पैशाची बचत करण्याच्या 21 सवयी | Best 21 Money Saving Habits
तुम्ही संपत्ती निर्माण करण्याच्या आणि आर्थिक स्वातंत्र्यापर्यंत पोहोचण्याच्या सुरुवातीच्या प्रक्रियेत असाल,तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात. हा लेख तुम्हाला बचत करण्याच्या सवयी( money saving habits )सांगेल.आपण सर्वांनी आपल्या पैशाची काळजी करणे आणि आपली संपत्ती कितीही असली तरी जाणीव पूर्वक खर्च करणे आणि गुंतवणूक करणे शहाणपणाचे ठरू शकते, या सवयी तुम्हाला तुमच्या आर्थिक सवयी बदलण्यात, पैसे वाचविण्यात आणि कालांतराने wealth creation करण्यात मदत करतील.
तुम्हाला आयुष्यातील आर्थिक धोरणे पूर्ण करावयाची असतील तर एक म्हणजे तुम्हाला कमाई वाढवावी लागेल किंवा जी कमाई आहे ती खर्च करताना काळजीपूर्वक खर्च करावी लागेल आणि त्यामधून पैसे कसे बचत करता येतील ती बचत गुंतवणूकीमध्ये रूपांतर करून भविष्यातील आर्थिक धोरणे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मदत होईल तर चला मी तुम्हाला बचतीचे सवयी (money saving habits) सांगतो…..
1.स्वतःमध्ये गुंतवणूक करा | Invest in yourself
आरोग्यावरती गुंतवणूक करा आणि वेगवेगळ्या मार्गातून मिळणारे ज्ञान घ्या कारण की ज्ञानामुळे तुमची कौशल्य वाढतील, तुम्हाला भविष्यातील चांगल्या संधी ओळखता येतील व त्यामधून तुम्ही मोठी कमाई करू शकता आणि त्या कमाईचा उपभोग घेण्यासाठी शरीरही स्वस्त पाहिजे त्यासाठी आरोग्यावरती गुंतवणूक करा. ज्ञान आणि कौशल्य तुमचे पैसे वाचऊ शकतात. ही दीर्घकालीन गुंतवणूक आहे की जी तुम्हाला अनेक प्रकारे कामी येऊ शकते.
2.खर्च करण्यापूर्वी बचत करा | Save before you spend
“खर्च केल्यावर जे उरले ते साठवू नका; बचत केल्यानंतर जे उरले ते खर्च करा. -वॉरेन बफेट
तुम्ही बचत करण्यासाठी ध्येय ठरवून ध्येयासाठी पैसे बचत करा व राहिलेल्या पैशांमध्ये खर्च करा. बचतीला प्राधान्य देऊन, तुम्ही तुमची संपत्तीत सतत वाढ करू शकता. जास्त खर्च टाळण्याची ही एक रणनीती आहे आणि तुम्हाला तुमच्या बजेटवर टिकून राहण्यास money saving habits मदत करते.
3.मासिक बजेट तयार करा | Create a monthly budget
महिन्याचे बजेट तयार करा तुमचे उत्पन्न आणि खर्च हे व्यवस्थित लिहा.तुमच्या खर्चाचा आराखडा तयार करा आणि जास्त खर्च टाळण्यासाठी बचतीला प्राधान्य द्या.
4.बचत करताना धीर ठेवा | Be patient when saving
“आज कोणीतरी सावलीत बसले आहे कारण कोणीतरी खूप वर्षांपूर्वी झाड लावले होते.” – वॉरेन बफेट
काटकसरीची जीवनशैली हा अनेकदा दीर्घकालीन प्रयत्न असतो. धीर धरून आणि तुमची बचत आणि गुंतवणुकीला वेळ देऊन, तुम्ही स्मार्ट आर्थिक निर्णय घेत राहिल्यास भविष्यात तुम्हाला छान परतावा मिळेल.
