7 अशा आर्थिक चुका ज्या तुम्हीं टाळू शकता | Top 7 Financial Mistakes You Can Avoid
आपण आर्थिक चुका(financial mistakes) करतो त्यामुळे भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागते व आपण भविष्यातील आर्थिक ध्येय पूर्ण करू शकत नाही त्यामुळे अशा आर्थिक चुका या लेखात सांगणार आहे की त्या टाळून तुम्ही पैसे वाचवू शकता व पैशाचे नियोजन करून भविष्यातील आर्थिक ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्हाला त्याची मदत होईल…..
What is Financial Mistakes ? | आर्थिक चुका म्हणजे काय ?
आपत्कालीन निधी (emergency fund)न करणे,बचत न करणे, पैसे कमवण्यापेक्षा जास्त खर्च करणे, आर्थिक ध्येय निश्चित न करणे, भावनिक होऊन पैसे खर्च करणे, वस्तू कर्जा वरती विकत घेणे या सर्व आर्थिक चुका आहेत.
पैशाचे नियोजन हे अवघड आहे आणि जर पैशाचे नियोजन करण्याची सवय तुम्हाला नसेल तर तुमच्या खिसा लवकर रिकामा होईल व ते तुम्हाला खूप महागात पडेल. तर चला आपण आर्थिक चुका (financial mistakes) कशा टाळू शकतो हे आपण पाहूया…..
7 अशा आर्थिक चुका ज्या तुम्हीं टाळू शकता | 7 Financial Mistakes You Can Avoid
1.आपत्कालीन निधी न तयार करणे ही आर्थिक चूक आहे | Not Building an Emergency Fund is a Financial Mistake
भविष्यात येणारी अनिश्चित धोके आपण emergency fund म्हणजे आपत्कालीन निधीच्या माध्यमातून दूर करू शकतो. आपले ६ महिन्याचे खर्च म्हणजे मासिक किराणा,कर्जाचे हप्ते, गुंतवणुकीचे रक्कम इतर खर्च जो महिन्याला खर्च आहे त्याच्या सहा पट रक्कम emergency fund मध्ये महिन्याच्या पगारातून थोडी थोडी saving करून साठवावी.
भविष्याचा विचार न करता सर्वजण वर्तमानात जगतात परंतु जर emergency fund तयार केला तर तो भविष्यात येणाऱ्या कठीण परिस्थिती मध्ये म्हणजे अचानक नोकरी गेली,घरामधील सदस्याला मोठे आजारपण आले,अनपेक्षित खर्च इ.येणाऱ्या अनपेक्षित खर्चा मध्ये उपयोगी येतो. अनियोजित येणाऱ्या परिस्थितीच्या मानसिक त्रासापासून आपण वाचू शकतो अशा परिस्थिती मध्ये मानसिक स्थिरता व समाधान मिळते व पुढील अडचणींना सामना करण्यासाठी आपण सज्ज असतो. त्यामुळे emergency fund तयार करून 1 आर्थिक चुक( financial mistake) कमी करू शकतो.
2.बचत न करणे ही आर्थिक चूक आहे | Not Saving is a Financial Mistake
कमाईतून खर्च केल्यानंतर शिल्लक राहिलेल्या रकमेस “बचत” असे म्हणतात. saving करणे खूप महत्त्वाचे आहे कारण पैशाची बचत केल्याने तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य, सुरक्षा मिळते.पैशाची बचत जर करायची असेल तर तुम्हाला बचत करण्याचे कारण सापडले तर तुम्ही बचत करू शकता.बचत जर केली नाही तर येणाऱ्या अडचणी चा सामना करू शकत नाही. त्यामुळे मानसिक संतुलन बिघडते व आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते. त्यामुळे saving करणे खूप गरजेचे आहे .
आपण बचत करण्यापेक्षा बचत होऊ शकत नाही याची कारणे सांगतो पगारच कमी आहे,पैसे शिल्लक राहत नाहीत,एवढ्या पैशांमध्ये आहे त्या गरजाच भागत नाही तर मग बचत कशी करणार ?
