गुंतवणूक म्हणजे काय ? | What is investment ?
गुंतवणूक म्हणजे भविष्यात संपत्ती निर्माण करण्याच्या उद्देशाने वस्तू , मालमत्तेची खरेदी करणे याला “गुंतवणूक ” (investment )असे म्हणतात. गुंतवणुकीमध्ये वस्तू किंवा मालमत्ता खरेदी करून भविष्यात त्याची किंमत वाढेल या उद्देशाने वस्तू खरेदी करून भांडवली नफ्याच्या स्वरूपात परतावा मिळवणे होय.
Investment म्हणजे तुमचे स्वतःचे जीवन किंवा इतरांचे जीवन सुधारण्यासाठी वेळ किंवा पैसा खर्च करणे हे देखील असू शकते. परंतु वित्त जगात गुंतवणूक म्हणजे भांडवली नफा किंवा उत्पन्न मिळवण्यासाठी वस्तू , मालमत्तेची खरेदी करणे हे आहे.
पैसे कमवण्यासाठी तुम्ही खूप मेहनत करता यामुळे तुमच्या दैनंदिन गरजा भागवल्या जातात. परंतु तुम्ही जे पैशाची बचत (saving) करता ती मुदत ठेवी खात्यात म्हणजेच निश्चित उत्पन्न देणाऱ्या मालमत्ता वर्गामध्ये ठेवता. पण महागाई जशी वाढते तशी तुमच्या गुंतवणुकीमधील परताव्यामध्ये वाढ होत नाही . त्यामुळे भविष्यात जे ध्येय तुम्हाला मिळवायचे आहे ते बचत व गुंतवणूक करून सुद्धा तुम्ही महागाईमुळे मिळवू शकत नाही .
त्यामुळे Investment करताना महागाई पेक्षा जास्त परतावा देणाऱ्या मालमत्ता वर्गा (Asset class )मध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या पैशाचे व्यवस्थापन करून तुमच्या भविष्यातील उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी पहिल्यांदा उद्दिष्टे निश्चित करून, जोखीम घेण्याची क्षमता ठरवून, कालावधी निश्चित करून, ध्येय रक्कम ठरवून त्यासाठी नियमित बचत करून गुंतवणूक करणे खूप गरजेचे आहे. अशा गुंतवणुकीमुळे तुम्हाला संपत्ती निर्माण करण्यात मदत होते जी आपत्कालीन निधी, सेवानिवृत्ती निधी, घर खरेदीसाठी किंवा मुलाच्या शिक्षणासाठी निधी इत्यादी साठी वापरला जाऊ शकतो.
2. गुंतवणूक कसे काम करते | How investing works
जेव्हा तुम्ही वस्तू किंवा मालमत्ता कमी किंमतीमध्ये खरेदी करून ठराविक कालावधीनंतर जास्त किंमतीला विकून त्यावरती भांडवली नफा मिळवणे असे गुंतवणूक काम करते. आपण शेअर ,बॉण्ड , म्युच्युअल फंड ,रिअल इस्टेट, सोने ,चांदी , बँक अकाउंट डिपॉझिट, रिकरिंग डिपॉझिट अशा विविध मार्गाने गुंतवणूक करून ठराविक कालावधीनंतर गुंतवणुकीपासून नफा मिळवू शकतो.
3. गुंतवणूक करण्याचे 2 प्रकार | 2 Types of investment
1. अल्पकालीन गुंतवणूक | Short term investment
गुंतवणूक ही 1 महिना ,3 महिने ,1 वर्ष या कालावधीसाठी जी गुंतवणूक केली जाते यास आपण “अल्पकालीन गुंतवणूक” असे म्हणतो . अल्पकालीन गुंतवणुकीचा मुख्य उद्देश आपणास ज्यावेळी पैशाची गरज भासेल त्यावेळी गुंतवणुकीचे रोख रकमेमध्ये रूपांतर करता आले पाहिजे. अल्पकालीन गुंतवणुकीचा उद्देश जास्त परतावा मिळवण्यापेक्षा रक्कम सुरक्षितता व कमी जोखीम घेणे हा असतो. पण अशा गुंतवणुकी मधून मिळणारा परतावा कमी असू शकतो. व महागाई ( inflation) वरती मात करू शकत नाही.
उदाहरणार्थ: Fixed Deposit, Debt mutual fund
2. दीर्घकालीन गुंतवणूक | Long term investment
दीर्घकालीन गुंतवणूक ही एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी केली जाते व ती अल्पकालीन गुंतवणूकीपेक्षा जास्त परतावा देते. पण अल्पकालीन गुंतवणूकीपेक्षा दीर्घकालीन गुंतवणुकीमध्ये जास्त जोखीम असते.
