ELSS कर बचत म्युच्युअल फंड म्हणजे काय ? | What is ELSS Tax Saving Mutual Fund ?
बाजारामध्ये गुंतवणूक करण्यासारखी खूप योजना उपलब्ध आहेत त्यापैकी कर बचत, महागाई पेक्षा जास्त परतावा मिळवून संपत्ती निर्माण करण्यासाठी Equity Linked Savings Scheme Mutual funds योजना याबद्दल जाणून घेऊयात….
Equity Linked Savings Scheme हे गुंतवणूक दारासाठी कर बचत व जास्त परतावा मिळवणे या दोन्ही उद्दिष्टांसाठी गुंतवणूक करण्यासाठीचे mutual fund ची योजना आहे. इक्विटी-लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक 3 वर्षासाठी लॉक होते म्हणजेच जर तुम्ही एक रक्कमी गुंतवणूक केली तर त्याचा लॉक इन कालावधी 3 वर्षाचा असतो पण तुम्ही SIP मोडद्वारे गुंतवणूक केल्यास प्रत्येक SIP हप्त्याला जेव्हा 3 वर्षे पूर्ण होतील तेव्हा त्याचा लॉक इन कालावधी पूर्ण होईल म्हणजे 3 वर्षानंतर रक्कम तुम्ही ELSS म्युच्युअल फंड मधून काढू शकतो.
2. ELSS म्युच्युअल फंड मध्ये कोणी गुंतवणूक करावी | Who should invest in ELSS Mutual Fund ?
Equity Linked Savings Scheme मधील गुंतवणूक ही इक्विटी फंड मध्ये केली जाते त्यामुळे ज्यांची जोखीम घेण्याची क्षमता आहे त्यांनी इक्विटी-लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करावी. गुंतवणूक केलेली रक्कम 3 वर्षासाठी “लॉक इन” होते त्यामुळे ज्यांना 3 वर्षाचा कालावधी साठी रक्कम लॉक इन झाली तरी चालेल अशा गुंतवणूकदारांनी इक्विटी-लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम कर बचत योजनेत गुंतवणूक करावी.
3. ELSS म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे काय आहेत ? | What are the benefits of investing in ELSS mutual funds ?
- Equity Linked Savings Scheme म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करून कर बचत करण्याबरोबर आपण महागाई पेक्षा जास्त परतावा मिळवू शकतो.
- Equity Linked Savings Scheme मध्ये कमीत कमी ( Low amount )500 रुपये पासून गुंतवणूक करण्यास सुरुवात करू शकता.
- Equity Linked Savings Scheme मध्ये SIP द्वारे गुंतवणूक करून संपत्ती निर्माण करण्यासाठी करण्याचा लाभ घेऊ शकता
- कायद्याच्या कलम 80 C अंतर्गत 1,50,000 पर्यंत कर बचत (Tax saving ) करू शकतो.
- एका आर्थिक वर्षामध्ये म्युच्युअल फंड मधून 1 लाखापर्यंत जर प्रॉफिट काढले तर त्याच्यावरती कोणताही ( Tax exemption ) टॅक्स द्यावा लागत नाही.
- बहुतेक ELSS म्युच्युअल फंड मध्ये स्मॉल कॅप पासून लार्ज कॅप पर्यंतच्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली जाते त्यामुळे तुम्हाला ELSS मध्ये गुंतवणूक करून पोर्टफोलिओ मध्ये विविधरणाचा (Diversification)फायदा मिळतो.
4. ELSS म्युच्युअल फंडमधील जोखीम काय आहे | What is the Risk in ELSS Mutual Fund ?
Equity Linked Savings Scheme मधील गुंतवणूक इक्विटी मध्ये होते इक्विटी मार्केट हे अस्थिर आहे म्हणजेच आर्थिक अनिश्चितता , युद्ध , राजकीय अस्थिरता , साथीचा रोग, मंदी यासारख्या संकटामुळे शेअर बाजार कोसळू शकतात अशावेळी म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक केलेली रक्कम कमी होते अशावेळी तुम्ही म्युच्युअल फंड मधील रक्कम काढून त्या योजनेतून बाहेर पडू शकत नाही या सर्व गोष्टींचा विचार करून जोखीम घेण्याची क्षमता ठरवून व कमीत कमी तीन वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी गुंतवणूक केलेली रक्कमेची गरज भासणार नसल्यास इक्विटी-लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करावी.
त्याच्या उलट आर्थिक अनिश्चिततेच्या काळात म्युच्युअल फंडमधील रक्कम तुम्ही काढू शकत नाही पण बाजार कोसळतो त्यावेळी म्युच्युअल फंड मधील NAV ची किंमत कमी होते व आपण अशावेळी कमी रक्कमे ( NAV) मध्ये जास्त UNIT घेऊ शकतो. अशा वेळी जर गुंतवणूक केली तर दीर्घ कालावधीमध्ये आपणास जास्त परतावा मिळू शकतो.
