आर्थिक साक्षरतेच्या दिशेने पहिले पाऊल | First Steps toward Financial Literacy
आज आपण एका अतिशय महत्वाचा आणि दैनंदिन जीवनशैलीमध्ये उपयुक्त ठरणारा “आर्थिक साक्षरता” म्हणजेच Financial Literacy हा विषय व त्याचे होणारे फायदे सखोल समजून घेऊ.
आपल्या भारत देशाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेती औद्योगिक उद्योग धंद्यावर विसंबून आहे. शेतीमधून मिळणारे उत्पन्न हे सुद्धा पूर्णतः निसर्गाच्या मर्जीवर अवलंबून आहे. त्याचबरोबर औद्योगिक उद्योग धंद्यामध्ये वाढलेली स्पर्धा, केले जाणारे नवनवीन प्रयोग ,ऑटोमेशन ची वाढती मागणी,बेरोजगारी,कमी उत्पन्न,जीव घेणारी महागाई इ.सर्व समस्यांना तोंड देता देता आर्थिक साक्षर नसलेला माणूस कर्जाच्या खाईत लोटला जातो. पण आर्थिक साक्षरता असलेला माणूस हिमालयासारखा न डगमगता धैर्याने तोंड देतो .तर चला आपण आर्थिक साक्षर होऊ आणि येणाऱ्या आर्थिक संकटांना धैर्याने सामोरे जाऊ …..
1.आर्थिक साक्षरता म्हणजे काय ? |What is Financial Literacy ?
आर्थिक साक्षरता म्हणजे वैयक्तिक आर्थिक व्यवस्थापन,बजेट आणि बचत या बरोबर आर्थिक कौशल्य समजून लागु करण्याची क्षमता होय. आर्थिक साक्षरता व्यक्तींना स्वावलंबी बनवते. ज्यामुळे आर्थिक स्थिरता मिळते.
मासिक खर्चाचे अंदाजपत्रक तयार करणे,बचत करणे (saving), कर्जाबद्दलची माहिती घेणे, पैसे गुंतवणुकीसाठी असणाऱ्या विविध मार्गाची माहिती घेणे आणि विविध प्रकारांमध्ये पैशाची गुंतवणूक करुन आपल्या आर्थिक भविष्याला सुरक्षित व सुखी बनवणे.
2.आर्थिक साक्षरतेची गरज का आहे ? | Why Financial Literacy is Needed ?
आर्थिक साक्षरते मुळे आपल्याला भविष्यातील आर्थिक निर्णय घेण्यासाठी माहिती मिळते. या माहितीचा योग्य प्रकारे उपयोग करून कमाई, खर्च, बचत, गुंतवणूक,विमा,कर्ज नियोजन हे निर्णय नियोजनपूर्वक घेऊन आपणास आर्थिक सुरक्षितता व स्थिरता मिळते. आपल्याला वस्तू व सेवा विकत घेण्या साठी पैशाची गरज लागते व पैसे कमवण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधले जातात. आपण कष्ट करून पैसे कमवतो पण पैसे कोठे खर्च होतात हे समजत नाही.
जर मुलांना आई-वडिलांच्या कडून महिनाभराच्या खर्चासाठी दिलेले पैसे दोन-तीन दिवसांमध्येच संपून जातात. मुलांना पैसे कोठे खर्च करायचे हे मुलांना कोण समजावून सांगत नाही. आई-वडिलांनी पैशासाठी किती कठोर परिश्रम केले आहेत. पैसे कमवण्या साठी आठ दहा तास काम करावे लागते किती कष्ट करावे लागते. कोणतेही गोष्टीचे महत्त्व समजण्यासाठी धक्के खावे लागतात त्याशिवाय मेंदूला जाग येत नाही.
पैशाने आपण काय काय करू शकतो पैसे कशासाठी कुठे खर्च करायला पाहिजे सर्व माहिती मुलांना लहानपणा पासून Need आणि want म्हणजेच गरजेच्या वस्तू आणि आवडीच्या वस्तू यातील फरक समजावून सांगितला पाहिजे म्हणजे ते त्यांच्या आयुष्यातील निर्णय योग्य प्रकारे घेतील व त्यांना लहानपणापासून कमाईचे प्रकार, खर्च, बचत,गुंतवणूक,कर्ज,विमा हे सर्वांची माहिती समजेल .
