उत्पन्नाचे 3 प्रकार | 3 Types of Income Active, Passive & Portfolio
आपली आर्थिक उद्दिष्टे मिळवण्यासाठी उत्पन्नाचे विविध प्रकार(types of income )समजून घेणे आवश्यक आहे. कारण आर्थिक दृष्ट्या सुरक्षित भविष्यासाठी नियोजन करण्यास उत्पन्नाचे विविध प्रकार तुम्हाला मदत करतील आणि दीर्घकालीन गुंतवणुकीतून (long term investment) पैसे मिळवण्याचे पर्याय मिळतील व तुमचे Goal साध्य होतील. भरपूर लोक पगार आणि व्यवसाय याद्वारे पैसे कमवतात. पैसे कमवण्याच्या विविध पद्धती शिकणे गरजेचे आहे एका उत्पन्नावर अवलंबून राहू नये . तर चला आपण types of income समजून घेऊया…..
1.सक्रिय उत्पन्न | Active Income
2.निष्क्रिय उत्पन्न | Passive Income
3.पोर्टफोलिओ उत्पन्न | Portfolio Income
1.सक्रिय उत्पन्न | Active Income
active income म्हणजे नोकरी किंवा व्यवसायातून मिळालेले उत्पन्न होय. ज्यामध्ये तुम्ही सक्रियपणे भाग घेता. सक्रिय उत्पन्नाच्या उदाहरणांमध्ये पगार,कमिशन आणि स्वयंरोजगारातून निव्वळ कमाई यांचा समावेश होतो. active income हे कोणत्याही व्यक्तीसाठी कमाईचे महत्त्वपूर्ण स्त्रोत म्हणून काम करते.
active income म्हणजे नोकरी, स्वतःचा व्यवसाय हे आहेत. active income चा हेतू हा एका विशिष्ट कालावधीत स्थिर उत्पन्न निर्माण करणे हा आहे. या उत्पन्नामध्ये काम करणाऱ्यास पगार दिला जातो आणि व्यवसायातील मालकास व्यवसायातील नफा दिला जातो.
active income मध्ये तुम्ही काम करत असाल तर income चालू आणि काम बंद झाले तर income बंद आणि व्यवसायामध्ये दुकान चालू असेल तर इन्कम चालू असे असते. एका उत्पन्नावर अवलंबून राहू नये कारण active income करून कमवलेल्या पैशातून आपण फक्त मूलभूत गरजा पूर्ण करू शकतो. इच्छा पूर्ण करू शकत नाही व प्रगती पण करू शकत नाही कारण गुंतवणुकीसाठी पुरेसा पैसा मिळत नाही.
उच्च पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी देखील active income धोकादायक आहे जर अर्थव्यवस्थेला धोका निर्माण झाला तर तुमची नोकरी एका क्षणात तुम्ही गमावू शकता. दुर्दैवाने कोविड मध्ये लाखो लोकांनी नोकरी गमावली आहे एका उत्पन्नाच्या स्त्रोतवर अवलंबून राहिल्यामुळे investment किंवा saving केली होती ती पूर्णपणे गमावू शकता. म्हणून एका उत्पन्नावर अवलंबून राहू नये.
Active Incomes
-
नोकरी Job: नोकरी करून पगार मिळवणे.
-
सेवा Service : सेवा देऊन कमिशन मिळवणे.
-
व्यवसाय Business: स्वतःच्या व्यवसायातून फायदा मिळवणे.
-
ट्रेडिंग day Trading : डे ट्रेडिंग किंवा अल्प मुदतीची गुंतवणूक (swing trading)करून फायदा मिळवणे.
2.निष्क्रिय उत्पन्न | Passive Income
तुम्ही काम एकदाच केले पण कमाई life time चालू आहे किंवा जर तुमच्यासाठी लोक किंवा पैसे काम करत असतील तर त्यास passive income असे म्हणतात.
Passive Income उत्पन्नाचे स्त्रोत खालीलप्रमाणे
-
YouTube: एकदा YouTube वरती व्हिडिओ बनवून अपलोड केल्यानंतर जेवढे लोक व्हिडिओ पाहतील त्यापासून तुम्हाला इन्कम चालू राहील. व्हिडिओ हा एकदाच बनवणार आहात पण इन्कम हा लाईफ टाईम असणार आहे म्हणजे जेव्हा लोक व्हिडिओ बघतील तेव्हा तुम्हाला त्याचे पैसे मिळतील.
-
पैसे money: पैसे अशा ठिकाणी गुंतवणूक करणे की त्या पैशाची किंमत पण वाढेल व त्यापासून आपल्याला regular income चालू राहील.
-
कंत्राटदार (Contractor): पगारावरती लोकांना कामाला लावणे स्वतः कामाचे नियोजन करून काम पूर्ण करणे त्यापासून regular income मिळवणे.
-
व्याज ( Interest): कमाईतून saving करणे व बचतीचे रूपांतर गुंतवणुकीमध्ये करून त्यापासून निश्चित उत्पन्न मिळवणे. Certificate deposit, Government bond, treasury bills आणि saving accounts, corporate bond त्यापासून व्याज मिळवणे.