जसे आर्थिक अनिश्चिततेच्या काळात गुंतवणूकदार म्युच्युअल फंड मधून बाहेर पडू शकत नाहीत तसेच मार्केटच्या भरभराटीच्या काळात सुद्धा गुंतवणूकदार म्युच्युअल फंड मधून लॉक इन कालावधीमध्ये बाहेर पडून शकत नाहीत त्यामुळे दीर्घ कालावधी साठी जे गुंतवणूकदार गुंतवणूक करणार आहेत त्यांना चांगला परतावा इक्विटी-लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम म्युच्युअल फंड मधून मिळतो. कारण मार्केट भरभराटीला लागल्यानंतर मार्केट वरती जाणार असून सुद्धा जर गुंतवणूकदारांनी लॉक इन नसलेल्या म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक काढली तर त्यामुळे म्युच्युअल फंड चांगला परतावा देऊ शकत नाहीत.
दीर्घकाळात इक्विटी-लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना चांगला परतावा देऊन चक्रवाढ व्याजाचा ( compounding interest ) फायदा होतो. गुंतवणुकीचा कालावधी जितका जास्त असेल तितका जास्त परतावा मिळण्याची शक्यता म्युच्युअल फंड मध्ये जास्त असते. इक्विटी-लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम म्युच्युअल फंड तुमची (wealth creation) संपत्ती निर्मिती करू शकतात आणि तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करू शकतात.
5. ELSS म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक SIP द्वारे करावी की Lumpsum करावी | Investment in ELSS Mutual Fund should be done through SIP or Lumpsum
Mutual fund मध्ये गुंतवणूक करण्याच्या 2 पद्धती आहेत एक म्हणजे SIP व दुसरी म्हणजे Lumpsum ही आहे.
1. Systematic Investment Plan (SIP) म्हणजे काय ?
SIP हा ठराविक रक्कम नियमितपणे म्हणजे साधारणपणे मासिक म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली जाते त्यास “SIP “असे म्हणतात.
SIP द्वारे गुंतवणूक करून गुंतवणूकदारांना शिस्तबद्ध बचत करून गुंतवणूक करण्याची सवय लागते त्याद्वारे गुंतवणूकदार नियमितपणे दीर्घकाळासाठी गुंतवणूक करतात आणि बाजारातील चढ उताराचा सरासरी फायदा घेऊन दीर्घ कालावधीमध्ये चक्रवाढ व्याजाप्रमाणे परतावा मिळतात. म्हणजे ज्यावेळी बाजार घसरतो त्यावेळी तुम्ही कमी NAV मध्ये जास्त युनिट खरेदी करता व जेव्हा बाजार तेजी मध्ये असतो तेव्हा NAV वाढतो त्यामुळे कमी युनिट खरेदी केले जातात पण कालांतराने तुमच्या युनिटच्या खरेदीची सरासरी किंमत मिळून दीर्घ कालावधीमध्ये चांगला परतावा मिळतो SIP मध्ये गुंतवणूक करून सरासरी किंमत मिळत असल्यामुळे SIP मध्ये गुंतवणूक करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहण्याची गरज भासत नाही.
2. Lumpsum म्हणजे काय ?
ज्या गुंतवणूकदारांकडे जास्त पैसे उपलब्ध आहेत व ज्यांना एक रकमी म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करायची आहे ते एकाच वेळी Lumpsum या प्रकारे द्वारे म्युच्युअल फंड मध्ये मोठी रक्कम गुंतवणूक करू शकतात. एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवणूक केल्यास त्या तारखेपासून पासून जर मार्केट वरती गेले तर गुंतवणूकदारांना लगेच फायदा मिळतो पण जर गुंतवणूक केलेल्या तारखेपासून जर मार्केट खाली गेले तर जोपर्यंत आपण विकत घेतलेल्या किंमतीच्या वरती मार्केट जात नाही तोपर्यंत आपणास फायदा दिसत नाही त्यामुळे तुमची आर्थिक उद्दिष्टे , गुंतवणुकीच्या गरजा आणि जोखिग सहन करण्याची क्षमता यावरती गुंतवणूक दृष्टिकोन निश्चित करून आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊन गुंतवणूक करणे गरजेचे आहे. जे गुंतवणूकदार Lumpsum प्रकारद्वारे Risk घेऊन गुंतवणूक करण्यास तयार नसतील तर त्यावेळी त्यांना SIP द्वारे गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो .
ELSS म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करून कर बचत करून संपत्ती निर्माण करू शकता त्यासाठी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊन जोखीम निश्चित करून दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता.
Amit jadhav
August 17, 2023 @ 3:22 am
Very nice information.in my financial journey.
Dipali patil
August 25, 2023 @ 4:45 pm
खूप सोपी आणि महत्वाची माहिती सांगितली आहे.
Prithviraj
August 18, 2023 @ 8:11 am
Good information about tax saving.
Rajaram Chawde
August 27, 2023 @ 11:01 am
Nice information
Rajaram Chawde
August 27, 2023 @ 11:02 am
Nice information thanks
Priyanka
August 29, 2023 @ 10:51 am
छान माहिती आहे
Ram
September 3, 2023 @ 8:11 am
ELSS बद्दल खूप छान माहिती मिळाली
Shivanjali
September 5, 2023 @ 3:18 pm
Knowledgeable information about ELSS
Anjali
September 10, 2023 @ 3:20 am
अगदी सरळ सोप्या भाषेत खूप छान माहिती आहे.
Archana patil
October 6, 2023 @ 5:28 am
Good information
Jaya
October 11, 2023 @ 1:34 am
Helpful information about ELSS
Jayashree thorat
October 12, 2023 @ 3:46 am
Knowledgeable information about ELSS