महागाई म्हणजे काय ? | What is Inflation ?
महागाई म्हणजे ठराविक कालावधी नंतर वस्तूच्या किंमतीमध्ये झालेली वाढ होय . महागाई वाढल्यामुळे पैशाची क्रयशक्ती कमी होते म्हणजेच आज वस्तू आपण घेतोय ती ठराविक कालावधीनंतर घेण्यासाठी आपणास जास्त पैसे द्यावे लागतात याला आपण महागाई (inflation) असे म्हणतो. ही चलनवाढ टक्केवारी मध्ये मोजली जाते व ती देशाच्या आर्थिक स्थितीचे सुचक म्हणून वापरली जाते.
महागाईचे उद्दिष्ट उत्पादन आणि सेवांच्या किंमतीतील बदलाचे मोजमाप करणे होय. म्हणजेच एका ठराविक कालावधीनंतर अर्थव्यवस्थेतील वस्तू आणि सेवांच्या किंमतीमध्ये किती बदल होतो हे मोजणे म्हणजेच कालांतराने आपण ज्या वस्तू वापरतो त्या म्हणजे अन्नधान्य, कपडे , धातू , वीज , इंधन , वाहतूक सेवा ,आरोग्यसेवा , मनोरंजन इत्यादी वस्तू व सेवांच्या किमतीतील बदल होय.
आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये पैशाची क्रयशक्ती कशी बदलते याबद्दल थोडी माहिती असणे गरजेचे आहे . कारण वस्तू व सेवांच्या किंमती वाढतात याचा अर्थ आपणास पैशाने वस्तू आणि सेवा खरेदी करण्याची ताकद कमी होते हा पैशाच्या शक्तीचा तोटा सामान्य लोकांच्या राहणीमानातील खर्चावर खूप परिणाम करतो यासाठी महागाई Inflation बद्दल माहिती घेणे गरजेचे आहे.
महागाई म्हणजे काय हे आपणाला थोडक्यात माहित झाले आहे पण महागाईमुळे आपल्या गुंतवणूकीवर आणि आपल्या आर्थिक भविष्यावर काय परिणाम होतो याची माहिती घेणे खूप आवश्यक आहे . कारण आपण जे पैसे कमवतो त्यावरती पहिल्यादा आपण इन्कम टॅक्स देतो. त्यानंतर जे पैसे येतात त्यातून आपण दैनंदिन खर्चासाठी, कर्जासाठी पैसे वापरतो व त्यानंतर राहिलेल्या पैशांमध्ये बचत किंवा गुंतवणूक करतो पण महागाई जशी वाढते त्याप्रमाणे आपली गुंतवणुक वाढते काय ? महागाई पेक्षा जास्त आपल्याला गुंतवणुकीतून परतावा मिळतो काय ? का जो परतावा आपल्याला मिळतो तो परतावा महागाई खाऊन टाकते काय ? याची पण माहिती घेणे खूप गरजेचे आहे.
आपण जे कष्ट करून पैसे कमवतो त्यापासून आपल्याला अशी गुंतवणूक करायची आहे की ती Inflation पेक्षा जास्त परतावा देतील त्या ठिकाणी आपणास गुंतवणूक करावयाचे आहे. तर अशा गुंतवणुकीचे मार्ग कोणते आहेत याची माहिती घेऊन जवळच्या गरजांसाठी त्याच्या बचत करायच्या उद्देशाने Fixed income investment मध्ये म्हणजेच मुदत ठेवी, पोस्ट ऑफिस, रिकरिंग डिपॉझिट मध्ये गुंतवणूक केली पाहिजे.
दीर्घ कालावधीतील ध्येयासाठी Variable income क्लास म्हणजे Real estate, stock, Mutual fund यांची निवड केली पाहिजे. दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करताना भविष्यातील आर्थिक ध्येय म्हणजेच निवृत्ती ( Retirement planning )मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न कार्य , घर घेणे, कार घेणे , परदेशातील सहल याचे ध्येय समोर ठेवून आत्ताच नियोजन करून त्यासाठी बचत करून गुंतवणूक करणे गरजेचे आहे व गुंतवणूक करताना महागाई किती वाढते व आपण जेथे गुंतवणूक करतोय यामधून आपणास परतावा किती मिळतो आहे हे पाहून गुंतवणूक केली पाहिजे.