उदाहरणार्थ : Stock , Equity mutual fund , रिअल इस्टेट
4. गुंतवणुकीचे उद्देश | Objective of investment
गुंतवणुकीचे उद्देश हे आपल्या गरजेनुसार बदलत असतात पण गुंतवणूक करण्याचा प्रत्येक वेळी उद्देश हा नफा मिळवणे हाच असतो असे नाही कारण काही वेळा बचत करणे, कर वाचवणे, नियमित उत्पन्न मिळवणे, संपत्ती निर्मिती ( wealth creation )करणे भविष्यातील आर्थिक ध्येय मिळवणे यासाठी सुद्धा गुंतवणूक करतो. सेवानिवृत्तीसाठी(retirement Planning) गुंतवणूक करणे. असे गुंतवणुकीचे विविध उद्देश असतात. Investment करणे म्हणजे पैशाला कामाला लावणे आणि संभाव्य संपत्ती निर्माण करण्यात एक प्रभावी मार्ग आहे महागाईमुळे पैशाची मूल्य कमी होण्यापासून Investment करून तुम्ही वाचवू शकता व गुंतवणुकीपासून जोखीम पत्करून चक्रवाढ वाढीप्रमाणे परतावा मिळवू शकता.
-
बचत करणे
बचत करण्याच्या सवयीमुळे अनावश्यक खर्च कमी होतात बचत केल्यामुळे एक ठराविक रक्कम तुम्ही एकत्र करू शकता त्या बचतीचे तुम्हाला गरज लागेल तेव्हा रोखीमध्ये रूपांतर करू शकता.
-
नियमित उत्पन्न मिळवणे
बचत करून गुंतवणूक केल्यास तुमचा पैसाही वाढतो आणि तुम्हाला नियमित उत्पन्न मिळण्यास मदत होते त्या नियमित उत्पन्नाचा उपयोग तुम्ही उत्पन्न वाढवण्यासाठी किंवा सेवानिवृत्ती झाल्यास नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी करू शकता. तुम्ही डेट म्युच्युअल फंड किंवा हायब्रीड म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करून त्यातून नियमित उत्पन्न स्त्रोत तयार करू शकता.
-
कर वाचवणे
कर वाचवण्यासाठी गुंतवणूक केल्यास तुमच्यावरील कराचा बोजा थोडा हलका होण्यास मदत होते आणि त्याचवेळी जर तुम्ही इक्विटी मध्ये गुंतवणूक करत असाल तर गुंतवणुकीचे मूल्य वाढून तुम्हाला महागाई पेक्षा जास्त परतावाही मिळतो. बचत करण्यासाठी तुम्ही 1961 च्या आयकर कायद्याच्या कलम 80 C अंतर्गत गुंतवणुकीचे विविध पर्याय दिलेले असतात त्यासाठी तुम्ही ELSS Mutual Fund मध्ये गुंतवणूक करून कर बचत करू शकतात त्यासाठी Lock in कालावधी हा 3 वर्षाचा असतो.ELSS Mutual funds मध्ये गुंतवणूक करून तुम्ही करमुक्त परतावा मिळवू शकता.
-
संपत्ती निर्मिती करणे
संपत्ती निर्मितीमुळे तुमचे पैसे जलद गतीने वाढण्यास मदत होते त्यासाठी तुम्ही शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, रिअल इस्टेट, कमोडिटी यासारख्या इन्व्हेस्टमेंट साधनांमध्ये Investment करून थोडासा धोका घेऊन चांगला परतावा मिळवू शकता. अशा प्रकारे, गुंतवणुकीमुळे आपोआप चलनवाढीचा सामना करण्यास मदत होईल.
5. गुंतवणूक करण्यास कधी सुरुवात करावी | When to start investing
तुम्ही जेव्हा पासून पैसे कमवण्यास सुरुवात करता त्या महिन्यापासून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली पाहिजे कारण गुंतवणुक चक्रवाढ व्याजा ( compounding interest) प्रमाणे परतावा देते त्यासाठी तुम्ही जर गुंतवणूक करण्यास लवकर सुरुवात केली तर गुंतवणूक वाढण्यासाठी तुमच्याकडे जास्त कालावधी असेल त्यानुसार दीर्घकालीन गुंतवणूक करून तुम्ही चक्रवाढ व्याजाप्रमाणे परतावा मिळवू शकता.
6. गुंतवणूक करण्यास कशी सुरुवात करावी ? | How to start investing ?
1. गुंतवणुकीसाठी ध्येय निश्चित करणे | Setting goals for investment
Investment करण्यासाठी तुमच्या भविष्यातील ध्येय काय आहेत ते स्पष्ट शब्दात लिहिणे गुंतवणूक करण्याची पहिली पायरी आहे कारण जोपर्यंत आपणास आपले ध्येय स्पष्ट होत नाही तोपर्यंत ते मिळवण्यासाठी आराखडा आपण करू शकत नाही त्यासाठी पहिल्यांदा गुंतवणुकीचे ध्येय ठरवा.
