वारे कर बचत करणे | Tax saving through insurance policy
जीवन विमा पॉलिसी मध्ये गुंतवणूक करून प्राप्तिकर कायदा 1961 या अंतर्गत कलम 80c ,80D च्या अंतर्गत 1,50,000 पर्यंत कर माफी मिळते .
6. विम्याचे 2 प्रकार | 2 Types of Insurance
1. जीवण विमा | Life insurance
2. सर्वसाधारण विमा | General insurance
1. जीवण विमा म्हणजे काय ? | What is life insurance?
विमा कंपनी आणि विमा पॉलिसी धारक विमा खरेदी करताना एक करार होतो यामध्ये विमा पॉलिसी मधील अटी व नियमानुसार विमा पॉलिसी धारकाच्या मृत्यूनंतर किंवा ठराविक परिस्थितीमध्ये विम्याचे पैसे विमाधारकाला किंवा त्याच्या मृत्यूनंतर वारसाला दिले जातात. यासाठी जीवण विमा पॉलिसीधारकाने नियमित विम्याचे हप्ते भरणे गरजेचे आहे.
* जीवन विमा घेणे का गरजेचे आहे काय ? | Why is it necessary to take life insurance ?
कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे कुटुंबावर आर्थिक संकट येते हे संकट टाळण्यासाठी जीवन विमा घेणे गरजेचे आहे. कर्त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्यावरती अवलंबून असणाऱ्या कुटुंबाचे आर्थिक भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी जीवन विमा आवश्यक आहे. कुटुंब प्रमुखाचा अचानक मृत्यू झाल्यामुळे घरामध्ये येणारे उत्पन्न थांबतो त्यामुळे कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसाना विरुद्ध जीवन विमा संरक्षण देते.
कुटुंब प्रमुखाच्या मृत्यूपश्चात कुटुंब प्रमुखावर अवलंबून असलेल्या व्यक्तींचे आणि कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करणे आणि आर्थिकदृष्ट्या त्यांचे जीवन बिघडणार नाही याची सोय करण्या साठी जीवन विमा घेणे गरजेचे आहे. कुटुंब प्रमुखाचा आकस्मिक मृत्यू झाल्यास विमा कंपनी ठरलेली रक्कम देऊन भविष्यातील उत्पन्नाचा ओघ सुरू ठेवते त्यामुळे देणी व जबाबदाऱ्या पार पाडण्यास मदत होते.
उदाहरणार्थ
समजा ,अबक हा व्यक्ती 40 वर्षाचा आहे आणि एका कंपनीमध्ये 50 हजाराच्या पगार वरती काम करत आहे त्याच्यावर अवलंबून पत्नी आणि दोन मुले आहेत पण अचानक जर त्याचे निधन झाले तर अशावेळी त्याच्या कुटुंबावर खूप भावनिक नुकसान होईल आणि त्याबरोबर आर्थिक संकट येईल .घरातील कर्त्या व्यक्ती जाण्यामुळे आर्थिक पोकळी निर्माण होईल.मुलांच्या शिक्षणासाठी ,रोजचे खर्च भागवण्यासाठी, गृह कर्जाचे हप्ते भरण्यासाठी व यासारखे इतर खर्चाच्या समस्या कुटुंबासमोर येतील पण जाणाऱ्या व्यक्तीची पोकळी विमा भरून काढू शकत नाही पण जे आर्थिक संकट कुटुंबावरती उद्भवलेले आहे ते विमा घेऊन तुम्ही कर्त्या व्यक्तीच्या जबाबदाऱ्या पार पाडू शकता.
त्यासाठी कुटुंब प्रमुखाच्या वरती अवलंबून असणाऱ्या सदस्यांच्या गरजेनुसार किती फंड ची गरज आहे याचे नियोजन करून विमा घेऊन त्याचे नियमित प्रीमियम भरणे गरजेचे आहे जर तुम्ही नियमित प्रीमियम जर भरले तर तुमचा विमा क्लेम रक्कम मिळेल त्यातून कुटुंब प्रमुख गेल्यानंतर कुटुंबाची आर्थिक घडी बसवण्यास मोलाची मदत होईल. यासाठी विमा घेऊन आपण जोखीम आणि आर्थिक नुकसान टाळू शकतो.
* तुम्हाला किती रकमेच्या जीवन विमाची गरज आहे ? | How much life insurance do you Need ?
साधारणपणे विमा सल्लागार तुमच्या सध्याच्या वार्षिक उत्पन्नाच्या किमान 15 ते 20 पट विमा संरक्षण घेण्याचा सल्ला देतात म्हणजे तुमचे सध्याचे वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये असेल तर तुम्ही साधारणता 2 कोटी रक्कमेचा जीवन विमा घेणे आवश्यक आहे.
Term insurance = 20 × Annual income
= 20 × 10,00,000
= 2,00,00,000
2. सर्वसाधारण विमा | General insurance
मालमत्तेचे कोणतेही अनपेक्षित नुकसानी पासून संरक्षण मिळवण्यासाठी सामान्य विमा घेतला जातो. नॉन लाइफ इन्शुरन्स कव्हर केले जातात General insurance चे काही प्रकार खालील प्रमाणे.
