आर्थिक नियोजन यशस्वी होण्यासाठी 9 पायऱ्या | 9 Steps to Successful Financial Planning
आपली आर्थिक ध्येय पूर्ण करण्यासाठी नियोजन करणे खूप गरजेचे आहे व त्याची अंमलबजावणी ही केली पाहिजे कारण की जेव्हा अर्धे तारुण्य संपते त्यावेळी आपल्याला समस्याला तोंड द्यावे लागते व नंतर तहान लागल्यावर विहीर खणायची गरज लागते म्हणून हे होऊ नये यासाठी तुम्ही ज्या दिवशी स्वतंत्र कमवायला सुरुवात कराल त्याच दिवशी आर्थिक नियोजन(Financial planning)करण्यास सुरुवात करून बचत केली पाहिजे. पण आर्थिक नियोजन म्हणजे फक्त बचत (Saving) नाही कारण बचत केल्याने बचत केलेल्या पैशाची किंमत काही कालावधी नंतर कमी होते त्यामुळे फक्त बचत न करता आर्थिक ध्येय ठरवून त्या बचतीचे गुंतवणुकीमध्ये रूपांतर करून संपत्ती निर्मिती wealth creation करता आले पाहिजे त्यासाठी आर्थिक ध्येय ठरवून त्याचा आराखडा तयार करा व तो समजून आर्थिक नियोजन करा.
Financial planning म्हणजे आपल्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीचा आणि अल्प कालावधीतील व दीर्घ कालावधीतील आर्थिक उद्दिष्टांची सविस्तर माहिती होय त्यामध्ये आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्याचा पण समावेश आहे. आर्थिक नियोजन हे वर्तमान आणि भविष्यासाठी आवश्यक आहे यामध्ये तुमच्या आर्थिक सद्यस्थितीचा तुमची आर्थिक उद्दिष्टे आणि ती साध्य करण्यास मदत करण्याच्या पद्धतीचा समावेश होतो.
Financial planning तयार करण्यासाठी कधीही लवकर किंवा उशीर होत नाही आणि तुमच्याकडे कितीही पैसे असले तरीही आर्थिक नियोजन तुम्हाला करणे गरजेचे आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व टप्प्यावर तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करू शकता.
Financial planning उत्पन्न, खर्च, कर्ज, बचत, भविष्यातील आर्थिक ध्येय पूर्ण करण्यासाठी गरजेचे आहे आणि आर्थिक नियोजनामुळे वर्षभरातील कामगिरीचा आपण केलेल्या प्रगतीचा मागोवा घेण्यास Financial planning आपणास मदत करते तसेच खर्च व कर्ज कमी करणे या मूलभूत गरजां साठी Financial planning आपणास मदत करते आर्थिक नियोजना मध्ये एखाद्या व्यक्तीचे वैयक्तिक आणि कौटुंबिक आर्थिक गरजा गुंतवणुकीची जोखीम सहनशीलता बचत आणि गुंतवणुकीची (investment)योजना यामध्ये दिसते.
तुम्हाला तुमची निव्वळ संपत्ती म्हणजेच Net worth समजण्यासाठी तुमच्या एकूण मालमत्तेतून जबाबदाऱ्याची एकूण रक्कम वजा केली तर तुम्हाला तुमची Net worth मिळेल.
मालमत्ता | Property
मालमत्ता मध्ये घर, गाडी, बँकेमधील रोख रक्कम, गुंतवणूक केलेले पैसे आणि इतर गुंतवणूक खाते हे आहेत.
जबाबदारी | Responsibility
जबाबदारी म्हणजे तुमची देणी होय. जबाबदारी मध्ये थकीत बिले, तारण ठेवलेली संपत्ती Home loan, Car loan व इतर कर्जांचा समावेश आहे.
2.पैसे कुठे खर्च होतात ते पहा | See Where the Money is Spent
Financial planning करताना तुम्हाला तुमचे उत्पन्न तसेच तुमचे पैसे कसे खर्च होतात आणि केव्हा खर्च झाले हे माहीत असणे आवश्यक आहे.
पैसे कुठे खर्च होतात हे जर तुम्ही लिहून ठेवले तर तुम्हाला दर महिन्याला आपल्या गरजांसाठी किती पैसे खर्च होत आहेत आणि बचत आणि गुंतवणुकीसाठी किती पैसे आपल्याकडे शिल्लक आहेत आणि आपला अनावश्यक किती खर्च होतोय हे पाहून तुम्ही खर्चामध्ये कुठे कपात करू शकता का हे ठरवू शकता.