पैसे कोठे खर्च करायचे,पैसे कसे खर्च करायचे,पैसे का खर्च करायचे याचा प्रश्न मनात निर्माण होत नाही. कारण लोक पैसे कमवतात व पैशाची योग्य नियोजन न करता वस्तू घ्यावी असे मनात आले की कर्जावर (EMI) लगेच विकत घेतात .
कोणतीही वस्तू विकत घेण्याअगोदर ती वस्तू खरंच घेणे मला गरजेचे आहे का ? गरजेचे नसेल तर घेऊ नका आणि गरजेचे असेल तर त्याचा आराखडा (plan) तयार करून ती वस्तू घेण्यासाठी मला किती पैसे लागतील त्यासाठी मी महिन्यात किती पैसे बचत करू शकतो त्या बचतीतून किती कालावधी मध्ये मी ती वस्तू घेऊ शकतो याचे नियोजन न करता मनात आले की ही वस्तू विकत घ्यायची आहे लगेच जवळ असणारे पैसे डाऊन पेमेंट करून ती वस्तू कर्जावर घेणे आणि कर्जाचे हप्ते भरत राहणे.
या विविध कर्जामध्ये म्हणजे Home Loan, Personal Loan, Car Loan, Credit Card या सर्वांच्या कर्जाच्या EMI मध्ये म्हणजेच Rat race मध्ये अडकून जातात व आयुष्य जगण्याची मजाच हरवून बसतात. EMI भरण्या साठी रात्रंदिवस काम (over time, part time work) करतात जे घर त्यांनी राहण्यासाठी घेतलेले असते त्या घरात कमी व ऑफिसात जास्त वेळ जातो. हे सर्व होऊ नये यासाठी आर्थिक साक्षरता (Financial Literacy) घेऊन नियोजन करून भविष्यातील आर्थिक गरजा पूर्ण करणे गरजेचे आहे.
3.आर्थिक साक्षरता नसेल तर त्याचे तोटे काय आहेत? | If there is no Financial Literacy what are its disadvantage ?
आर्थिक साक्षर नसलेल्या लोकांना छोटे-मोठे आर्थिक निर्णय घेणे अवघड वाटते. तसेच ते काम करतात पैसे कमवतात पण त्यांच्यामध्ये आर्थिक निर्णय घेण्याची क्षमता नसते. त्यामुळे येणाऱ्या पैशाचे योग्य नियोजन करू शकत नाहीत. त्यामुळे उत्पन्नापेक्षा अधिक खर्च,खर्चाचे नियोजन नसते त्यामुळे गरजेच्या वस्तू व आवडीच्या वस्तू यातील फरक कळत नाही.
नियमित बचत, गुंतवणुकीचे मार्ग, चांगले कर्ज ,वाईट कर्ज हे त्यांना समजत नाही. त्यामुळे ते आयुष्यातील उद्दिष्टांची प्राप्ती करण्यासाठी नियोजन करू शकत नाहीत. त्यामुळे आयुष्या तील उद्दिष्टे साध्य करू शकत नाही. आर्थिक चिंता आणि जीवनामध्ये तणाव निर्माण होतो . जीवन शैलीमध्ये बदल घडत नाही व अशा लोकांची आर्थिक फसवणूक होते हे सर्व आर्थिक साक्षर नसण्याचे तोटे आहेत.
4.आर्थिक साक्षरतेमुळे तुमच्यामध्ये काय बदल होतो | How Financial Literacy Changes You
आर्थिक साक्षरता मुळे मासिक खर्चाचे अंदाजपत्रक नियोजनपूर्वक तयार केले जाते. मासिक खर्चामध्ये गरज (need) व इच्छा (want)या माध्यमातून खर्च, बचत केली जाते. चांगले कर्ज (Good debt),वाईट कर्ज (Bad debt)हे समजून याची माहिती घेऊन कर्ज घेतले जाते. म्हणजेच Asset निर्मितीसाठी जे कर्ज घेतले जाते त्यास चांगले कर्ज असे म्हणतात व लायबिलिटी(Liabilities) साठी जे कर्ज घेतले त्याला वाईट कर्ज असे म्हणतात.