-
भाडे(Rental income): फ्लॅट, दुकान गाळे,जागा भाडेतत्त्वावर देणे. त्यापासून regular income मिळवणे.
-
शेअर वरील लाभांश(dividend of share): लाभांश देणाऱ्या शेअर मध्ये गुंतवणूक करणे व त्यापासून Dividend मिळवणे.
-
Business: व्यवसाय भागीदारीमध्ये सुरू केला असेल व तुम्ही व्यवसायामध्ये सक्रिय पणे सहभागी नसाल तरी पण तुम्हाला त्यापासून passive income मिळते.
-
Write an e – book: ई बुक लिहा. ई बुक लिहिणे ही प्रकाशनाच्या कमी किमतीचा फायदा घेण्याची एक चांगली संधी आहे आणि जगभरात वितरणाचा फायदा आपण घेऊ शकतो.
-
Create a course :निष्क्रिय उत्पन्नासाठी ऑडिओ किंवा व्हिडिओ कोर्स तयार करा आणि त्यापासून पैसे मिळवा. Udemy , skill share,यासारख्या साईट द्वारे अभ्यासक्रम वितरित आणि विकले जाऊ शकतात. कोर्स द्वारे उत्कृष्ट उत्पन्न मिळू शकते सुरुवातीच्या वेळेनंतर तुम्ही सहज पैसे कमवू शकता.
3.पोर्टफोलिओ उत्पन्न | Portfolio Income
Portfolio income म्हणजे एकदाच गुंतवणूक करणे व त्याची किंमत वाढल्यानंतर विक्री करणे व त्यापासून उत्पन्न मिळवणे. त्यास Portfolio income असे म्हणतात.
Portfolio Income उत्पन्नाचे स्त्रोत
-
Real estate: जमीन,जागा,फ्लॅट,अशा ठिकाणी घेणे की आत्ता त्या ठिकाणी जास्त मागणी नाही पण भविष्यात मागणी येऊ शकते अशा ठिकाणी investment करणे. व गुंतवणुकीची किंमत वाढल्यावर त्याची विक्री करणे व त्यापासून नफा मिळवणे.
-
Stock: भविष्यात चांगला परतावा देणाऱ्या शेअर मध्ये गुंतवणूक करणे. शेअरची किंमत वाढल्यावर विक्री करणे व त्यापासून नफा मिळवणे.
-
Mutual fund: दीर्घ काळातील आर्थिक गरजांचे पूर्वनियोजन करून mutual fund मध्ये गुंतवणूक करणे. आर्थिक गरजांसाठी आवश्यक असणारी रक्कम जमा करून भविष्यातील ध्येय पूर्ण करणे.
portfolio income मध्ये तुम्हाला जास्त भांडवलाची गरज असते. गुंतवणूक कमीत कमी पाच,दहा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी ठेवावी लागते तेव्हा त्याचा परतावा खूप मिळतो.
अशा प्रकारे पैशाची गुंतवणूक करून,एकदाच काम करून व लोकांना कामाला लावून आपण निष्क्रिय उत्पन्न मिळवू शकता. आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी उत्पन्नाचे तीन प्रकार (types of income) हे तुम्हाला उपयोगी पडतील आणि आर्थिक दृष्ट्या सुरक्षित भविष्यासाठी तुम्ही नियोजन करून आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मदत होईल.
Sangram Adnaik
August 11, 2023 @ 4:36 pm
सुधीर सर… तुमचा प्रत्येक लेख मी वाचला आहे. खरंच खूप सखोल आणि अभ्यासपूर्ण माहिती तुम्ही या ठिकाणी मांडली आहे. तुमचे लेख आम्हांला व्यवहारिक जीवनात खूप उपयोगी पडणारे आहेत. तुमच्या कडून असेच चांगले मुद्देसूद लेख आम्हांला वाचायला मिळोत हीच इच्छा…
Sudhir Jadhav
August 12, 2023 @ 6:03 am
धन्यवाद, हो नक्कीच तुम्हाला व्यवहारिक जीवनात उपयोगी पडणारे लेख इथून पुढेही असेच वाचण्यासाठी मिळतील.
Priyanka
August 29, 2023 @ 11:15 am
खुप छान माहिती आहे
Dipali .
August 29, 2023 @ 5:49 pm
Nice information
Rajaram Chawde
September 3, 2023 @ 7:54 am
Knowledgeable information
Ram
September 3, 2023 @ 10:49 am
Knowledgeable information
Shivanjali
September 5, 2023 @ 5:34 pm
खुप छान माहिती मिळाली
Anjali
September 10, 2023 @ 2:46 am
अगदी सरळ सोप्या भाषेत खूप छान माहिती आहे.
Swaraj
September 23, 2023 @ 7:11 am
Knowledgeable information
Archana patil
October 6, 2023 @ 11:50 am
Helpful information
Jaya
October 11, 2023 @ 1:04 am
Knowledgebal information
Jayashree thorat
October 12, 2023 @ 3:59 am
Nice information about 3 types of income