आपत्कालीन निधी म्हणजे काय ? | What is an Emergency Fund ?
Emergency Fund म्हणजे आर्थिक संकटाच्या वेळी उपयोगी येण्यासाठी जे पैसे साठवलेले असतात त्याला “इमर्जन्सी फंड” असे म्हणतात.
Emergency Fund चा उद्देश आर्थिक सुरक्षा मिळवणे की ज्याचा उपयोग आजारपणात व अनपेक्षित येणाऱ्या खर्चासाठी असतो. आर्थिक नियोजनाचा महत्वाचा भाग म्हणजे आपत्कालीन निधी बनवणे. आपत्कालीन निधी तयार करण्यापूर्वी हार मानू नका. बचत करण्याचा खेळ हा मानसिक असतो आणि तुम्ही तो जिंकू शकता. जर तुम्ही शून्यापासून सुरुवात करत असाल तरीही नियमितपणे थोडे थोडे पैसे बचत करून Emergency Fund तयार करू शकता. यासाठी फक्त वेळ आणि थोडी शिस्तअसणे गरजेचे आहे.
जेव्हा अचानक नोकरी जाते, आजारपण येते, कारची मोठी दुरुस्ती येते, घराची दुरुस्ती येते किंवा असेच इतर अनपेक्षित पणे खर्च येतात यासाठी Emergency Fund खूप गरजेचा आहे जेव्हा लोक लॉकडाऊन मध्ये सर्व घरी बसले होते तेव्हा ज्यांनी ज्यांनी Emergency Fund बनवला असेल त्यांना तो नक्कीच कामी आला असेल व मानसिक त्रासापासून संरक्षण मिळाले असेल.
Emergency Fund हा तुमच्या जीवनशैलीवरचा खर्च, मासिक खर्च, उत्पन्न , कर्जाचे हप्ते, गुंतवणुकीची रक्कम ,तुमच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्ती इत्यादी घटकावर अवलंबून आहे.आर्थिक सल्लागार हे कमीत कमी 3 महिने ते जास्तीत जास्त 6 महिन्या पर्यंतच्या खर्चा एवढी रक्कम आपत्कालीन निधी मध्ये साठवण्या साठी सल्ला देतात परंतु तुम्ही तुमच्या गरजेनुसार म्हणजेच आपण विवाहित आहोत का ? मुले किती आहेत ,कोणाला आजारपण आहे का ? अनपेक्षितपणे खर्च येण्याची जास्त शक्यता असेल तर तुम्ही इमर्जन्सी फंडाची रक्कम वाढवू शकता की तो फंड तुम्हाला अनपेक्षित खर्चाच्या वेळी मदत करेल. पण बनवलेला आपत्कालीन निधी शुल्लक कारणासाठी न वापरता अनपेक्षित खर्चा साठी आणीबाणीच्या वेळी साठी वापरला पाहिजे.
1.आपत्कालीन निधी मुळे तुम्हाला क्रेडिट कार्डचे कर्ज घेणे किंवा असुरक्षित कर्ज घेणे याची गरज लागत नाही त्यामुळे तुमची गुंतवणूक मध्येच थांबू न देण्यासाठी आपत्कालीन निधी गरजेचा आहे.
2.आपत्कालीन निधी हा भविष्यातील अनपेक्षित खर्च यासाठी गरजेचे आहे.
3.आपत्कालीन निधी मध्ये साधारणपणे 6 महिन्यांचे खर्च जमा करणे गरजेचे आहे.
4.Emergency Fund हा Liquid fund मध्ये किंवा अशा ठिकाणी ठेवला पाहिजे की तो आपणास अडचणीच्या वेळी लगेच उपलब्ध होईल.
5.आपत्कालीन निधी तयार करण्यासाठी फंडची रक्कम निश्चित करून त्यासाठी थोडे थोडे करून पैसे साठवण्यास सुरुवात करा.
आपत्कालीन निधी कसा तयार करायचा | How to Build an Emergency Fund
लहान बचतीपासून सुरुवात करा. पहिल्यांदा लहान बचतीचे उद्दिष्ट निवडा त्यामध्ये तुम्ही यशस्वी झाला तर त्याच्यापेक्षा मोठी उद्दिष्ट निवडा व त्यानंतर त्याच्यापेक्षा उच्च उद्दिष्टे निवडा असे जर तुम्ही केले तर बचत करणे ही एक सवय बनून जाईल. लहान उद्दिष्ट साध्य केल्यामुळे तुम्हाला सकारात्मक प्रेरणा मिळून मोठे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल.