आर्थिक साक्षरता (financial literacy) मुळे तुम्हाला पैसे हाताळण्याची क्षमता वाढते व ती क्षमता निवृत्ती (retirement planning),मुलांचे शिक्षण,मुलीचे लग्न,ट्रीप,घर घेण्यासाठी,स्वतःचे करियर करण्यासाठी,विमा घेण्यासाठी, गाडी घेण्यासाठी व अशाच प्रकारचे उद्दिष्ट साध्य करण्यास मदत होते. तुम्ही financial literacy मुळे विमा, कर्जाचे नियोजन, गुंतवणुकीचे नियोजन त्यामधील Risk reward माहिती घेऊन नियोजन केले जाते आवश्यक असेल त्या ठिकाणी खर्च केले जातात व अनावश्यक खर्च टाळले जातात. हे करत असताना गुंतवणुकीच्या नवीन नवीन संधी समजून घेऊन तुम्ही तुमचे उद्दिष्ट नियोजनपूर्वक साध्य करता. वरील सर्व बदल तुम्ही आर्थिक साक्षर(financial literate) झाल्या मुळे होतात.
5.आर्थिक साक्षर कसे होणार ? | How to Become Financially Literate ?
आर्थिक साक्षर होण्यासाठी कमाई, बचत, खर्च, गुंतवणूक, परतावा, महागाई,आणि गुंतवणुकीवरील रिस्क रिवार्ड व सुरक्षितता,कर्ज व्यवस्थापन, विमा याची माहिती घेणे.
कमाई करण्याचे 3 Types of income म्हणजेच Active income, passive income, portfolio income यांचे योग्य नियोजन करणे व कमाई करण्याचे मार्ग वाढवणे व मिळालेल्या कमाईतून नियमित बचत (saving) करणे. बचतीचे रूपांतर वेगवेगळ्या Asset class मध्ये गुंतवणूक करणे. अल्प कालावधी (short term) साठी गुंतवणूक करणार असेल तर possible asset class मध्ये गुंतवणूक करणे. दीर्घकालीन (Long term)गुंतवणूक करताना महागाई (inflation ) पेक्षा जास्त परतावा देणाऱ्या asset class ची माहिती घेऊन त्यामध्ये गुंतवणूक करणे.asset class चे फायदे तोटे यांचा अभ्यास करून व liabilities कमी करूण व garbage (अनावश्यक वस्तू )पूर्णपणे टाळणे. asset निर्मितीसाठी कर्ज घेणे liabilities साठी न घेणे.
भविष्य काळात येणाऱ्या अडचणी पासून संरक्षण मिळवण्या साठी विमा (insurance ) योजना घेणे. वरील माहिती घेऊन आपण (financial literate) होऊ शकतो व आपली ध्येय नियोजनपूर्वक पूर्ण करू शकतो हि आर्थिक साक्षरतेची पायरी आहे.
6.आर्थिक साक्षरतेचे फायदे | Benefits of Financial Literacy
1) आर्थिक साक्षरता मुळे अचानक येणाऱ्या खर्चासाठी आपतत्कालीन निधी म्हणजेच emergency fund तयार केला जातो.
2)भविष्यकाळात येणाऱ्या आजारांसाठी medical insurance घेतला जातो.अपघातामुळे आर्थिक मदतीसाठी अपघात विमा (accident insurance)घेतला जातो.घरातील कर्ता व्यक्ती निधन पावल्यामुळे त्याच्यानंतर परिवार उघड्यावर पडू नये म्हणून जीवन विमा ( life insurance ) घेतला जातो. आर्थिक साक्षर असल्यामुळे येणाऱ्या संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व insurance घेतले जातात.
