चक्रवाढ व्याज मिळवण्यासाठी गुंतवणुकीचे 4 प्रकार | 4 Best Compound Interest Investments
तुम्ही अनुभवी गुंतवणूकदार असाल किंवा नुकतेच सुरुवात करत असाल तर दीर्घकालावधी मध्ये गुंतवणूक करणे हे चक्रवाढ व्याजा (compound interest )प्रमाणे परतावा मिळवून देण्यासाठीची गुरुकिल्ली आहे. गुंतवणुकीच्या जगात कोणीतीही जादू होऊन एका रात्रीत श्रीमंत होऊ शकत नाही. गुंतवणुक( investment ) हा wealth creation करण्याचा एक शक्तिशाली मार्ग आहे.
चक्रवाढ प्रभावामुळे तुमच्या संपत्तीचे रूपांतर शाश्वत वाढीत होते ज्यामुळे तुमच्या सुरुवातीच्या गुंतवणुकीवरच परतावा मिळत नाही तर तुमच्या गुंतवणुकीचा compound interest प्रमाणे परतावा होतो. compound interest हे जगातील आठवे आश्चर्य आहे. ज्याला ते समजते, तो कमावतो… ज्याला नाही… तो पैसे देतो.” – अल्बर्ट आइन्स्टाइन
compound interest मध्ये गुंतवणुकीवरील कमाई,भांडवली नफा,लाभांश, उत्पन्न आणि व्याज हे वाढतात.चक्रवाढीचा परिणाम प्रारंभिक मुद्दल रकमेवर आणि जमा झालेले व्याज किंवा मागील कालावधीतील परताव्याच्या कमाईमध्ये होतो. याला सहसा व्याजावरील व्याज म्हणजेच “चक्रवाढ व्याज”compound interest असे म्हणतात. गुंतवणुकीत ही एक चक्रवाढ व्याज शक्तिशाली संकल्पना आहे कारण यामुळे संपत्ती कालांतराने लक्षणीय वाढू शकते. कालावधी जितका जास्त असेल तितका compound प्रभाव अधिक लक्षणीय असेल.
उदाहरणार्थ: जर तुम्ही १०० रूपये ची गुंतवणूक केली आणि १०% वार्षिक परतावा मिळवला तर तुम्ही पहिल्या वर्षी १० रूपये कमवाल. दुसऱ्या वर्षी तुम्ही तुमच्या नवीन एकूण ११० रूपये शिल्लक वर १०% कमवाल त्यामुळे तुम्ही ११ रूपये कमवाल. ही प्रक्रिया कालांतराने चालू राहते आणि कमाई जशी जमा होते तशी गुंतवणूक अधिक वेगाने वाढते. ही संकल्पना अशा गुंतवणुकीवर लागू होते जी विशेषत: व्याज देऊ शकत नाहीत परंतु तरीही वाढतात आणि कालांतराने परतावा देतात जसे की Stock किंवा Real estate.
1.रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करून चक्रवाढ व्याज मिळवणे |Earn Compound Interest by Investing in Real Estate
Real estate हा गुंतवणुकीचा सर्वात सामान्य आणि किफायतशीर प्रकारांपैकी एक आहे.रिअल इस्टेटमध्ये कालांतराने वाढ होते. अनेकदा महागाईला मागे टाकते.रिअल इस्टेट ही एक चक्रवाढ संपत्ती आहे कारण संपत्ती वाढवण्यासाठी भांडवल वाढीची क्षमता आहे. जेव्हा आपण स्थावर मालमत्तेचे मालक होतो म्हणजेच घर,इमारत तेव्हा मार्केट मधील मागणी आणि पुरवठ्या नुसार रिअल इस्टेट मध्ये कालांतराने वाढ होऊ शकते. ही मालमत्ता दीर्घ कालावधी मध्ये (compound interest )चक्रवाढ व्याजा प्रमाणे परतावा देते. रिअल इस्टेट गुंतवणुकी प्रमाणे भाड्याने देणे या स्थिर उत्पन्नाचा अधिक मालमत्ता मिळविण्या साठी पुन्हा गुंतवणूक केली जाऊ शकते ज्यामुळे चक्रवाढ व्याजा(Compound interest)प्रमाणे परतावा मिळवला जाऊ शकतो.
2.बॉण्ड मध्ये गुंतवणूक करून चक्रवाढ व्याज मिळवणे | Earn Compound Interest by Investing in Bonds
Bond मध्ये गुंतवणूक करून आपण निश्चित उत्पन्न (fixed income)मिळवतो तो परतावा पुन्हा गुंतवणूक करून तुम्हाला त्यापासून चक्रवाढ वाढीचा फायदा मिळू शकतो. ज्यामुळे स्थिर आणि अंदाज लावता येईल अशी गुंतवणूक होईल.
3.शेअर मध्ये गुंतवणूक करून चक्रवाढ व्याज मिळवणे | Earn Compound Interest by Investing in Stock
stock हे कॉर्पोरेशनमधील मालकीचे शेअर्स असतात. जेव्हा तुम्ही शेअर विकत घेता तेव्हा त्या कंपनीचा एक छोटा तुकडा स्वतःच्या मालकीचा असतो आणि शेअर्सच्या किंमतीत झालेल्या कोणत्याही वाढीमुळे तसेच त्याद्वारे दिलेला कोणताही लाभांश तुम्हाला मिळतो आणि शेअर दीर्घ मुदतीसाठी महत्त्वपूर्ण परतावा देऊ शकतात. जसजसे कंपन्या वाढतात आणि नफा वाढतो तसतसे तुमच्या शेअरचे मूल्य वाढते.
भांडवली नफ्यासह चक्रवाढ कसे कार्य करते याचे उदाहरण वापरून पाहूया.