त्यासाठी पहिल्यांदा Emergency Fund ची रक्कम निश्चित करून त्याचा कालावधी ठरवून त्याची विभागणी महिन्यावर करून प्रत्येक महिन्याच्या पगारातून थोडी थोडी रक्कम आपत्कालीन निधी मध्ये Auto debit च्या माध्यमातून ती रक्कम प्रत्येक महिन्याला त्या खात्यात वळवू शकता. एकदा फंड तयार झाल्यानंतर दीर्घकालीन (Long term )किंवा इतर उद्दिष्टांसाठी अतिरिक्त बचत गुंतवणूक (investment) करू शकता.
आपत्कालीन निधी कोठे ठेवावा | Where to keep Emergency Fund
Emergency Fund बचत खात्यामध्ये ठेवला तर तुमच्या पैशाचे नक्कीच रक्षण होईल व तुम्हाला गरज असेल तेव्हा सहज उपलब्ध होईल पण चलनवाढीमुळे त्या पैशाची किंमत कमी होईल. जर तुम्हाला Emergency Fund वरती परतावा मिळवायचा असेल तर ते पैसे money market फंडमध्ये ठेवण्याचा विचार तुम्ही करू शकता मनी मार्केट फंड हे बचत (saving) खात्या सारखेच असतात त्याची जोखीम (risk)कमी असते व money market खाती पारंपारिक बचत खात्यापेक्षा जास्त व्याजदर देतात.
लिक्विड फंड | Liquid fund
Emergency fund तयार करण्याचा Liquid mutual fund हा सर्वोत्तम मार्ग आहे. हे debt fund 91 दिवसां पर्यंत मॅच्युरिटी असलेल्या Bond मध्ये गुंतवणूक करतात. Liquid fund कमी-जोखीम असतात आणि त्याच वेळी, तुम्हाला बचत बँक खात्यापेक्षा जास्त परतावा मिळवण्याची संधी मिळते.
Emergency Fund चे पैसे सुरक्षित आणि सहज उपलब्ध असावेत. म्हणून जर तुम्हाला हे पैसे गुंतवणूक करायची असेल तर कमी जोखीम असलेल्या गुंतवणुकीच्या पर्यायांचे लक्ष्य ठेवा. तुमच्या वैयक्तिक परिस्थिती आणि उद्दिष्टांनुसार तुमचा निधी कसा गुंतवणूक करायचा याबद्दल अधिक मार्गदर्शनासाठी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या…..
विमा म्हणजे काय ? | what is insurance ?
August 10, 2023 @ 3:04 pm
खुपच छान माहिती दिली आहे
Amit jadhav
August 17, 2023 @ 3:29 am
इमर्जन्सी फंड विषयी तुमच्या पोस्टच्या माध्यमातून इमर्जन्सी फंड विषयी माहिती मिळाली मी आजच इमर्जन्सी फंड करण्यासाठी सुरुवात करणार आहे धन्यवाद
Dipali patil
August 25, 2023 @ 4:51 pm
इमर्जन्सी फंड विषयी खूप महत्त्वाची माहिती सांगितली आहे .हा लेख वाचून प्रत्येकाने इमर्जन्सी फंड तयार करण्यासाठी सुरुवात केली पाहिजे.
Atish more
August 28, 2023 @ 3:34 pm
Nice information
Priyanka
August 29, 2023 @ 10:56 am
खूप छान माहिती आहे
Rajaram Chawde
September 3, 2023 @ 7:27 am
Knowledgeable information
Ram
September 3, 2023 @ 8:24 am
Emergency fund बद्दल खूप छान माहिती मिळाली
Shivanjali
September 5, 2023 @ 4:22 pm
Knowledgeable information about Emergency Fund
Anjali
September 10, 2023 @ 3:14 am
अगदी सरळ सोप्या भाषेत खूप छान माहिती आहे.
Swaraj
September 23, 2023 @ 5:04 pm
Knowledgeable information about Emergency Fund
Archana patil
October 6, 2023 @ 5:55 am
Knowledgeable information
Jaya
October 11, 2023 @ 1:30 am
Knowledgeable information about Emergency Fund
Jayashree thorat
October 12, 2023 @ 3:50 am
Knowledgeable information about Emergency Fund
Hemant
November 27, 2023 @ 10:44 am
Great and valuable information 👍