यशस्वी सेवानिवृत्ती नियोजनासाठी 9 पायऱ्या | 9 Steps to Successful Retirement Planning
Retirement Planning साठी लक्षाधीश रूपयांचा पोर्टफोलिओ असणे हे अनेक लोकांचे स्वप्न असते.ते स्वप्न खरे करण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. Retirement planning करताना तुम्हाला जगण्यासाठी किती पैसे लागतील ? तुम्ही दरवर्षी तुमच्या निधीतून किती पैसे काढले पाहिजेत ? आपण किती काळ जगण्याची अपेक्षा करता? यानुसार फंड ची रक्कम ठरविली पाहिजे. ही भावनिक आणि महत्वाकांक्षी उद्दिष्टे आहेत. त्यामुळे तुमच्या सेवानिवृत्ती बचत, गुंतवणूक आणि खर्च योजनांमध्ये त्यांचा समावेश करणे महत्त्वाचे आहे. यश ही कधीही खात्रीशीर गोष्ट नसली तरी खाली वर्णन केलेल्या 9 पायऱ्या तुम्हाला तुमचे Retirement Planning साठीचे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत करतील.
कोणतेही ध्येय मिळवायचे असेल तर त्यासाठी नियोजन करणे खूप गरजेचे आहे. दीर्घ कालावधीसाठी Retirement planning तयार करा. Retirement साठी किती फंड ची गरज आहे व माझ्याकडे किती कालावधी शिल्लक आहे त्यानुसार रक्कम ठरवून गुंतवणूक (investment) करण्यास सुरुवात करा. त्यासाठी तुमच्या बजेटला चिकटून राहणे आणि अनावश्यक खर्च करणे टाळणे गरजेचे आहे .
2.सेवानिवृत्ती साठी पैशाची बचत करणे | money Saving for retirement
आपण बचत न करू शकण्याची कारणे म्हणजे बचत करण्यासाठी ध्येय न ठरवणे. बचत न केल्यास तुम्ही कधीही आपले ध्येय गाठू शकणार नाही. हे स्पष्ट आहे बरेच लोक कधीही बचत करण्यास सुरवात करत नाहीत व कारणे सांगतात. पण जर तुम्ही तुमची बचत करणे Auto debit वर ठेवली तर आपोआप पैसे कट होऊन तुमच्या बचत मध्ये जातील व तुमची बचत वाढेल. तुमची बचत गुंतवणुकीमध्ये रूपांतर करा . विशेषतः जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा भविष्यातील संपत्तीचा पाठपुरावा करण्यासाठी तुम्ही थांबू नका. आणि लक्षात ठेवा की तुम्ही जितक्या लहान वयात सुरुवात कराल तितका तुमचा पैसा वाढायला जास्त वेळ मिळेल.
3.जोखीम घ्या | Take the risk
तुमच्या Asset allocation वर नजर ठेवा. जर तुम्ही तुमची संपत्ती कालांतराने वाढवण्याचा विचार करत असाल तर तुम्ही Long term मध्ये Fixed Asset मध्ये गुंतवणूक करत असाल ज्यामध्ये निश्चित परतावा (Fixed income) दिला जातो पण तो महागाई (inflation) मुळे तुमच्या बचतीतील मोठा हिस्सा कमी करू शकतो. आपण कोणत्या Asset class मध्ये गुंतवणूक करतो त्यावरती आपल्याला परतावा मिळतो.
Equity मध्ये गुंतवणुकीत अधिक जोखीम(Risk )असते परंतु जास्त परतावा मिळण्याची शक्यता असते. आपल्याला जर आपली संपत्ती वाढवायची असेल तर आपल्याला ही जोखीम घ्यावी लागेल. Asset Allocation ठरवून तुम्ही वेगवेगळ्या Asset class मध्ये मिश्र पद्धतीने गुंतवणूक करण्यास मदत होईल. आर्थिक ध्येय ठरवल्यामुळे तुम्हाला Asset class ची निवड करायला मदत होईल.
4.आपत्कालीन निधी तयार करा | Create an Emergency Fund
दीर्घकालीन नियोजनाचा एक भाग म्हणजे अडथळे येतील ही कल्पना स्वीकारणे. तुम्ही अडथळे रोखण्यास तयार नसल्यास हे अडथळे तुम्हाला बचत(saving )करण्यापासून थांबवू शकतात. तुम्ही रस्त्यावरील सर्व अडथळे टाळू शकत नाही पण Emergency Fund बनवून ते होऊ शकणारे नुकसान कमी करण्यासाठी तुम्ही आगाऊ तयारी करू शकता . Emergency Fund तुम्हाला क्रेडिट कार्डचे कर्ज वाढवण्यापासून किंवा तुमचा retirement fund मध्ये गुंतवणूक थांबू न देण्यासाठी देखील मदत करेल. तर आजच तुमच्या सहा महिन्याचा खर्च जमा करण्यासाठी Emergency Fund मध्ये थोडी थोडी बचत साठवायला सुरुवात करा .