2. गुंतवणुकीचा कालावधी निश्चित करणे | Determining the duration of the investment
गुंतवणुकीचा कालावधी निश्चित करून तुम्ही अल्पकालीन गुंतवणूक करावयाची आहे का दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करायची आहे हे ठरवून त्यानुसार योग्य मालमत्ता वर्गाची निवड करू शकता.
3. गुंतवणुकीसाठी जोखीम क्षमता ठरवा | Determine the risk appetite for the investment
Investment करत असताना कालावधी ठरवल्यानंतर जोखीम घेण्याची क्षमता ठरवली पाहिजे म्हणजे अल्पकालीन गुंतवणुकीसाठी कमी जोखीम व दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी जास्त जोखीम घेऊन गुंतवणूक केली पाहिजे .अल्प कालावधीमध्ये जोखीम कमी असते व परतावा पण कमी असतो व दीर्घ कालावधीमध्ये जोखीम जास्त असते त्याचा परतावा ही अनेकदा जास्त असतो त्यासाठी गुंतवणुकीचा कालावधी निश्चित झाला की जोखीम ची निवड करू शकतो.
4. गुंतवणुकीच्या ध्येयाची रक्कम ठरवा | Determine the investment goal amount
गुंतवणुकीसाठीचे ध्येय निश्चित केले आहे, गुंतवणुकीचा कालावधी किती आहे आपणास समजले आहे . गुंतवणुकीच्या ध्येयाची रक्कम ठरवून त्यासाठी एका महिन्यात किती गुंतवणूक करावी लागेल हे ठरवावे लागेल ते म्हणजे जर तुमचे ध्येय 3 वर्षांनंतर कार खरेदी करण्याचे असेल तर तुम्ही तुमची बचत डेट म्युच्युअल फंडात गुंतवू शकता आणि तुमचे ध्येय साध्य करू शकता. पण 10 वर्षांनंतर घर खरेदी करणे म्हणजे तुम्ही इक्विटी फंड मध्ये गुंतवणूक करू शकता. खालील प्रमाणे
म्हणजेच जर आपण 10 लाख रुपये हे गुंतवणुकीच्या ध्येयाची रक्कम जर ठरवली असेल आणि त्याचा कालावधी 10 वर्षाचा जर निश्चित केला असेल तर आपणास एका महिन्यासाठी 8333 रुपये एवढी रक्कम दरमहा गुंतवणूक करावी लागेल.
उदाहरणार्थ:
दरमहा गुंतवणुकीची रक्कम = गुंतवणुकीची ध्येय रक्कम × गुंतवणुक कालावधीचे महिने
= 10,00,000/120
= 8,333
म्हणजेच जर तुम्ही 8333 दरमहा गुंतवणूक SIP च्या माध्यमातून नियमित Investment करून काही वर्षानंतर एक मोठा निधी मिळवू शकता की तो तुम्ही संपत्ती निर्मिती ,आर्थिक ध्येय पूर्ण करण्यासाठी, नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी वापर करू शकता. कोणतीही गुंतवणूक करताना आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊन गुंतवणूक करावी म्हणजे भविष्यातील ध्येय पूर्ण करण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळल्यामुळे ध्येय लवकर मिळवण्यासाठी मदत होईल.
Amit jadhav
August 17, 2023 @ 3:24 am
छान माहिती आहे वरील माहिती वाचून मी माझी गुंतवणूक चालू केली आहे खूप खूप धन्यवाद.
Dipali patil
August 18, 2023 @ 8:14 am
Very very knowledgeable
Rajaram Chawde
August 27, 2023 @ 11:01 am
खूप छान माहिती मिळाली आहे.
Priyanka
August 29, 2023 @ 10:52 am
Very very knowledgeable
Ram
September 3, 2023 @ 8:12 am
Very knowledgeable information
Shivanjali
September 5, 2023 @ 3:23 pm
Investment विषयी खूप छान माहिती मिळाली.
Anjali
September 10, 2023 @ 3:16 am
अगदी सरळ सोप्या भाषेत खूप छान माहिती आहे.
Archana patil
October 6, 2023 @ 5:41 am
Very helpful information
Jaya
October 11, 2023 @ 1:33 am
very knowledgeable information about investment
Jayashree thorat
October 12, 2023 @ 3:47 am
knowledgeable information
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांनी केलेल्या 11 चुका | 11 Mistakes Investors Make While Investing In Mutual Funds
December 17, 2023 @ 6:02 pm
[…] उद्दिष्टांकडे दुर्लक्ष करणे|Ignoring investment […]