3)आर्थिक साक्षरता मुळे कर्ज काढताना ते कर्ज Asset निर्मितीसाठी आहे का Liabilities घेण्यासाठी याचा विचार करून कर्ज ( loan ) काढले जाते व कर्जाचे व्यवस्थित व्यवस्थापन केले जाते.
4)आर्थिक साक्षर मुळे आर्थिक पाया मजबूत होतो. नियमित बचत आणि गुंतवणूक याची माहिती घेतली जाते.आयुष्यातील उद्दिष्टांची प्राप्ती करण्यासाठी नियोजन करून आयुष्यातील उद्दिष्टे साध्य केले जातात. तुम्ही दीर्घकालावधी साठी गुंतवणूक करणार असाल तर महागाई पेक्षा जास्त परतावा देणाऱ्या Possible income asset class म्हणजेच Real estate, Stock market, Mutual funds, Business यामध्ये गुंतवणूक करता व अल्प कालावधीतील (एका वर्षाच्या आतील गरजांसाठी)Sure income (Fixed income asset class ) Fixed Deposit ,Recurring Deposit, Bond, Debt मध्ये गुंतवणूक करता आणि हे करत असताना महागाई दर (Inflation rate)याचा पण विचार केला जातात. आर्थिक साक्षरतेमुळे जीवनशैलीमध्ये महत्त्वपूर्ण बदल घडतात.तसेच आर्थिक साक्षरता व्यक्तींना आर्थिक फसवणूकी पासून बचाव करते आणि आर्थिक कल्याण संरक्षित करते.
5)Financial Literacy प्रशिक्षण असलेले लोक चांगले आर्थिक निर्णय घेतात आणि अशा प्रकारचे प्रशिक्षण नसलेल्या लोकांपेक्षा पैशाचे अधिक चांगले व्यवस्थापन करतात.
Financial Literacy हा एक दोन दिवसाचा प्रवास नसून तो आयुष्यभराचा प्रवास आहे कारण आपल्या गरजेनुसार व मार्केटमधील बदलानुसार आपल्याला वेगवेगळ्या asset classमध्ये पैसे ठेवावे व काढावे लागतात.यासाठी आपल्याला fixed income asset class व possible income asset class या दोन असेट क्लासची माहिती असणे गरजेचे आहे. गुंतवणूक करत असताना कमीत कमी रकमेतून सुरुवात,महागाई पेक्षा जास्त परतावा ,सुरक्षितता, लिक्विडिटी , डायव्हर्सिफिकेश हे पाहणे आवश्यक आहे.
वरील सर्वांची माहिती आपण पुढील भागात पाहणार आहोतच.
Kartik
July 26, 2023 @ 4:16 am
खूप मस्त 💯
Sudhir Jadhav
July 26, 2023 @ 12:46 pm
thanks
Kalyan
July 28, 2023 @ 5:32 pm
Thanks 🙏
Sudhir Jadhav
July 29, 2023 @ 5:09 am
Thanks
Dipali patil
August 21, 2023 @ 9:34 am
अगदी सरळ सोप्या भाषेत खूप छान माहिती आहे.
Atish more
August 28, 2023 @ 3:38 pm
Nice information
Priyanka
August 29, 2023 @ 10:48 am
Knowledgebal information about financial literacy
Rajaram Chawde
September 3, 2023 @ 7:58 am
अगदी सरळ सोप्या भाषेत खूप छान माहिती आहे.
Shivanjali
September 5, 2023 @ 5:42 pm
अगदी सरळ सोप्या भाषेत खूप छान माहिती मिळाली
Anjali
September 10, 2023 @ 2:45 am
अगदी सरळ सोप्या भाषेत खूप छान माहिती आहे.
Swaraj
September 23, 2023 @ 6:54 am
खूप मस्त छान माहिती आहे
Hemant Subhash Thorat
October 1, 2023 @ 10:47 am
खूप छान आणि सोप्या पद्धतीने माहिती आहे
Jaya
October 11, 2023 @ 1:03 am
Knowledgebal information about financial literacy
Jayashree thorat
October 12, 2023 @ 3:59 am
Knowledgebal information about financial literacy