5.रिटायरमेंट साठी जास्त पैसे वाचवा | Save more Money for Retirement
जसजसे वेळ जाईल तसतसे तुमचे उत्पन्न वाढते. तुम्हाला पगार वाढ मिळेल, लग्न करून दोन उत्पन्नाचे मार्ग होतील. प्रत्येक वेळी तुमचा पगार वाढला की तुम्ही अधिक पैसे वाचवण्यासाठी प्रयत्न करून जास्तीत जास्त बचत वाढवावी. शक्य तितक्या लवकर आपले ध्येय गाठण्याची गुरुकिल्ली म्हणजे आपण जितकी बचत करू शकतो तितकी बचत करणे.
तुमचे निश्चित उत्पन्न आणि खर्च यांचा समतोल साधून, तुम्ही तुमच्या सेवानिवृत्तीच्या वर्षांमध्ये तुम्हाला ज्या आनंददायी गोष्टी करायच्या आहेत त्या निधीसाठी तुम्ही तुमचा गुंतवणूक करून रिटायरमेंट साठी पोर्टफोलिओ तयार करा बाजाराच्या कामगिरी नुसार तुमचे ध्येय साध्य होईल.
6.तुमचा खर्च कमी करा | Reduce your Expenses
तुमची बचत जास्तीत जास्त करण्यासाठी तुम्हाला तुमचा खर्च कमी करणे आवश्यक आहे.तुम्हाला परवडेल असे घर खरेदी करणे आणि तुमच्या कमाई पेक्षा कमी जीवनशैलीत जगणे आणि तुम्हाला तुमच्या बचतीला चालना द्यायची असल्यास तुमच्या इच्छा वर खर्च नाही करणे आणि तुमच्या गरजा कमी करणे.
7.तुमच्या पोर्टफोलिओचे आढावा घ्या | Review your portfolio
दररोज मार्केट पाहणे गरजेचे नाही पण महिन्यातून एकदा पोर्टफोलिओ पाहिला पाहिजे व वर्षातून एकदा यांचा आढावा घेऊन Asset allocation व्यवस्थित काम करते का ते पाहणे आणि गरज असेल तेथे बदल करणे गरजेचे आहे.
8.कर बचत गुंतवणूक करा | Invest in tax saving
कर वाचवण्यासाठी प्रत्येक बचत संधीचा फायदा घ्या. कर बचत योजनांमध्ये जास्तीत जास्त योगदान देऊन गुंतवणूक करा. कर वाचवण्याची एकही संधी सोडू नका.
9.दीर्घ कालावधीसाठी लक्ष केंद्रित करा | Focus for long periods of time
गुंतवणूक करून लगेच श्रीमंत होऊ शकत नाही compound व्हायला वेळ लागतो. त्यामुळे लवकर गुंतवणूक करण्यास सुरुवात करा आणि हे माहीत असू द्या की श्रीमंतीचा मार्ग दीर्घ कालावधी मध्ये गुंतवणूक करून मिळणार आहे व त्याची चाल मंद आहे हे लक्षात ठेवून तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक करण्यास सुरुवात कराल तितकी तुमची उद्दिष्टे साध्य करण्याच्या शक्यता अधिक असतील.
Retirement Planning हे खूप दूरचे ध्येय आहे असे तुम्हाला वाटेल आणि आत्ताच ते करण्याची काय गरज आहे पण जर तुम्हाला स्वाभिमानाने व आर्थिक चिंता विना जर तुमचे रिटायरमेंट घालवायची असेल तर त्यासाठी नियोजन आणि शिस्तीने गुंतवणूक करून सेवानिवृत्तीचे ध्येय तुम्ही गाठू शकता आणि रिटायरमेंट नंतर आरामदायी जीवन जगू शकता त्यासाठी आजच नियोजन करून त्यासाठी आवश्यक असणाऱ्या फंड साठी नियोजन करा. आणि बचत करून गुंतवणूक करण्यास सुरुवात करा…..
Dipali patil
August 25, 2023 @ 4:55 pm
Nice information about retirement.
Priyanka
August 29, 2023 @ 10:56 am
खूप छान माहिती आहे
Rajaram Chawde
September 3, 2023 @ 7:28 am
Nice information
Shivanjali
September 5, 2023 @ 4:33 pm
छान माहिती आहे
Anjali
September 10, 2023 @ 3:13 am
अगदी सरळ सोप्या भाषेत खूप छान माहिती आहे.
Swaraj
September 23, 2023 @ 5:02 pm
Knowledgeable information about Retirement Planning
Archana patil
October 6, 2023 @ 5:58 am
Very helpful information
Jaya
October 11, 2023 @ 1:30 am
Nice information about retirement.
Jayashree thorat
October 12, 2023 @ 3:51 am
Knowledgeable information about Retirement Planning