जर तुम्ही तरुण असाल व आत्ता कमाई करून जर बचत करू शकत नसाल तर तुमचे लग्न झाल्यानंतर,मुले झाल्यानंतर,मुले शाळेत जाऊ लागल्या नंतर, मुले कॉलेजला जाऊ लागले की त्यावेळीचे जे खर्च कसे काय भागणार ? त्यावेळी तर तुमची आताच्या तुलनेत काम करायची क्षमता पण कमी झालेली असणार व खर्च वाढलेले असणार त्यावेळी बचत करू शकता का ? त्यामुळे बचत करू न शकण्याची कारणे न देता मी बचत कोठे कोठे करू शकतो याची कारणे शोधा व बचत करून आर्थिक चुक(Financial mistake avoid) कमी करू शकतो. म्हणजे तुम्हाला आर्थिक संकटांना सामोरे जावे लागणार नाही.
3.पैसे कमवण्यापेक्षा जास्त खर्च करणे ही आर्थिक चूक आहे | Spending more Money than you Earn is a Financial Mistake
आपण सगळ्यांच्या पेक्षा छान दिसावे आपल्याकडे लोकांनी पहावे. त्यामुळे स्वतःला तात्पुरते आनंदात ठेवण्यासाठी आपण ब्रॅण्डेड कपडे,महागडी गाडी, महागडे मोबाईल ,ब्रॅण्डेड वस्तू घेतो.पण आपण त्यावेळी आपण आपली कमाई किती आहे व आपण खर्च किती करतो याचे मोजमाप करत नाही . स्वतःला वापरण्यापेक्षा दुसऱ्याना छान दिसावे म्हणून आपण आपल्या कडे वस्तू घेण्यासाठी पुरेसे पैसे नसताना सुद्धा त्या वस्तू लोन EMI वरती घेतो. त्यामुळे भविष्यात आर्थिक अडचणी निर्माण होतात त्यामुळे कमाई पेक्षा जास्त खर्च करू नये. तुम्हाला आर्थिक संकटांना सामोरे जावे लागणार नाही.त्यासाठी कमाई पेक्षा जास्त खर्च न करता financial mistake कमी करू शकतो.
4.भविष्यातील आर्थिक ध्येय निश्चित न करणे ही आर्थिक चूक आहे | Not Setting Future Financial Goals is a Financial Mistake
भविष्यात येणारे आर्थिक ध्येय कोणते आहेत, त्याचा कालावधी किती आहे, त्यासाठी आत्ता मला किती पैशाची saving करावी लागेल हे जर उद्दिष्ट तुम्ही समोर ठेवून पैशाचे जर नियोजन केले तर तुम्ही बचत करू शकता. ती बचत investment करून भविष्यातील आर्थिक ध्येय पूर्ण करू शकता व आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र, सुरक्षित, स्वाभिमानी जीवन जगू शकता.
तुम्हाला म्हातारपणामध्ये आर्थिक गरजा भागवण्यासाठी दुसऱ्या कोणावरही अवलंबून राहण्याची गरज लागणार नाही. तसेच मुलांच्या उच्च शिक्षणासाठी, मुलीच्या लग्नासाठी,घर घेण्यासाठी,गाडी घेण्यासाठी,बाहेरच्या देशात फिरायला जाण्यासाठी इं. गरजांसाठी आजच आर्थिक ध्येय निश्चित करा व त्यासाठी पैशाची गुंतवणूक करण्यास सुरुवात करा. म्हणजे आपण आर्थिक ध्येय ठरवून Financial mistake कमी करू शकतो.
5.भावनिक होऊन पैसे खर्च करणे ही आर्थिक चूक आहे | Spending Money Emotionally is a Financial Mistake
एखाद्या वस्तू विकत घेताना ती वस्तू आपल्या गरजेचे आहे का ? ती वस्तू आपल्यासाठी किती उपयोगाचे आहे, त्यासाठी आपल्याला किती पैसे खर्च करणे योग्य आहे,त्यासाठी आपल्याकडे पुरेसे पैसे आहेत का ती वस्तू EMI वरती घ्यावी लागणार आहे का,वस्तू आपली गरज (need) आहे का इच्छा (want) असा कोणताही विचार न करता फक्त आपल्याला घ्यावी वाटते म्हणून पैशाचे नियोजन न करता भावनिक होऊन विकत घेणे त्यामुळे मासिक खर्चाचे नियोजन विस्कटते व भविष्यात आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते .
म्हणून कोणतीही वस्तू विकत घेताना त्याचे नियोजन करूनच घ्या. भावनिक होऊन पैसे खर्च करू नका त्यामुळे भविष्यात तुम्हाला आर्थिक संकटांना सामोरे जावे लागणार नाही. भावनिक होऊन पैसे खर्च न करता Financial mistake कमी करू शकतो.