5.आपत्कालीन निधी तयार करा | Create an emergency fund
संकटाच्या वेळी आपत्कालीन निधी असेल तर अचानक येणाऱ्या खर्चाच्या वेळी मदत होते. कर्ज काढावे लागत नाही व पैशासाठी धावपळ करावी लागत नाही यामुळे मनःशांती लाभते व मानसिक स्थिती व्यवस्थित असेल तर येणाऱ्या संकटांना तोंड देऊ शकतो. ही money saving habits खूप महत्त्वाची आहे.
6.वेळेची किंमत समजून घ्या | Understand the value of time
वेळ हा एक मौल्यवान स्त्रोत आहे ज्याचे व्यवस्थापन हुशारीने करा. सुज्ञपणे वेळ दिल्यास आर्थिक वाढ आणि वैयक्तिक समाधान मिळू शकते,जसे पैसे गुंतवणे. तुमच्या पैशाप्रमाणेच तुमच्या वेळेचा काटकसर करा आणि तो हुशारीने खर्च करा.
7.तुम्हाला न परवडणाऱ्या महागड्या वस्तू घेणे टाळा | Avoid Buying Expensive things that you cannot afford
तुमची आर्थिक परिस्थिती नुसार वस्तू खरेदी करा की ज्या वस्तू तुम्हाला परवडतील व वापरण्यास सोयीस्कर असतील अशाच वस्तू खरेदी करा दुसऱ्यांकडे पाहून महागड्या न परवडणाऱ्या वस्तूंचा मोह टाळा.
8.उत्पन्नाच्या एकाच मार्गावर अवलंबून राहू नका | Don’t rely on a Single Source of Income
उत्पन्नाच्या एका मार्गावर अवलंबून राहिले तर तो मार्ग बंद झाला तर आर्थिक अडचणी निर्माण होतील म्हणून उत्पन्नाचा दुसरा मार्ग तयार करा तो तुम्हाला बचत वाढवण्यास,कर्ज फेडण्यास मदत करेल व पहिल्या मार्गाला धोका निर्माण झाल्यास दुसऱ्या मार्गाची मदत मिळेल. ही Money Saving Habits आर्थिक अडचणी पासून वाचवेल.
9.गरजेचे नसलेल्या वस्तू घेऊ नका | Do not take unnecessary things
वस्तू घेताना तुम्हाला ती गरजेची आहे का आवश्यक असेल तर घ्या आवश्यक नसेल तर घेऊ नका, कारण अनावश्यक वस्तूसाठी तुमची बचत संपून जाईल,खर्च न करता बचतीचा वापर गुंतवणुकीमध्ये रूपांतर करूण भविष्यात चक्रवाढ व्याजाप्रमाणे परतावा मिळवला जाऊ शकतो.ही money saving habits अनावश्यक खर्च करण्यापासून वाचवेल.
10.रोख पैसे देऊन खरेदी करा | Buy by paying cash
जेव्हा खरेदी करताना ऑनलाईन ट्रांजेक्शन करतो तेव्हा खर्च झालेले पैशाची जाणीव रोख रकमेच्या तुलनेत कमी होते व पैसे जास्त खर्च होतात व त्यामुळे तुमच्या मासिक बजेट बिघडू शकते.
11.कर्जात अडकू नका | Don’t get into debt
कोणती वस्तू घेताना ती वस्तू घेण्यासाठी किती पैसे लागतील त्याचा प्लॅन करा व त्यासाठी बचत (saving ) करून वस्तू खरेदी करा. सर्वच वस्तू कर्जावर घेऊ नका. कर्ज हे ओझे बनू शकते आणि तुमच्या आर्थिक स्वातंत्र्यावर मर्यादा येईल त्यामुळे शक्य असेल तेव्हा कर्ज घेणे टाळले पाहिजे. ही money saving habits कर्ज व्यवस्थापन करण्यास मदत करेल.