उदाहरणार्थ : घर भाडे किंवा घराचा हप्ता, कर्जाचे हप्ते, कपडे, घरखर्च, विमा, गुंतवणूक, दवाखान्यातील खर्च व इतर खर्च इत्यादी गरजेचे खर्च आणि इतर खर्च म्हणजेच मनोरंजन,बाहेर जेवण्या साठी जाणे,प्रवास करणे, सुट्टी मधील खर्च इत्यादी खर्चाच्या नोंदी ठेवून आपण कुठे खर्च कपात करू शकतो का ? हे ठरवण्यास मदत होईल आणि या खर्चाच्या नोंदी ठेवून आपल्याला मासिक खर्च किती होतोय हे समजेल आणि त्यावरून कुठे कपात करू शकतो का ? कुठे सुधारणा करू शकतो का ? कोणत्या गरज (Need) असणाऱ्या वस्तू वरती किती खर्च होतोय आणि इच्छा (want) वरती किती खर्च होतोय हे सगळे पाहून खर्चाचा आढावा घेऊन खर्च कमी करण्यास मदत होईल.
3.आर्थिक ध्येय ठरवा | Set a Financial Goal
आर्थिक नियोजनामुळे तुम्हाला परिपूर्ण पैशाचा वापर करण्यासाठी आणि भविष्यातील आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मदत होईल जर आपणास बचत करायची असेल किंवा गुंतवणूक करायची असेल,खर्च कमी करायचा असेल तर तसे उद्दिष्टे समोर पकडून त्याला स्पष्ट शब्दांमध्ये लिहिणे गरजेचे आहे. म्हणजेच रिटायरमेंट प्लॅनिंग,घर घ्यायचे आहे, गाडी घ्यायची आहे, मुलांच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी पैसे जमा करायचे आहेत, एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे, मुलीच्या लग्नासाठी पैसे जमा करायचे आहेत इत्यादी सारखे ध्येय निश्चित करणे गरजेचे आहे आणि ध्येय तुमच्यासाठी किती गरजेचे आहे त्यानुसार त्याचा क्रम निश्चित करून त्या ध्येयासाठी किती पैसे लागतात त्यासाठी किती पैसे Saving करून गुंतवणूक करावी लागेल हे ठरवा आणि त्यानुसार Investment करा.
4.आपत्कालीन निधी तयार करा | Create an Emergency Fund
आर्थिक अडचणीमध्ये मदत होण्यासाठी कमीत कमी 6 महिनेचा मासिक खर्च Liquid fund मध्ये ठेवावा म्हणजे भविष्यात येणाऱ्या आर्थिक अडचणीसाठी गरजेला पडेल व आर्थिक अडचणीच्या काळात चिंता करावी लागणार नाही त्यासाठी आजच किती फंड जमा करायचा आहे हे ठरवून त्यासाठी थोडे थोडे पैसे बाजूला काढून Liquid fund मध्ये टाकायला सुरुवात करा.
5.कर्ज कमी करण्यासाठी योजना तयार करा | Create a Plan to Reduce Debt
तुमच्याकडे कर्ज असल्यास तुम्ही कर्ज जितक्या लवकर आणि प्रभावीपणे कमी कराल किंवा त्याची परतफेड कराल तितक्या लवकर तुमची बचत वाढण्यासाठी, तुमच्या राहणीमानाचा दर्जा आणि आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी तुम्हाला मदत होईल जेव्हा शक्य असेल तेव्हा खर्च कमी करण्याची सवय लावा जेणेकरून तुम्ही तुमची बचत (saving) वाढवू शकता आणि तुमच्या जबाबदाऱ्या वेळेवर पूर्ण करू शकता.
6.विमा पॉलिसी घ्या | Take an Insurance Policy
आर्थिक सुरक्षेतेसाठी योग्य विमा घेणे गरजेचे आहे म्हणजेच अपघात विमा,आरोग्य विमा, जीवन विमा घेऊन आर्थिक सुरक्षितता मिळवू शकता. म्हणजेच तुम्ही Home insurance, Car insurance, Medical insurance ,Accident insurance, Life insurance हे सर्व प्रकारचे विमा घेऊन संभाव्य जोखीमीचे व्यवस्थापन करू शकता.
7.गुंतवणुकीसाठी नियोजन करा | Plan for Investment
गुंतवणूक करताना गुंतवणुकीतील जोखीम,तुमची सहनशीलता आणि भविष्यात उत्पन्नाच्या गरजा लक्षात घेऊन गुंतवणूक करा. त्यासाठी आपल्या गरजेनुसार Fixed income Asset आणि Veriable income Asset यांची माहिती घेऊन गुंतवणूकीचे व्यवस्थित नियोजन करा.
8.कर धोरण ठरवा | Determine Tax Policy
गुंतवणूक करताना कायदेशीररित्या उपलब्ध असणाऱ्या गुंतवणुकीमध्ये गुंतवणूक करून तुम्ही कुठे(Tax) कर वाचू शकता का हे पाहून त्या ठिकाणी गुंतवणूक करून कर बचत करा.
9.मृत्युपत्र तयार करा | Prepare a will
वारसांच्या फायद्यासाठी आणि संरक्षणासाठी व्यवस्था करणे महत्त्वाचे आहे.मृत्यूनंतर आपल्या मालमत्तेचे विभाजन,वारसा हक्क, अल्पवयीन मुलांचे पालकत्व व संगोपन आणि त्यांच्या भविष्यातील तरतुदी इत्यादी गोष्टी संदर्भात तरतूद मृत्युपत्रात करणे गरजेचे आहे. मृत्युपत्रातील माहिती ही तुमच्या आयुष्यातील टप्प्यावर आणि तुम्ही विवाहित आहात मुले आहेत किंवा इतर ध्येय आहेत यावर अवलंबून आहे.
आर्थिक नियोजन कधी करावे | When to do Financial Planning
आर्थिक नियोजन कधी करावे हे तसे ठरवलेलं नाही पण आर्थिक नियोजन हे शक्य तितक्या लवकर करावे म्हणजेच आर्थिक नियोजनाची सुरुवात सामान्यपणे ज्या दिवशी तुम्ही स्वतंत्रपणे कमवायला सुरुवात कराल त्या दिवशी पासून सुरुवात करावी.
आर्थिक नियोजन करण्याचे फायदे | Benefits of Financial Planning
- आर्थिक नियोजनामुळे तुमचे उत्पन्न आणि खर्च किती आहेत याची सविस्तर माहिती गोळा होते.
- आर्थिक नियोजनामुळे तुमच्या आर्थिक परिस्थितीची सतत माहिती मिळवू शकता.
- आर्थिक नियोजनामुळे अल्प कालावधीतील आणि दीर्घ कालावधीतील आर्थिक उद्दिष्टे ठरविण्यास मदत होते.
- आर्थिक नियोजनामुळे तुम्ही कर्ज कमी करण्यावर भर देता आणि अडचणीच्या काळात कामी येण्यासाठी Emergency Fund तयार करून त्यामध्ये बचत साठवता.
- आर्थिक नियोजनामुळे एका ठराविक कालावधीनंतर आतापर्यंत केलेल्या प्रयत्नांतून तुम्हाला खूप सारी माहिती मिळते आणि त्याद्वारे पुढील आर्थिक ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मदत होते आणि तुम्ही आर्थिक अडचणी पासून दूर राहता त्यामुळे भूतकाळात तुम्हाला जाणवलेल्या ताण आणि चिंता कमी होण्यास मदत होते.
Financial planning चे निरीक्षण वर्षातून एकदा तुम्ही स्वतः किंवा एखाद्या आर्थिक सल्लागाराकडून चर्चा करून आणि परिस्थितीच्या बदलानुसार तुमच्या आर्थिक योजनेवर काय परिणाम होतो का ते पहा व ते पूर्ण करण्यासाठी काय करू शकतो याची योजना तयार करा व भविष्यातील आर्थिक ध्येय आर्थिक नियोजन करून सहज पूर्ण करा…..
Dipali patil
August 25, 2023 @ 5:00 pm
आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक नियोजन किती महत्वाचे आहे हे या लेखामधून समजले .धन्यवाद
Priyanka
August 29, 2023 @ 10:57 am
खूप छान माहिती आहे
Rajaram Chawde
September 3, 2023 @ 7:29 am
Knowledgeable information about financial planning
Shivanjali
September 5, 2023 @ 4:48 pm
Financial planning विषयी खूप छान माहिती आहे
Anjali
September 10, 2023 @ 3:13 am
अगदी सरळ सोप्या भाषेत खूप छान माहिती आहे.
Archana patil
October 6, 2023 @ 6:03 am
Knowledgeable information about financial planning
Jaya
October 11, 2023 @ 1:29 am
Knowledgeable information about financial planning
Jayashree thorat
October 12, 2023 @ 3:52 am
Financial planning विषयी खूप छान माहिती आहे.