म्युच्युअल फंडचे 4 प्रकार | 4 Types of Mutual Funds
गुंतवणूकदारांनचे आर्थिक ध्येय पूर्ण करण्यासाठी त्यांच्या आवश्यकते नुसार Fixed income mutual fund आणि Growth mutual fund असे वेगवेगळे म्युच्युअल फंड आहेत. त्याचे मुख्य 4 types of mutual funds आहेत.
1.Fixed income fund or Bond, Debt mutual fund
2.Equity mutual fund or Growth fund
3.Hybrid mutual fund
4.Solution-oriented & Other mutual fund
1. Fixed Income Fund or Debt Mutual Fund | डेट म्युच्युअल फंड
Debt mutual fund मध्ये काही दिवसा पासून महिन्यापर्यंत अतिरिक्त म्हणजेच जादाचे शिल्लक पैसे गुंतवणूक करणार असेल तर Liquid mutual fund मध्ये गुंतवणूक केली जाते आणि महिन्यांपासून ते एक दोन वर्षं कालावधीसाठी गुंतवणूक करणार असाल तर Debt mutual fund मध्ये आपण गुंतवणूक करू शकतो. हा Types of Mutual Fund मधील पहिला प्रकार आहे.
अ)लिक्विड फंड | Liquid fund
Liquid fund मध्ये Certificate of Deposits (CD), Treasury bill(T-bill), Commercial paper (CP) इत्यादी सारख्या अल्प मुदतीच्या(91 दिवसापर्यंत) money market साधनांमध्ये पैसे गुंतवणूक केले जातात. या mutual fund मध्ये जास्त सुरक्षितता आणि लिक्विडिटी असते.
जर तुमच्याकडे अचानक मोठी रोख रक्कम आली व ती रक्कम कोठे गुंतवणूक करायची आहे हे जर तुम्हाला निश्चित नसेल किंवा काही दिवसा पासून महिन्यापर्यंत अतिरिक्त पैसे असतील तर असे पैसे तुम्ही liquid fund मध्ये ठेवू शकता व दररोजच्या दररोज अतिरिक्त रकमेवरती व्याज मिळवू शकता किंवा Liquid mutual fund मध्ये थोडे थोडे पैसे ठेवून Emergency Fund तयार करू शकता.
तुमच्याकडे एक मोठा फंड आहे जर तो फंड एका वेळेस Equity mutual fund मध्ये गुंतवणूक केली व मार्केट जर खाली गेले तर आपणास तोटा होईल व जेव्हा मार्केट आपण खरेदी केलेले किमतीच्या वरती जाईल तेव्हापासून आपणास फायदा होईल. या अनिश्चित असणाऱ्या मार्केट चा फायदा घेण्यासाठी Liquid mutual fund मध्ये पैसे ठेवून STP (systematic transfer plan)च्या माध्यमातून दररोज, साप्ताहिक किंवा मासिक असे एका ठराविक कालावधीने आपण पैसे Equity mutual fund मध्ये पाठवू शकतो आणि खरेदीची सरासरी किंमत मिळवू शकतो.
बहुतेक किरकोळ ग्राहक आपल्या जवळील अतिरिक्त रक्कम ही बँकेच्या बचत खात्यामध्ये ठेवतात कारण बचत खात्यामधील रक्कम ते सुरक्षित मानतात व बचत खात्यातील पैसे कधीही काढू शकतात. पण बँकेच्या बचत खात्यामधील saving वर ३ महिन्यानंतर व्याज दिले जाते पण Liquid mutual fund मध्ये दररोजच्या दररोज अतिरिक्त रकमेवरती व्याज दिले जाते. लिक्विड फंड,मनी मार्केट म्युच्युअल फंड हे बचत खात्यासारखेच सुरक्षित व आकर्षित आहेत.
Liquid fund मध्ये कोणत्याही प्रकारचा लोड नसतो. गुंतवणूकदार (growth) वाढ आणि(dividend)लाभांश असे दोन पर्याय निवडू शकतो. लाभांश पर्यायां मध्ये गुंतवणुकीच्या रकमेतून दररोज, साप्ताहिक किंवा मासिक लाभांश मिळू शकतो. लाभांश ची गरज नसेल तर Growth fund हा पर्याय निवडला तर आपल्या फंड ची Growth होते. त्यापासून आपण नफा मिळवू शकतो आपल्या गरजेनुसार हे दोन पर्याय आपण निवडू शकतो. लिक्विड फंड मधून पैसे काढण्यासाठी विनंती केल्यानंतर एका कामकाजाच्या दिवसात आपल्या बँक खात्यामध्ये मध्ये जमा होतात.