2. महागाई दर म्हणजे काय ? | What is the inflation rate ?
एखादी वस्तू विकत घेण्यासाठी आपणास यावर्षी जेवढे पैसे लागतात तीच वस्तू पुढील वर्षी विकत घेण्यासाठी तुलनेने जास्त पैसे द्यावे लागतात ही महागाई मोजताना टक्केवारी मध्ये मोजली जाते त्याला “महागाई दर ” Inflation rate असे म्हणतात.
3. महागाई कशी वाढते ? | How does inflation increase ?
महागाई ही चक्रवाढ दराने वाढत असते. म्हणजे अर्थव्यवस्थेतील वाढीबरोबर आपण जर वस्तू आणि सेवांसाठी पूर्वी पेक्षा जास्त मागणी करू लागलो तर त्यामुळे पुरवठ्यापेक्षा मागणी जास्त वाढत आहे त्यामुळे उत्पादक हे वस्तूची किंमत वाढवतात त्यामुळे Inflation वाढते. म्हणजे आपण एक वस्तू यावर्षी 100 रुपये या किंमतीला घेतली व पुढील वर्षी तीच वस्तूसाठी आपणास 105 रुपये द्यावे लागतात म्हणजे महागाई दर हा 5% आहे पण पुढील वर्षी सुद्धा Inflation ही 5% नि वाढली तर आपणास 105 या रुपये वरती 5% महागाई दराने पैसे द्यावे लागतात म्हणजे महागाई ही वाढेलेल्या किंमतीवर वाढते म्हणजे “महागाई चक्रवाढ” दराने वाढते.
ग्राहक किंमत निर्देशांक Consumer price index (CPI) याद्वारे चलन वाढीचा दर मोजला जातो. पण महागाई वाढते म्हणजे अर्थव्यवस्थेतील प्रगती बरोबर लोकांचे पगार आणि त्यामुळे खर्च पण वाढतात पण प्रत्येक वेळी महागाई वाढणे म्हणजे वाईट नाही महागाई वाढत्या अर्थव्यवस्थेचे लक्षण आहे . पण मंद चलनवाढ विकासाला चालना देण्यासाठी आणि आर्थिक प्रगतीला मदत करण्यासाठी आवश्यक आहे जर मंद चलनवाढ असेल तर ग्राहकांना खरेदी बचत करण्यास प्रोस्ताहन मिळते.
पण जर Inflation जर जास्त वाढली तर केंद्र सरकार आणि रिझर्व बँक ही महागाई दर आटोक्यात आणण्यासाठी (RBI) The Reserve Bank of India ( CRR)Cash Reserve Ratio वाढवून महागाई नियंत्रण करते आणि रिव्हर्स रेपो रेट (Reverse Repo Rate) किंवा बँक ज्या दराने आरबीआय कडून कर्ज घेतात त्या व्याजदरात वाढ करून देशातील व्यापारी बँकांच्या कर्ज देण्याची क्षमता मर्यादित करून महागाई ( inflation)कमी करण्यासाठी प्रयत्न करते.
4. महागाई वाढण्याची कारणे | Reasons for rise in inflation
- आर्थिक प्रगतीच्या काळात वस्तू व सेवांची मागणी वाढत असल्यामुळे त्यांच्या किंमती मध्ये सतत वाढ होत आहे. जेव्हा मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त असते तेव्हा विक्रेत्यांद्वारे किंमत वाढवली जाते .
- इंधन आणि खाद्यपदार्थांच्या किंमती वाढल्या मुळे त्याचा इतर क्षेत्रांवर परिणाम होऊन महागाईचा दर वाढतो.
- अन्नधान्याची उत्पादन कमी होणे.
- अर्थव्यवस्थेतील प्रगती बरोबर लोकांचे पगार आणि त्यामुळे खर्च पण वाढतात त्यामुळे महागाई वाढते .
- बाजारातील एखाद्या अत्यावश्यक वस्तू किंवा सेवा साठी योग्य पर्याय नसतो अशा परिस्थिती मध्ये त्या वस्तूंच्या किंवा सेवांच्या किंमती वाढतात त्यामुळे महागाई वाढते.
5. महागाई वरती मात कशी कराल ? | How to overcome inflation ?