१०० रूपयेचा शेअर किंमत सलग दोन वर्षात १०% ने वाढली आहे.तर पहिल्या वर्षी जर तुमचा १०० रूपये किमतीचा शेअर १०% ने वाढला म्हणजे १०० रुपये वरती १० रुपये वाढले त्यामुळे पहिल्या वर्षाच्या अखेरीस शेअरची किंमत ११० रूपये असेल आणि दुसऱ्या वर्षी जर शेअर पुन्हा १०% ने वाढला तर वाढ आता ११० च्या नवीन किमतीवर आधारित आहे १०० रूपये वर नाही. त्यामुळे दुसऱ्या वर्षी शेअरचे मूल्य ११ रूपये वाढेल.
दुसऱ्या वर्षाच्या अखेरीस शेअरची किंमत १२१ रूपये असेल.ही प्रक्रिया चक्रवाढीचे स्पष्ट प्रात्यक्षिक आहे. शेअरचे मूल्य केवळ मूळ रकमेवर आधारित वाढत नाही तर ते प्रत्येक पुढील वर्षी नवीन उच्च रकमेवर आधारित वाढत आहे. कालांतराने अनेक वर्षांमध्ये या चक्रवाढ परिणामा मुळे गुंतवणुकीच्या मूल्यात लक्षणीय वाढ होऊ शकते. आणि तुमच्या शेअर वरती मिळालेला Dividendमधून मिळणार्या कमाईचा वापर अधिक stock खरेदी करण्यासाठी तुमच्या portfolio चे मूल्य वाढवण्यासाठी करू शकतो.
4.म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करून चक्रवाढ व्याज मिळवणे | Earn Compound Interest by Investing in Mutual Funds
mutual fund अनेक गुंतवणूकदारांकडून stock , Bond किंवा इतर मालमत्तांचा वैविध्यपूर्ण portfolio खरेदी करण्यासाठी पैसे गोळा करतात. mutual fund विविधता कमी जोखीम आणि स्थिर वाढीचा परतावा देते. कोणताही परतावा किंवा लाभांश पुन्हा गुंतवला जाऊ शकतो.त्यामुळे चक्रवाढ व्याजा (compound interest )चा फायदा घेऊ शकतो.
या फक्त काही मालमत्ता आहेत ज्या कंपाउंडिंगच्या शक्तीचा उपयोग करू शकतात.तुम्ही जितक्या लवकर गुंतवणुकीला सुरुवात कराल तेवढी गुंतवणूक चक्रवाढ वाढायला जास्त वेळ मिळेल. त्याचा फायदा तुम्हाला मिळेल. तुमचे घर वार्षिक मूल्यात सातत्याने वाढ होत असल्यास ते चक्रवाढ मालमत्तेसारखे काम करू शकते. रिअल इस्टेट गुंतवणूक करून ज्यामध्ये मूल्य वाढ आणि नियमित उत्पन्न प्रवाहाचा दुहेरी फायदा मिळवू शकतो. stock आणि mutual fund मध्ये गुंतवणूक करून वाढ आणि नफा मिळवू शकतो. Bondमध्ये गुंतवणूक करून विशिष्ट कालावधीत भरोसेमंद व्याज कमाई मिळवू शकतो.
तुमचा गुंतवणूक पोर्टफोलिओ वाढविण्यासाठी compound interest चा उपयोग करणे ही दीर्घकालीन आर्थिक वाढ सुरक्षित करण्यासाठी एक शक्तिशाली धोरण आहे. यामध्ये विविध मालमत्तेमध्ये धोरणात्मक गुंतवणूक करून फायदे आणि संभाव्य परतावा मिळवला जातो. कुशलतेने व्यवस्थापना केल्यावर कालांतराने उल्लेखनीय वाढ होऊ शकते. या मालमत्तेतून मिळालेल्या परताव्याची पुनर्गुंतवणूक केल्याने तुमच्या संपत्तीचा गुणाकार करून चक्रवाढ होण्यासाठी चालना मिळते.
त्यामुळे तुम्ही अनुभवी गुंतवणूकदार असाल किंवा नुकताच तुमचा प्रवास सुरू करत असाल तर लक्षात ठेवा की आर्थिक यशाची गुरुकिल्ली तुमच्या फायद्यासाठी compound interest शक्ती समजून घेणे आणि त्याचा वापर करणे यात आहे. जितक्या लवकर तुम्ही सुरुवात कराल तितकी तुमची संपत्ती वाढू शकते. गुंतवणुकीचे निर्णय घेण्यापूर्वी नेहमी सखोल संशोधन करा किंवा आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या.
वरील सर्व Asset class ची माहिती घेऊन तुम्ही गुंतवणूक करून compound interest मिळवू शकता व भविष्यातील आर्थिक धोरण अगदी सहजतेने पूर्ण करू शकता.
Dipali patil
August 25, 2023 @ 5:01 pm
Chan mahiti ahe
Priyanka
August 29, 2023 @ 11:00 am
खूप छान माहिती आहे
Rajaram Chawde
September 3, 2023 @ 7:32 am
Knowledgeable information
Shivanjali
September 5, 2023 @ 4:59 pm
compound interest विषयी खूप छान माहिती आहे.
Anjali
September 10, 2023 @ 3:12 am
अगदी सरळ सोप्या भाषेत खूप छान माहिती आहे.
Swaraj
September 23, 2023 @ 10:08 am
Nice information about compound interest
Archana patil
October 6, 2023 @ 6:13 am
Knowledgeable information
Jaya
October 11, 2023 @ 1:28 am
Knowledgeable information
Jayashree thorat
October 12, 2023 @ 3:53 am
Knowledgeable information about compound interest