ब) डेट म्युच्युअल फंड | Debt mutual fund
Debt fund ही म्युच्युअल फंड ची अशी योजना आहे की ती तुम्हाला निश्चित उत्पन्न देते. डेट म्युच्युअल फंड Corporate आणि Government Bonds मनी मार्केट इत्यादी इन्स्ट्रुमेंट्स मध्ये गुंतवणूक करतात.ज्या गुंतवणूक दारांना जोखीम नको आहे पण निश्चित परतावा हवा आहे असे गुंतवणूकदार Debt mutual fund मध्ये गुंतवणूक करतात. बँक FD पेक्षा डेट फंड हे चांगला परतावा देतात. Debt fund मध्ये चढ-उतार कमी असतात. इक्विटी फंडच्या तुलनेने डेट फंड मध्ये कमी जोखीम असते.डेट फंड मधून आपण स्थिर उत्पन्न मिळवू शकतो.
Advantages of Investing in Debt Mutual Fund
- स्थिर परतावा Steady returns
- लिक्विडिटी Liquidity
- सुरक्षितता Security
हे आहेत.जो आपल्याला परतावा मिळतो त्यामध्ये आपण इंडेक्सेशन चा फायदा घेऊ शकतो त्यामुळे आपणास कर कमी भरावा लागतो. डेट फंड मध्ये गुंतवणूक करताना आपण Growth (वाढ) किंवा dividend (लाभांश) असे पर्याय निवडू शकतो.
तुम्ही जेव्हा तुमचे आर्थिक उद्दिष्ट एक दोन वर्षापर्यंत जवळ आलेले असेल तेव्हा तुम्ही Debt mutual fund मध्ये गुंतवणूक करू शकता किंवा Equity mutual fund मध्ये तुमचे ध्येयपूर्तीचा फंड जमा झालेला आहे पण बाजाराची पुढील दिशा समजत नसेल अशावेळी इक्विटी फंड मधील फंड आपण डेट फंड मध्ये पाठवू शकतो.
आर्थिक उद्दिष्टे जवळ आली असताना जर अचानक बाजार घसरला तर आपला फंड कमी होईल व आपले आर्थिक उद्दिष्ट आपणास साध्य करता येणार नाही. त्यामुळे आर्थिक उद्दिष्टे जवळ आले असेल तर Equity mutual fund मधील गुंतवणूक Debt fund कडे वळवू शकतो आणि डेट फंड मधून fixed return घेऊ शकतो.
Types of Debt Mutual Fund
- Liquid Funds
- Ultra short-Term Bond Funds
- Short-Term Income Funds
- Fixed Maturity Plans (FMPs)
- Long-Term Income Funds
- Gilt Funds, Monthly income Plans (MIPs)
- Capital Protection Oriented Funds (CPFs)
- Dynamic Bond Funds
2.Equity Mutual Funds or Growth Funds
Growth funds हा इक्विटी म्युच्युअल फंड चा प्रकार आहे. Equity mutual funds हे कंपनींच्या Stock मध्ये पैसे गुंतवणूक करतात.त्यांना Equity fund किंवा Growth fund असेही म्हणतात.
इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करून आपण ध्येयपूर्तीचा फंड जमा करू शकतो. Equity mutual funds मध्ये Debt mutual fund च्यां तुलनेत जास्त जोखीम असते पण फंड मॅनेजर वेगवेगळ्या सेक्टर मधील वेगवेगळे शेअर निवडून त्या शेअर मध्ये फंड ची विभागणी करून जोखीम(Risk) कमी करून गुंतवणूक करतात. त्यामुळे कमी जोखीम होऊन डेट फंड च्यां तुलनेत जास्त परतावा Equity mutual funds मध्ये मिळतो. इक्विटी म्युच्युअल फंडचा परतावा हा Inflation बीट करून मिळतो म्हणजेच महागाई पेक्षा जास्त असते.
Equity mutual funds मध्ये दोन प्रकारे उत्पन्न मिळवू शकतो .
एक म्हणजे Growth आणि दुसरा म्हणजे Dividend.
- जे गुंतवणूकदार dividend हा पर्याय निवडतात त्यांना कंपन्या त्यांच्या वार्षिक कामगिरी नुसार Dividend देतात.
- इक्विटी म्युच्युअल फंडच्या ग्रोथ स्कीम्स मध्ये गुंतवणुक केल्यास गुंतवणूकदाराला म्युच्युअल फंड कोणताही dividend देत नाहीत. आणि काही शेअर्स नियमित dividend देतात. हा dividend वाढीचा (Growth) पर्याय निवडला असल्यामुळे म्युच्युअल फंड हा dividend परत त्याच फंडात गुंतवणूक करतात या पैशामुळे म्युच्युअल फंडचे निव्वळ मालमत्ता मूल्य म्हणजेच (NAV) वाढतो.NAV वाढल्यामुळे आपल्या फंड ची किंमत वाढते.
Types of Equity mutual fund or Growth fund
- Large Cap Equity Funds
- Mid-Cap Equity Funds
- Small Cap Equity Funds
- Multi Cap Equity Funds
- Thematic Equity Funds
- Equity linked savings scheme (ELSS)
3.Hybrid mutual fund
जोखीम ही तीन प्रकारांमध्ये विभागली गेली आहे पहिला प्रकार आपण पाहिला तो Debt mutual fund यामध्ये कमी जोखीम असते व दुसरा प्रकार पाहिला तो Equity mutual fund यामध्ये जास्त जोखीम असते व या दोघांचे Equity व Debt मिळून मिश्र जोखीमचा जो फंड तयार केला आहे. त्याला Hybrid mutual fund असे म्हणतात.
गुंतवणूकदारांच्या जोखीम घेण्याची सहनशीलता आणि गुंतवणूकदारांची उद्दिष्टे याचा विचार करून फंड तयार केले जातात. प्रत्येक व्यक्तीच्या वेगवेगळ्या गरजा आहेत म्हणून फंड मॅनेजर योजनेच्या गुंतवणुकीच्या उद्दिष्टानुसार portfolio तयार करतात आणि वेगवेगळ्या प्रमाणात Equity आणि Debt यांचे वाटप करतात.
बाजारातील अनुकूल हालचाली नुसार खरेदी विक्री केली जाते. Hybrid mutual fund हे दीर्घकालीन भांडवली वाढीसह गुंतवणूकदाराना नियमित उत्पन्न देण्यासाठी संतुलित पोर्टफोलिओ तयार करण्याचा प्रयत्न करतात.Hybrid mutual fund मध्ये डेट म्युच्युअल फंड पेक्षा जास्त जोखीम असते पण डेट फंड पेक्षा चांगला परतावा Hybrid mutual fund मध्ये मिळतो.
Equity fund च्या तुलनेत Hybrid mutual fund हे अधिक सुरक्षित असतात.नवीन गुंतवणूकदार ज्यांना इक्विटी मार्केट मधील जास्त रिस्क नको असेल ते गुंतवणूकदार हायब्रीड म्युच्युअल फंड पासून गुंतवणूक करण्यासाठी सुरुवात करू शकतात.
Types of Hybrid mutual fund
- Conservative Hybrid Fund
- Balanced Hybrid Fund
- Aggressive Hybrid Fund
- Dynamic Asset Allocation or Balanced Advantage Fund
4.Solution-oriented & Other funds
भविष्यातील आर्थिक ध्येय म्हणजेच Retirement planning, children’s education and marriage, buy home, buy car इत्यादी सारख्या गरजांसाठी लागणारी भविष्यातील रक्कम निश्चित करून गुंतवणूक केली जाते व दीर्घकालीन गुंतवणूक करून भविष्यातील आर्थिक गरजा चांगला परतावा मिळवून पूर्ण करण्यासाठी या mutual fund मध्ये गुंतवणूक केली जाते.
Types of Solution-oriented mutual fund
- Retirement Fund
- Children’s Fund
- Index Funds/ ETFs
- Fund of Funds (Overseas/ Domestic)
वरील mutual fund ची आपल्या गरजेनुसार व जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार निवड करून आपण भविष्यातील आर्थिक ध्येय पूर्ण करू शकतो पण कोणतीही गुंतवणूक करताना त्यामधील रिस्क रिवार्ड याची माहिती घ्यावी व गुंतवणूक करताना आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊन गुंतवणूक करावी व भविष्या तील आर्थिक ध्येय पूर्ण करावी…..
Dipali patil
August 18, 2023 @ 8:13 am
Nice information
Priyanka
August 29, 2023 @ 10:59 am
खूप छान माहिती आहे
Rajaram Chawde
September 3, 2023 @ 7:31 am
खूप छान माहिती आहे.
Shivanjali
September 5, 2023 @ 4:48 pm
mutual fund विषयी खूप छान माहिती आहे
Anjali
September 10, 2023 @ 3:12 am
अगदी सरळ सोप्या भाषेत खूप छान माहिती आहे.
Swaraj
September 23, 2023 @ 10:21 am
Knowledgeable information about types of mutual funds
Archana patil
October 6, 2023 @ 6:09 am
Helpful information
Jaya
October 11, 2023 @ 1:29 am
Helpful information
Jayashree thorat
October 12, 2023 @ 3:52 am
Knowledgeable information about types of mutual funds