आपल्या पैशाची नुकसान टाळण्यासाठी म्हणजेच आपल्या पैशाची क्रयशक्ती कमी न होऊ देण्यासाठी फक्त बचत करणे पुरेसे नाही . कारण बचत खाते मध्ये पैसे ठेवले तर आपल्या बचत खात्यावरती जो परतावा मिळतो तो आपणास मिळाल्यानंतर त्या पैशाचे क्रयशक्ती कमी झालेले असते म्हणजेच
समजा, जर तुमच्या मुलाला डॉक्टर करायचा आहे आणि त्या कोर्ससाठी अंदाजे आता 10 लाख रुपये खर्च येतो व जर तुम्ही तुमच्या पैशाची गुंतवणूक Fixed income investment मध्ये म्हणजे PPF सारख्या Asset class मध्ये जर गुंतवणूक केली व त्याचा परतावा 7.10 टक्के (सध्याचा व्याजदर) व्याजदराने मिळाला तर 15 वर्षानंतर तुम्हाला 28.73 लाख एवढी रक्कम भेटेल पण डॉक्टर कोर्सच्या फी 10 टक्के व्याजदराने जर वाढली तर त्यावेळेस त्या कोर्सची फी 43.99 लाख एवढी होईल. त्यामुळे आपण गुंतवणूक करून सुद्धा आपल्या मुलासाठी आपण कोर्स फी जमा करू शकणार नाही.
त्यामुळे दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करणार असेल तर Mutual fund सारख्या Variable income asset क्लास यामध्ये आर्थिक सल्लागाराच्या मदतीने गुंतवणूक करून ध्येय पूर्ण करू शकता यासाठी ध्येय ठरवताना सध्या त्या कोर्सची फी किती आहे, त्या कोर्स फी ची दरवाढ किती आहे या गोष्टी ची माहिती घेऊन गुंतवणूक केली पाहिजे तेव्हाच आपण दीर्घकालीन उद्दिष्ट साध्य करू शकतो.
Inflation वेगाने वाढत चाललेली आहे त्याचबरोबर आपली गुंतवणूक मधील परतावा महागाई दरा पेक्षा जास्त मिळवून महागाईवर मात करू शकतो त्यासाठी Variable income asset क्लास ची माहिती घेऊन गुंतवणूक करण्यास सुरुवात करा व तुमच्या भविष्यातील आर्थिक ध्येय अगदी सहजतेने पूर्ण करा . पण कोणतेही गुंतवणूक करताना आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊन गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
Hemant Subhash Thorat
August 6, 2023 @ 5:20 pm
खूप खूप छान माहिती आहे.
गुंतवणूक म्हणजे काय ? | What is investment ?
August 10, 2023 @ 9:40 am
मिळणारा परतावा महागाई ( inflation) वरती मात करू शकतो
Amit jadhav
August 17, 2023 @ 3:26 am
महागाई विषयी कधी एवढा विचार केला नव्हता या माहिती द्वारे महागाई म्हणजे मग काय असते व महागाई पेक्षा जास्त परतावा मिळवण्यासाठी गुंतवणूक कोठे करावी याचीही माहिती तुमच्या वेबसाईटवरून मिळाली आहे खूप खूप धन्यवाद
Dipali patil
August 18, 2023 @ 8:26 am
महागाईविषयी खूप सखोल माहिती मिळाली.खूप सोप्या
शब्दात आणि अर्थपूर्ण माहिती आहे .वाचकांच्या ज्ञानात
तुमच्या लेखामुळे खरोखरच भर पडेल.
खूप खूप धन्यवाद
Rajaram Chawde
August 27, 2023 @ 11:00 am
खूप छान माहिती आहे
Atish more
August 28, 2023 @ 3:41 pm
खूप छान माहीती आहे
Priyanka
August 29, 2023 @ 10:53 am
Very very knowledgeable
Shivanjali
September 5, 2023 @ 3:26 pm
Inflation विषयी खूप छान माहिती मिळाली
Ram
September 3, 2023 @ 8:15 am
महागाई बद्दल खूप छान माहिती मिळाली
Anjali
September 10, 2023 @ 3:15 am
अगदी सरळ सोप्या भाषेत खूप छान माहिती आहे.
Archana patil
October 6, 2023 @ 5:45 am
helpful information
Jaya
October 11, 2023 @ 1:32 am
helpful information
Jayashree thorat
October 12, 2023 @ 3:48 am
knowledgeable information