12.बचतीचे गुंतवणुकीमध्ये रूपांतर करा | Convert savings into investments
पहिल्यांदा काटकसर करा,नंतर पैसे वाचवा,वाचवलेले पैसे गुंतवणुकीमध्ये रूपांतर करा.तुमच्या उत्पन्नाचा काही भाग नियमितपणे बचत करून गुंतवणुकीमध्ये रूपांतर केला तर भविष्यात चक्रवाढ व्याजाप्रमाणे परतावा मिळेल.
13.बाहेर जेवण करण्यासाठी जाण्याची मर्यादा ठरवा | Limit dining out
वारंवार हॉटेलमध्ये जेवण करणे तुमची बचत खाऊ शकते त्यामुळे बाहेर जाण्याची मर्यादा ठरवा त्या ऐवजी घरीच जेवण बनवणे फायद्याचे आहे. ही Money Saving Habits तुमचे पैसे वाचऊ शकते.
14.क्रेडिट कार्ड ऐवजी रोख रक्कमेमध्ये व्यवहार करा | Make transactions in cash instead of credit cards
क्रेडिट कार्ड कर्जाचा सापळा आणि उच्च-व्याजदर टाळण्यासाठी रोख रक्कमेमध्ये व्यवहार करणे तुम्हाला मदत करू शकते. हे बजेटच्या चांगल्या सवयींना प्रोत्साहन देऊ शकते आणि तुम्ही खर्च करत असलेल्या पैशांबद्दल तुम्हाला अधिक जागरूक करू शकते.
15.क्रेडिट कार्डचे कर्ज घेणे टाळा | Avoid taking out credit card debt
“जर तुम्ही हुशार असाल, तर तुम्ही कर्ज न घेता भरपूर पैसे कमवणार आहात.” – वॉरेन बफेट
क्रेडिट कार्डचे कर्ज अनेकदा उच्च-व्याजदरांसह येते, त्यामुळें ते कर्ज घेणे महाग आहे. त्यामुळे क्रेडिट कार्ड चे कर्ज टाळून आपण कालांतराने महत्त्वपूर्ण पैसे वाचवू शकतो.
16.साधी जीवनशैली ठेवा | Keep a simple lifestyle
साधी जीवनशैलीमुळे आपल्या आर्थिक क्षमतेपेक्षा कमी खर्च होतो, अनावश्यक खर्च टाळले जातात,त्यामुळे पैशाची बचत वाढते व आर्थिक ताण कमी होतो. खरोखर महत्वाचे काय आहे यावर आपले लक्ष केंद्रित होते. लक्षात ठेवा की आनंद आणि समाधान विकत घेतले जाऊ शकत नाही.
17.कधीही पैसे गमावू नका | Never lose money
“Rule No. 1: Never lose money. Rule No. 2: Never forget rule No.1.” – Warren Buffett
भांडवल जतन करून आणि धोकादायक गुंतवणूक टाळून तुम्ही तुमची संपत्ती स्थिरपणे वाढवू शकता. गुंतवणुकीचे निर्णय घेण्यापूर्वी संभाव्य तोट्याची नेहमी जाणीव ठेवा. विचार न करता खर्च किंवा गुंतवणूक करून पैसे गमावू नका.
18.तुम्हाला समजलेल्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करा | Invest in things you understand
तुम्हाला जे समजते त्यात गुंतवणूक केल्याने तुम्हाला माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत होते आणि नुकसान होण्याची शक्यता कमी होते. गुंतवणुकीचे महिती जाणून घेतल्याने तुम्ही योग्य निवड करण्याची अधिक शक्यता असते.
19.अनावश्यक आर्थिक जोखीम घेऊ नका | Don’t take unnecessary financial risks
अनावश्यक आर्थिक जोखीम घेतल्याने मोठे नुकसान होऊ शकते. नुकसान टाळण्यासाठी तुमच्या आर्थिक निर्णयांचे परिणाम तुम्ही समजून घ्या,जर तुम्ही तुमचे उत्पन्न राखले नाही तर ते गमावण्याचा धोका वाढतो. मोठी आर्थिक जोखीम घेणे टाळा.