6.रोख रक्कमेमध्ये व्यवहार न करणे ही आर्थिक चूक आहे | Not Dealing in Cash is a Financial Mistake
रोख रक्कम देताना आपण किती पैसे देतोय हे आपल्याला जाणीव होते. पण online payment करताना तेवढीच जाणीव होत नाही कारण online payment करणे हे सोयीचे असते व त्यामध्ये रोख रक्कम व्यवहार करण्यापेक्षा कमी emotion असतात. त्यामुळे रोख रकमेच्या तुलनेत online payment च्या माध्यमातून पैसे जास्त खर्च होतात. त्यामुळे आपणास जेवढे शक्य असेल तेवढे रोख रकमेमध्ये व्यवहार करावा त्यामुळे आपल्या पैशाची बचत होईल व अनावश्यक खर्च होणार नाहीत. रोख रकमेमध्ये व्यवहार करून Financial mistake कमी करू शकतो.
7.वस्तू लोन वरती किंवा ऑफर वरती विकत घेणे ही आर्थिक चूक आहे | Buying Goods on Loan or on offer is a Financial Mistake
वस्तू विक्रेते ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वस्तू loan वरती किंवा धमाकेदार offer देतात त्यामुळे थोडेसे down payment करून ती वस्तू विकत घेता येते याची ग्राहकांना भुरळ पडते व काहीही विचार न करता लोक लगेच ती वस्तू loan वरती विकत घेतात व EMI च्या जाळ्यामध्ये अडकतात.
मोठ्या मोठ्या वस्तू विकत घेण्यासाठी म्हणजेच घर घेण्यासाठी आपणास home loan घेणे गरजेचे आहे कारण एवढी मोठी रक्कम साठवून घर घेण्यास वेळ लागू शकतो व तेवढ्या कालावधीसाठी आपण थांबू शकत नसेल तर गृह कर्ज काढताना आपण loan किती रकमेचे काढतोय व त्यासाठी किती रकमेचा EMI ठेवतोय आपली मुद्दल (principal)किती जाते,व्याज (interest)किती जाते याचा पण विचार करून loan amount निश्चित केली पाहिजे व कमीत कमी व्याज व जास्तीत जास्त मुद्दल कशी जाईल याच्यावरती भर दिला पाहिजे.
छोट्या छोट्या वस्तूसाठी म्हणजेच टीव्ही, फ्रीज ,मोबाईल अशा छोट्या वस्तूसाठी लोन न घेता त्याचे planning करून ती वस्तू विकत घेतली पाहिजे. त्यामुळे भविष्यात तुम्हाला आर्थिक संकटांना सामोरे जावे लागणार नाही. वस्तू लोन वरती किंवा ऑफर वरती विकत न घेता आपण Financial mistake कमी करू शकतो.
financial mistakes न करता जर पैशाचे नियोजन करून ध्येय निश्चिती (goal planning)केले तर तुम्हास भविष्यातील आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार नाही व तुमचे आयुष्य सुख समृद्धी युक्त असेल त्यासाठी वरील सर्व चुका न करता पैशाचे नियोजन करा.
Mahesh Shamsunder Vaishnav
August 14, 2023 @ 8:02 am
Nice information
Dipali patil
August 16, 2023 @ 11:43 am
अगदी सरळ सोप्या भाषेमध्ये छान माहिती आहे.
Priyanka
August 29, 2023 @ 11:13 am
खुप छान माहिती आहे
Rajaram Chawde
September 3, 2023 @ 7:50 am
Nice information about financial mistakes
Ram
September 3, 2023 @ 11:26 am
Nice information
Shivanjali
September 5, 2023 @ 5:33 pm
Knowledgeable information
Anjali
September 10, 2023 @ 2:46 am
अगदी सरळ सोप्या भाषेत खूप छान माहिती आहे.
Swaraj
September 23, 2023 @ 8:18 am
Nice information about financial mistakes
Archana patil
October 6, 2023 @ 6:43 am
Knowledgeable information about financial markets
Jaya
October 11, 2023 @ 1:04 am
Nice information about financial mistakes
Jayashree thorat
October 12, 2023 @ 3:58 am
Knowledgeble information about financial mistakes