1. आरोग्य विमा | Health Insurance
आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये उपचाराचा खर्च गगनाला भिडले आहेत त्यामुळे आरोग्य विमा घेणे ही काळाची गरज बनली आहे. जर आपण आजारी पडलो आणि 5 ते 7 दिवस दवाखान्यामध्ये ऍडमिट झालो तर वैद्यकीय खर्च लाखाच्या घरात जातो असा अनेक जणांचा अनुभव आहे हे सर्व खर्च सामान्य लोकांच्या अवाक्या बाहेरचे आहेत. अशावेळी भविष्यामध्ये आपण खूप आजारी पडलो तर आरोग्य विमा पॉलिसी आपल्या उपचाराचा सर्व खर्च कव्हर करते. आरोग्य विमा पॉलिसी नुसार या विमा कंपन्या आपल्या आजारांवर होणाऱ्या खर्चाचा मोबदला देतात . आरोग्य विमा तुमचे वैद्यकीय आणि शस्त्रक्रिया खर्च कव्हर करते साधारणपणे बहुतेक रुग्णालयामध्ये कॅशलेस सुविधा आहे. आरोग्य विमा साधारणता आपल्या वर्षाच्या कमाईचा अर्धा असावा असे विमा सल्लागार सांगतात .
Health insurance = 1/2 × Annual income
= 1/2. ×™10,00,000
= 5,00,000
2. अपघात विमा | Accident Insurance
अपघात विमा मध्ये जर विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास ठरलेली रक्कम विमाधारकाच्या वारसाला मिळते आणि जर अपघातात अपंगत्व आल्यास अपंगत्वाच्या प्रमाणानुसार विमा धारकाला पैसे मिळतात म्हणजे अपंगत्व विमा मध्ये कायमस्वरूपी अपंगत्व, अपघाती अपंगत्व , दीर्घकाली अपंगत्व आणि अल्पकालीन अपंगत्व आल्यास अपंगत्वानुसार रक्कम देण्यात येते विमा अशा प्रसंगात कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी विमा मदत करू शकतो.
3. वाहन विमा | Vehicle Insurance
वाहन विमा घेतल्यानंतर जर तुमच्या वाहनाचा अपघात झाला असेल त्यामुळे इतर व्यक्तीचे ,मालमत्तेचे नुकसान होऊ शकते म्हणून थर्ड पार्टी इन्शुरन्स घेतला जातो व दुसरा विमा म्हणजे वाहन आणि त्याचे विविध भाग यांचे अपघाताने होणारे नुकसान भरून मिळावे म्हणून वाहन विमा घेतला जातो. म्हणजेच वाहन विमा मध्ये वाहनाचे नुकसान झाल्यास वाहनाच्या नुकसानीचे संरक्षण मिळण्यासाठी वाहन विमा घेतला जातो.
4. अग्नी विमा | Fire Insurance
आगीचा विमा यामध्ये इमारतीला किंवा वस्तूला आगीच्या धोक्यापासून संरक्षण देते त्यामध्ये जर मालमत्तेचे आगीपासून नुकसान झाले तर अग्नी विमा उतरवला असेल तर अग्नी विमा विमेदाराला आगीच्या धोक्यापासून संरक्षण देते.
5. मालमत्तेचा विमा | Property insurance
चोरी ,नैसर्गिक आपत्ती यामुळे होणारे मालमत्तेचे नुकसान भरून काढण्यासाठी मालमत्तेचा insurance घेतला जातो. घर , वस्तू, मशनरी, कच्चामाल या वस्तूंचा सुद्धा विमा घेतला जातो या जर करारात नमूद स्थिती उद्भवली तर मान्य केलेली भरपाई विमा कंपनीकडून मिळू शकते.
संभाव्य नुकसानी पासून संरक्षण मिळवण्यासाठी विमा योजना खरेदी करताना विमा सल्लागाराचा सल्ला घेऊन विमा खरेदी करावा. आणि भविष्यात येणाऱ्या संभाव्य नुकसानी पासून संरक्षण करावे.
Amit jadhav
August 17, 2023 @ 3:28 am
आयुष्यामध्ये विमा किती महत्वाचा आहे हे समजले खूप खूप धन्यवाद
Dipali patil
August 18, 2023 @ 8:15 am
छान माहिती आहे
Priyanka
August 29, 2023 @ 10:49 am
छान माहिती आहे
Rajaram Chawde
September 3, 2023 @ 7:24 am
Nice information
Ram
September 3, 2023 @ 8:20 am
विमा विषयावर छान माहिती मिळाली
Shivanjali
September 5, 2023 @ 3:39 pm
Knowledgeable information about insurance
Anjali
September 10, 2023 @ 3:15 am
अगदी सरळ सोप्या भाषेत खूप छान माहिती आहे.
Archana patil
October 6, 2023 @ 5:48 am
Knowledge information
Jaya
October 11, 2023 @ 1:31 am
Knowledgeable information about insurance
Jayashree thorat
October 12, 2023 @ 3:49 am
knowledgeable information