20.मिळालेला नफा पुन्हा गुंतवणूक करा | Reinvest the profit
मिळालेला सर्व नफा खर्च करण्याऐवजी तो पुन्हा गुंतवणूक करून वाढ होऊ शकते.चक्रवाढ व्याज जिथे तुम्ही कमावलेल्या व्याजावरही व्याज मिळते ते संपत्ती निर्मितीसाठी एक शक्तिशाली साधन आहे.जर तुम्ही काटकसरी असाल,तर तुम्ही तुमचे भांडवल वाढू देऊ शकता कारण तुम्हाला ते बाहेर काढून खर्च करण्याची गरज लागणार नाही.
21.दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा | Focus on long-term financial goals
“झाड लावले की लगेच फळे देत नाही” तसेच आर्थिक बाबतीत संयम महत्त्वाचा आहे. झटपट समाधान मिळवण्याऐवजी तुमच्या दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा. त्यासाठी बचत करून गुंतवणूक करा व compound interest प्रमाणे परतावा घ्या भविष्यातील आर्थिक धोरण अगदी सहजतेने पूर्ण करा.
आर्थिक ताणतणाव टाळण्यासाठी बचत करून सतत गुंतवणूक करा त्यामुळे तुम्हाला आर्थिक स्थिरता आणि मनःशांती मिळेल, हुशारीने आर्थिक निर्णय घेऊन नुकसान टाळा, कर्ज मर्यादित करा आणि त्याऐवजी संपत्ती जमा करण्यावर लक्ष केंद्रित करा, आधी बचत करा आणि नंतर खर्च करा, गुंतवणुकींना छान परतावा मिळण्यास वेळ लागतो त्यासाठी सातत्य, शिस्त आणि वेळ आवश्यक आहे त्यामुळे तुमच्याकडील पैसे अधिक चांगल्या प्रकारे पैशाचे नियोजन करण्यासाठी भर द्या. आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवा.वॉरन बफेट एकदा म्हणाले होते, “आज कोणीतरी सावलीत बसले आहे कारण कोणीतरी खूप वर्षांपूर्वी झाड लावले होते.” आजच तुमची आर्थिक झाडे लावायला सुरुवात करा आणि भविष्यात सावलीचा आनंद घ्या…..
Dipali .
August 25, 2023 @ 5:13 pm
आपल्या चांगल्या भविष्यासाठी पैशाची बचत करणे किती मह्त्वाचं आहे हे समजते आणि त्यासाठी सुचवलेल्या सवयीपण खूप सोप्या आणि चांगल्या आहेत.
अशीच आम्हाला तुमच्याकडून माहीत मिळत राहो.
Priyanka
August 29, 2023 @ 11:03 am
money saving habits nice information
Rajaram Chawde
September 3, 2023 @ 7:36 am
Money Saving Habits knowledgeable information
Ram
September 3, 2023 @ 11:30 am
खुप छान माहिती आहे
Shivanjali
September 5, 2023 @ 5:05 pm
money saving habits विषयी खूप छान माहिती मिळाली
Anjali
September 10, 2023 @ 3:11 am
अगदी सरळ सोप्या भाषेत खूप छान माहिती आहे.
Swaraj
September 23, 2023 @ 9:56 am
Knowledgeable information
Archana patil
October 6, 2023 @ 6:23 am
Knowledgeable information about Money Saving Habits
Jaya
October 11, 2023 @ 1:25 am
Knowledgeable information
Jayashree thorat
October 12, 2023 @ 3:54 am
Money Saving Habits knowledgeable information
Ganesh pokharkar
June 2, 2024 @ 8:30 am
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर